या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि.. २७३ गोडी लागली. पुढे याची माता अकस्मात् सर्पदंशाने मरण पावली तेव्हां याच्या अंगांत अत्यंत वैराग्य बाणून हा लहान असतांही तपश्चर्या करण्याकरितां अरण्यांत निघून गेला. तेथें याने उग्र तप करून भगवंतास प्रसन्न करून घेतले. भगवंतांनी याला हृदयाकाशांत दर्शन देऊन अन्यजन्मी मी तुला प्रत्यक्ष भेटेन; तोपर्यंत तूं माझी भक्ति करित अस असे सांगितले. तेव्हांपासून ह्याने मरेपर्यंत ईश्वराची नामें व चरित्रे गात व पृथ्वीवर संतुष्टमनाने संचार करित दिवस काढले. पुढे प्रस्तुत कल्पी हा ब्रह्ममानस पुत्र झाला. ही कथा भागवत प्रथमस्कंध अध्याय ५-६ यांत स्वतः नारदानें व्यासाला सांगितली आहे. [हरिवंश' नामक ग्रंथांत या देवीचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे:-याची शरीरकांति दैदीप्य अग्नीप्रमाणे सतेज आहे, नेत्रांचें तेज बालाकंवत् आहे, मस्तकावर जटाभार बांधला असून, शरीर सुवर्णभूषित आहे, यानें कक्षेत एक मोठी वीणा बाळगली असून चंद्रकरप्रभ असें शुक्लवस्त्र परिधान केले आहे, याने कृष्णमृगचर्माने आपली काया आच्छादिली असून हस्तांत दंडकमंडलु घेतले आहेत, ह्याच्या तेजावरून हा दुसरा इंद्रच की काय असा भास होतो, हा त्रिभुवनांतील गुप्तकलहांचा ज्ञाता असून स्कंदासारखा ब्रह्मचारी आहे, या देवर्षीस कलहप्रिय म्हणत असतात, हा विद्वान् असून गानकलेत निपुण आहे, हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असून जणूं काय अन्य कलीच आहे, हा देव व गंधर्वलोकांचा आदिवक्ता व मुनिसत्तम आहे, हा चतुर्वेदांचे पठण करणारा असून यज्ञांत मुख्य याशिक याची स्तुति करितात, या महषीस नारद म्हणतात, हा चिरंजीव असून याचा ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोकांत अप्रतिहतसंचार आहे .] पुराणांतून नारद या नांवाचे अनेक ऋषि वर्णिले आहेत. त्या सर्वांत वर वर्णिलेला देवर्षि मुख्य होय. नारदाचें अस्थिरत्वः-दक्षप्रजापतीने सृष्टयुत्पत्ति करण्याकरिता जे सहाहजार पुत्र निर्माण केले त्यांना या नारदानें ब्रह्मोपदेश करून सृष्टयुत्पत्तीच्या कार्यापासून पराङ्मुख केले त्यामुळे एकाच ठिकाणी फार वेळ तुझा संचार होणार नाही असा दक्षाने याला शाप दिला. त्यामुळे नारदाचे एकास्थळीं वास करणे केवळ कार्यापुरतेच होत असून हा त्रैलोक्यांत अखंड भ्रमण करित असतो. असें आहे तरी भगवत्कथा चालली आहे अशा स्थळी अस्थिर नारदाला भगवत्कथा चालू आहे तोपर्यंत एकाच ठिकाणी रमतां येत असे. तसेंच भगवदवताराच्या समीप ही नारदाला शापाची बाधा होत नसे. 'दक्षशाप न बाधी कृष्णापाशीं । म्हणोनि नारद वसे द्वारकेशी' । (एक० भाग० अ० १ ओ० २७८). देवर्षि नारदाचें माहात्म्य पुढील तीन 'शिवलीलामृती' ओव्यांत श्रीधरस्वामीनें सुरस वर्णिले आहे:-'वाल्मीक, सत्यवतीनंदन, औत्तानपादित कयाधुहृदयरन, । हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण । वंद्य जे कां सर्वांतें. ॥ ११.१४६ ॥ जो चतुःपष्टिकळा प्रवीण निर्मळ । चतुर्दश विद्या करतळामळ । ज्याचे स्वरूप पाहतां केवळ । नारायण दसरा की. ।। १४७ ॥ हे कमलभवांड मोडोनि । पुन्हा सृष्टि करणार मागुतेनि । अन्याय विलोकितां नयनीं । दंडें ताडी शक्रादिकां ॥ १४८॥' नवविधाभक्तिपैकी नारदाची 'कीर्तन' भक्ति होती. 'परिक्षित् श्रवणं चक्रे, कीर्तनं नारदः शुकः, । स्मरणं शिवप्र-हादौ, लक्ष्मीश्च पादसेवनं, ॥ २ ॥ अर्चनं पूजनं ध्यानं पृथुराजादिभिः कृतं, । वंदनं युद्धवाक्र्रौ, दास्यं ता_हनूमतौ, ॥ ३ ॥ सख्यमर्जुनकर्तव्यं, बलेश्चात्मनिवेदनं । भक्तिं नवविधां कृत्वा कैवल्यं प्राप्यते परं.॥४॥ (कपिलगीता अ० ४)