या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४ ) रामराज्याचे वर्णनः पापातें न वसावया स्थळ दिसे, कोण श्रमाला पुसे ?। नाहीं आश्रय यास्तव क्षितितळी चिंता सचिंता वसे, ॥ विन्नातें बहु विन्न होति, रुसली भीति त्रिलोकी बरी, । साकेतीं रघुनाथ सानुजसुहृत् राज्यासि जेव्हां करी. ॥ (कुश. १) त्या त्या पात्रास शोभतील अशीच भाषणे पंतांनी त्यांच्याकडून वदविली आहेत. एवढेच नव्हे तर, बऱ्याच प्रसंगी त्यांनी स्त्रियांच्या मुखांत स्त्रिया नेहमी बोलतात अशी भाषा, लहान मुलांच्या तोंडांत बोबडी भाषा व रंगेल पुरुषांच्या भाषणांत रंगेल पदयो. जना घातली आहे. सूर्यग्रहणानिमित्त स्यमंतपंचक तीर्थी यादवांची व पांडवांची मंडळी एकत्र जमली असतां कृष्णस्त्रियांनी कृष्णभगिनी द्रौपदीस आपल्या स्वयंवरकथा सांगितल्या आहेत. त्यांतील वर्णन फार बहारीचें व स्त्रीस्वभावास पूर्णपणे साजेल असें असून त्यांतील शब्दयोजनाही स्त्रीजनांस अनुरूप अशीच आहे. यासंबंधी केका १० तील गंगेची उक्ति व पृष्ठ ३३ वरील टीप १ ही पाहावी. तसेंच 'राधाकृष्णसंवाद' व 'गोपीगोडवा' ही पंतांची । लघुकाव्यही ह्या संबंधी वाचनीय आहेत. लहान मुलांच्या बोबड्या भाषणांचा मासला पहाः(कृष्णाने शकटासुराचा वध केला याविषयीं वर्तमान गवळ्यांची लहान मुले आपल्या आईबापांना जाऊन सांगतातः) गोपशिशु ह्मणति ‘पलिसा, ललतां हलिनेच झालिला पाय,। गाला उलोनि पलला, सल्व खलें, नवल कलितसां काय ?॥' (हरिवंश) ह्या भाषणाची पदरचना किती मृदु, साधी व कोमल, ह्मणूनच बालकोचित आहे हे सांगणे नकोच. मोरोपंती भारतांत बकराक्षस वधाख्यानांत (आदि. ३०.३२), तसेंच कृष्णविजयांत (अ. ७,९) अशीच स्फुट शब्दरचना केली आहे. रंगेल भाषणाचा एक छोटासा मासला पहा. कीचक सैरंध्रीला ह्मणतो: शृंगाररसतरंगिणि ! तळमळतो संगमार्थ मत्स्य पहा. । (विराट. १.११७). याशिवाय आदि १४.१४, वन. ८.७, विराट. १.८९-९०, हरि. ३६.५८,३५,६४; इत्यादि पहा. पंतांच्या अंगी वाचकांस तल्लीन करून टाकणाऱ्या चमत्कारिक कल्पना प्रसवण्याची शक्ति अजब असून त्यांच्या बहुतेक गीतींची उत्तरार्धे अलंकारयुक्त किंवा चमत्कारिक कल्पनामय असतात. ही कल्पना प्रसवण्याची शक्ति उत्कृष्ट कवीचें एक अवश्यक अंग होय हा समजूत पंतांना मान्य होती असे पुढील गीत्यर्धातील उपमेवरून कळतें:-'बहु कल्पना सुकविसा, विजयहि बहुशरपरंपरा व्याला.' ॥ (विराट. ५.२७). कित्येक प्रसंगी त्यांचा कल्पनाविहंगम स्वप्रतिभाशक्तीच्या जोरावर चिदाकाशांत अत्युच्य भराऱ्या मारून अतिशय उदात्त, उज्वल, व हृदयंगम अशा कल्पनांसह काव्यभूमीवर प्रकट होतो. त्यांच्या बहुतेक उपमा समयोचित व अर्थगंभीर असून मूळ वर्णन वाचकांच्या मनांत चांगले उतरेल अशाच असतात. प्रसंगोचित वर्णने किंवा भाषणे यांत सुंदर उपमांची भर ह्मणजे दुधात साखर याप्रमाणे होय. पंतांच्या काव्यवाचकांस याचा प्रत्यय