या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत त्या परमवैराग्यशील राजास अवधूत वेषाने फिरणाऱ्या परमभागवत शुकाचायीनी सात दिवसांत साग्र भागवत ऐकविलें. 'जो चिदाकाशींचा पूर्णचंद्र । जो योगज्ञाननरेंद्र । बोलता झाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परिक्षिती. ॥' एक. भाग. १.१८१). शुकोदित पुराण-भागवतपुराण. भागवताविषयींची संक्षिप्त माहिती:-'यत्राधिकृत्य गायत्रीं वर्ण्यते धर्मविस्तरः । वृत्रासुरवधोपेतं तद्भागवतमुच्यते ॥ १॥ सारस्वतस्य कल्पस्य मध्ये ये स्युनरामराः । तद्वृत्तांतोद्भवं लोके तद्भागवतमुच्यते ॥ २ ॥ अष्टादश सहस्राणि पुराणं तत्प्रकीर्तितम् ।' (भावार्थ-ज्यांत धर्माचे विस्ताराने वर्णन केले आहे, ज्याचा गायत्रीने आरंभ होतो, ज्यांत वृत्रासुराचा वध वर्णिला आहे, ज्यांत सारस्वत कल्पांतील देव व मनुष्य यांचे वृत्त आहे, तें भागवतपुराण. त्यांत १८,००० श्लोक आहेत.) पुराणांच्या यादींत या पुराणाचे पांचवें स्थान आहे. पद्मपुराणांत मात्र भागवत हे सर्वपुराणांचे सार आहे. असे सांगून त्यास अठरावें स्थान दिले आहे. ह्याचे बारा भाग आहेत. प्रत्येक भागास स्कंध असें नांव आहे. एकंदर अध्याय ३३२ आहेत. व्यासपुत्र शुकाचार्य याने परीक्षिति राजास जे सांगितलें तेंच सूताने नैमिषारण्यांतील ऋषींस सांगितले आहे. मोरोपतांनी भागवताच्या आधारानें गीतिछंदांत मंत्रबद्ध रचना केली आहे. त्यांतील ग्रंथसंख्या ३५९२ आहे. भागवत ग्रंथाच्या रचनेविषयी त्याच ग्रंथांत असे सांगितले आहे की प्रथम वेदव्यासाने वेदाची व्यवस्था लाविली व त्याचे चार भाग करून त्याने ते पैलादि ऋषींस वांटून दिले. नंतर त्याने ज्यास पंचमवेद ही संज्ञा आहे अशी इतिहासपुराणे रचिली व ती सूतपुत्र लोमहर्षण ह्याचे स्वाधीन केली. परंतु वरील ग्रंथही स्त्रीशूद्रादि अज्ञजनांस अप्राप्य जाणून त्याने महाभारत रचिलें त"पि त्याचे मन स्वस्थ झाले नाही. पुढे तो एकदां चिंताग्रस्त होऊन सरस्वतीतटाकी भ्रमण करित असतां त्यास गुरु नारद भेटले व त्यांनी त्यास ज्यांत वासुदेवाच्या भक्तीविषयी विशेष असेल अशा ग्रंथाची रचना कर म्हणजे तुझें मन स्वस्थ होईल असा उपदेश केला. त्यावरून त्याने भागवत रचिलें. भागवत बोपदेवानें रचिलें असाही काहीजणांचा समज आहे. ३. पुराणाविषयी अल्प माहितीः--पुरातन अनेक युगांतील कथांच्या ग्रंथांना पुराणे म्हणतात. एकंदर पुराणे अठरा आहेत. 'स्त्रीशूद्रद्विजवंधूनां न वेदश्रवणं मतं । तेषामेव हितार्थाय पुराणानि कृतानि च' ॥ म्हणजे स्त्रिया, शूद्र व पतित ब्राह्मण यांना वेदश्रवण करणे विहित नसल्यामुळे त्यांच्या हितार्थ व्यासांनी अठरा पुराणे केली असें 'देवीभागवत' पुराण स्कष १ अ० ३ यांत सांगितले आहे. तसेंच स्त्रिया व शूद्र यांना धर्मज्ञान व्हावे म्हणून पुराणे राचला असें वेदभाष्यकार सायणाचार्य यांनी लिहिले आहे. त्यावरून पुराण ग्रंथांच्या रचनेचा देश कळून येतो. प्रत्येक पुराणाची पांच लक्षणे अवश्य मानिली आहेत. ती पांच लक्षणे अशी:-'सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च। वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणं' (अमरकोश) (अर्थ:-उत्पत्ति, पुनरुत्पत्ति, देवप्रजापतींचे वंशकथन, मन्वंतरवर्णन व सूर्यचंद्रवंशी राजांचा इतिहास ही पांच लक्षणे असलेल्या ग्रंथांस पुराण म्हणावें.) पुराणांची नांवे पुढील श्लोकांत दिली आहेत:-'ब्रह्मांभोरुहविष्णुवायुभगवत्संज्ञं ततो नारदं । मार्कंडेयमथाग्निदेवतमिति प्रोक्तं भविष्योत्तरं ।। तस्मात् ब्रह्मविवर्तसंज्ञमुदितं स्कंदं वराहं तथा । लैंगं वामनमत्स्यकूर्मगरुड