या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत तिच्या जळमळे तुळे न शरदिंदुचें चांदणे, । प्रजा हरिहँरां अशा यदुंदरी अनेका; कवी योगसाधनाने जागी झाल्यामुळे जेव्हां षड्चक्रांचे भेदन करूं लागते तेव्हां योग्यास प्राणांत वेदना होतात. तेव्हां ह्या हालाहल विषाच्या शमनार्थ तो मनाचा पुत्र चंद्र व सहस्रदळांतून उत्पन्न झालेली त्रिवेणी धारा (गंगा) ही मस्तकी धारण करितो. खेच-यादि मुद्रा धारण केल्यामुळे सर्पभूषणे सहजच त्याच्या अंगावर शोभतात. २. ज्या गंगेचें. यांत कवीने गंगेचें श्रेष्ठत्व स्थापित करण्याचा यत्न केला आहे. ३. वसति, राहाणे, नांदणूक. अन्वयार्थः'जिचे (ज्या गंगेचें) नांदणे (राहणे) जगद्गुरुमहेश्वरप्रभुशिरी (जगद्गुरु जो शंकर, त्याच्या डोक्यावर) [असे], जिच्या जळमळे (पाण्यावरील फेंसाशीं) शरदिंदुचें (शरदृतूंतील) चांदणें न तुळे (तुळत नाहीं, बरोबरी पावत नाहीं), यदुदरी (जिच्या उदरांत) हरिहरा अशा (विष्णु व शंकर यांसारख्या) अनेका प्रजा (पुष्कळ संतति) [आहेत]; कवी (ज्ञाते पुरुष) जशी सुधा (अमृत) तशी काकवी (राब) [असें] भिऊनि (राजाला किंवा इतर दुसऱ्या अधिकाऱ्याला भिऊन) कां म्हणतील (काय म्हणून अभिप्राय देतील)? प्रथमचरणार्थ:-ज्या भागीरथीची योग्यता एवढी मोठी आहे की त्रैलोक्यपति महादेव याने तिला बहुमानाने आपल्या मस्तकावर धारण केली आहे. १. जळावरील मळानें, जळावरील फेंसानें. द्वितीयचरणार्थः-शरदृतूंतील चांदणे फार स्वच्छ असते; पण भागीरथीच्या उदकावरील फेंसाची कांहीं त्याच्याने बरोबरी करवत नाहीं. फेसाची बरोबरी करवत नाहीं मग जळाची बरोबरी कोठून होणार? गंगेच्या पाण्यावरील फेंस सुद्धां शरदृतूंतील चांदण्यापेक्षा अधिक शुभ्र, मग पाणी अत्यंत शुभ असेल यांत नवल ते काय? यांत काव्यापत्ति अलंकाराची छटा विरोधाभास अलंकारांत मिसळल्यामु दुधात साखर पडल्याप्रमाणे अलंकारांचा स्वाद वाढला आहे. २.शरदृतूंतील चंद्राचें. शरदृतूंत चांदणे स्फटिकासारखें किंवा दुधासारखें अत्यंत शुभ्र असते. कालिदासाने राजाच्या कीर्तिपांडुरत्वाला 'शरच्चंद्रमरीचिवत्' म्हटलेले आमच्या वाचकांस माहित असेलच. ३. संतति. तृतीयचरणार्थ:- ज्या गंगेच्या उदरांत शिवविष्णूसारखी अनेक पराक्रमी मुले आहेत. ज्यांची प्रेतें गंगेत पडतात अथवा जे सर्वकाळ गंगेत स्नान करितात ते सर्व शिवरूप किंवा विष्णुरूप होतात असें 'गंगामाहात्म्यां'त सांगितले आहे. पुढील अवतरण पहा:(१) सुकवि म्हणति हरिहरता देसी तूं भलतशाहि देहरता.' । [गंगास्तुति-६४ पृ० ५२]. (२) "तुवां केलें प्राणी हरिहर,' असें आयकविते । न मच्चित्ता वेडे करितिल कसे आइ! कवि ते." ।। मोरोपंत-गंगास्तव-५]. (३) 'मज्जन तव प्रवाही करितां, होतात हरिहर प्राणी.' [मोरोपंत-गंगास्तुति-गीति ४४]. (४) "भक्तांसि करिसि हरिहर तूज म्हणति सिद्धि मग न कां 'जी जी" ? [गंगास्तुति-गीति ७७ पृ० ५३]. (५) 'कैलासी वैकुंठी हरिहर तव तोय करुन दे वसती.' ॥१० [मोरोपंत-गंगाप्रार्थना] ४. हरि (विष्णु), हर (शंकर) यांसारख्या. ५. यत्+उदरीं= जिच्या पोटांत, अर्थात् ज्या गंगेच्या पोटांत. ६. ज्ञाते, सुज्ञ पुरुष. प्रथम तीन चर