या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २६९ ब्रह्मांडमष्टादश ॥' तसेच 'देवीभागवत' पुराणांत पुराणनामांच्या प्रथमाक्षरांचा उल्लेख पुढील एका श्लोकांत केला आहे:-'मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयं । नालिंपाग्नि पुराणानि कुस्कं गारुडमेव च ॥' या श्लोकावरून मुख्य पुराणांची खालील नांवें निवतात:-(दोन 'म') मत्स्य, मार्कंडेय, (दोन 'भ') भागवत, भविष्योत्तर, (तीन 'ब्र') ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, (चार 'व') वामन, वायु, विष्णु, वराह, (नालिंपाग्नि) नारद, लिंग, पद्म, अशि, (कुस्क) कूर्म, स्कंद, आणि (गारुड) गरुड. 'पुराणांचे वर्ग तीन रीतींनी करितां येतात. पहिली रीति त्यांच्या विशालत्वलघुत्वावरून वर्ग करण्याची. दुसरी त्यांच्या आराध्यदैवतावरून वर्ग करण्याची. तिसरी त्यांच्या सत्वादि गुणावरून. पहिल्या रीतीने पुराणांचे पुराणे व उपपुराणे असे भेद होतात. दुसऱ्या रीतीने मुख्य पुराणांचे वैष्णव पुराणे, शैव पुराणे, शाक्त पुराणे व एतद्भिन्न पुराणे असे चार वर्ग होतात. तिसऱ्या रीतीने मुख्यपुराणांचे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी असे तीन वर्ग होतात. सत्वगुणी पुराणांत विष्णूचें माहात्म्य फार असते, रजोगुणी पुराणांत ब्रह्मदेवाचे विशेष वर्णन असून तमोगुणी पुराणांत शिवाचें माहात्म्य फार वर्णिले आहे. श्रीमद्भागवतांत एकंदर पुराणसंहिता चार लक्ष सांगितली आहे. पुराणग्रंथांची सामान्य सरणी प्रायः प्रश्नोत्तररूपाने असते व विष्णु, शिव व शक्ति हीच पुराणांची मुख्य उपास्य दैवतें होत. (जनार्दनपंत मोडकांचा निबंध.) वर अठरा पुराणांची नावे सांगितली आहेत त्यांतल्या भागवत व वायुपुराणाच्या ऐवजी कांहीं स्थळी देवीभागवत व शिवपुराण ह्या दोहोंची योजना केलेली आढळते. पुराणांप्रमाणे उपपुराणेही अठराच मानिली आहेत. तरी त्यांच्या नांवांत पुष्कळ फरक केलेला आढळतो. देवीभागवतांत उपपुराणांची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे:-सनत्कुमार, नारसिंह, नारदीय, शिव, दुर्वास, कपिल, मानव, औशनस, वरुण, कालिका, सांब, नंदी, सौर, पाराशर, आदित्य, माहेश्वर, भागवत व वशिष्ठ. कित्येक ग्रंथकार यांतील वशिष्ठ, सांब, मानव व शिव या चार उपपुराणांची नांवें गाळून त्या जागी गणेश, अंबिका, मारीच व मुद्गल ही चार नांवें घालतात. पुराणग्रंथांतून पूर्व युगांतील पुष्कळ गोष्टी सांगितल्या असून त्यांत चातुर्यार्थ नवरसयुक्त अशा लाक्षणिक कथा पुष्कळच सांगितल्या आहेत. ४. साधूच्या मुखाने. अन्वयार्थः-ज्या (ज्या पुरुषाला) शुकोदित पुराण (शुकाचायाने परिक्षितीस सांगितलेलें भागवतपुराण) सन्मुखें (साधूच्या सुखाने) साग्रही (समग्र, संपूर्णेही) श्रवण (श्रुत झाले), [तो] कथा (भगवत्कथा) अतुला (निमपसार म्हणेल झणि (कदाचित्) तो आग्रही (पक्षपाती) [असे तुम्ही म्हणाल; मलाचि मिला मोरोपंतालाच) हे (ही कथा) निरुपमा (अनुपमेय) यशोमंडिता (पतितांचा उद्धार केल्यामुळे मिळणाऱ्या कीर्तीने शोभित अशी) न गमे (वाटत नाही) तर गुरूसही (तुमचा गुरु जो सांदीपनी त्यालाही) [ती] [निरुपमा यशोमंडिता गमे, स्ववरदा (आपल्याला वर देणाया) महापंडिता (भक्तिज्ञानसंपन्न अशाला) गुरूसी पुसा (विचारा). 'शुकोदित...कथा' याचा अर्थः-ज्याने साधूच्या मुखाने श्रीमद्भागवत श्रवण केलें तो भगवत्कथा तुलनारहित आहे असाच उद्गार काढील. श्रीमद्भागवतांत भगवत्कथेचें माहात्म्य अतिशय सुरस वर्णिले आहे. ते वाचण्यांत किंवा तीन २४ मो० के०