या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २६३ जगद्गुरुमहेश्वरप्रभुशिरीं जिचे नांदणे, उल्लेख करण्यांत कवीने चातुर्य दाखविले आहे. मोरोपंताचें कारकुनी लिहिणे:-मोरोपंतांची भाषा त्यांच्या कारकुनी बाण्याप्रमाणेच ऐटदार, पांचापेंचांनी भरलेली, मार्मिक व प्रौढ असते असे त्यांच्या काव्यांचे मार्मिकपणाने परिशीलन करणाऱ्या वाचकांस दिसून येईल. याची केकावलीत पुष्कळ उदाहरणे आहेत. त्यांपैकी प्रस्तुत केका ही एक उदाहरण होय. मोहिनी व कथा ह्या गंगायमुनांप्रमाणे एकरूपच आहेत असें भगवंताचे म्हणणे सांगून व ज्ञाते लोक गंगायमुनांना एकरूपच समजतात असें स्वतः त्याचे पुष्टीकरण करून कवि पुन्हा लगेच जनानुभव निराळ्या त-हेचा आहे म्हणजे लोकांच्या मते यमुनेपेक्षां गंगेचें माहात्म्य जास्त आहे असे सांगतात व फिरून लोकांचा अनुभव सांगण्याबद्दल आपणास पाप न लागावे म्हणून भगवंताची विनंतिही करितात. अशा रीतीने प्रभूचे म्हणणे खुबीदार रीतीने व त्यांना राग न येईल अशा त-हेनें खंडन करण्यांत पंतांनी आपली कारकुनाची वस्तादगिरी चांगली दाखविली आहे. पेशव्यांच्या दरबारचे मुत्सद्दी व सावकार बारामतीकर खाचाखोचा असणे हे अगदी साहजिक आहे. त्यामुळे त्यांच्या काव्यांत पुष्कळ प्रौढता, गंभी रपणा व दरवारी ऐट ही आली आहेत. १. प्रास्ताविकः-यमुनेहून भागीरथी अधिक पुण्यदायिनी होय असा लोकांचा समज आहे त्याचे समर्थन या केकेंत कवि करतात. त्रैलोक्याचा गुरु दो महेश्वर प्रभु (महादेव) त्याच्या मस्तकावर. खुबीदार शब्दयोजनाः-गंगेचें श्रेष्ठत्व स्थापण्याकरितां कवीने 'जगद्गुरुमहेश्वरप्रभुशिरीं' ह्या प्रथम पदाची योजना केली आहे. आधी कोणाच्याही शिरावर नांदणे हा मोठा मान, प्रभुशिरी नांदणे तर त्याच्याही पेक्षा मोठ्या योग्यतेचे, त्यांत तो प्रभु जगद्गुरु व साक्षात् महेश्वर असल्यावर मग योग्यतेला काय विचारावयाचे आहे. सारांश महादेवासारख्या जगद्गुरूच्या शिरावर नांदणारी भागीरथी निःसंशय अत्यंत मोठ्या योग्यतेची असली पाहिजे. कथासंदर्भ:-हालाहलविष प्राशन केल्यामुळे झालेला संताप दूर करण्याकरितां त्रैलोक्यगुरु महादेव याने आपल्या मस्तकावर चंद्र व गंगा धारण केली, गळ्यांत व बाहूंत सर्पमाळा धारण केल्या, अंगास विभूति चर्चिली, थंड अशा व्याघ्रचर्मावर आसन ठोकिलें व कंठाचे ठिकाणी अहोरात्र रामनाम धारण केलें. शिवाने मस्तकी गंगा धारण करण्याचे दुसरे कारण असे सांगितले आहे की, जेव्हां आकाशांतून गंगा पृथ्वीवर उतरली तेव्हां तिचा प्रवाह इतका मोठा व जोराचा होता की, जर शिवाने मध्ये येऊन तिला आपल्या जटेत घेतले नसते तर पृथ्वी जलमय होऊन गेली असती. गूढार्थः-महादेवास महा राख आपल्या अंगास चर्चावी लागते. त्याची वसती ज्या ठिकाणी ह्या पविकारांची चिता रात्रंदिवस पेटत आहे अशा पवित्र स्मशानांत असते. त्याचा तृतीय नेत्र अर्थात् ज्ञाननेन प्रगट झालेला असतो. तीव्रयोगसाधनार्थ व्याघ्रचर्माचेंच तो आसन करितो. गाढ निजलेली कुंडलिनी