या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ मोरोपंतकृत स्वभक्तसुरपादपा! सैफळ हे असो कामना. ॥ ११३ सुरर्षि म्हणतो, 'तुझें यशचि धन्य; यो गायना (१) निश्चय करुनि, न मागे तिळही ठेवी पतिव्रता चरण, । भगवद्भजनी माझी तैसीच करू मति व्रताचरण. ॥ ३० ॥ (२) हरिकीर्तनी शिरावें, धनिकगृहीं जेवि जपुनि चोरानें, । न उठावें बहुकार्ये, बहुभारें जेंवि कुचर ढोरानें ॥३५॥ (३) म्यां कीर्तना टपावें, मार्जारें सर्वदा जसे दुग्धा ।। ॥३८॥ (४) कीर्तन असो मतिस बहुमत, जैसें स्त्रीस हळदकुंकु तरी; ॥४३॥ (५) आवड असो कथेची, जशि बाळा फाल्गुनांत पुनवेची. ॥ ४७॥ (६) ज्यांत न हरि-हरिजन-यश ऐसे में काय कीर्तनीं गान । तें अलवण भोजनसें नच सेवुत आर्तबाळसे कान.' ॥ ५४ ॥ १. आपल्या भक्तांच्या कल्पवृक्षा! सुरपादप-देवगुम, कल्पतरु. भक्तकामकल्पद्रुम प्रभो! व्यु:-पादैः (मूलैः) पिबति स पादपः, जो मुळांनी रस शोषण करितो तो पादप (वृक्ष). चतुर्थचरणार्थः-देवा! तूं भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा आहेस तेव्हां भगवत्कथेत माझें मन तुजप्रमाणेच अत्यंत स्थिर होवो अशी जी मी आपणांस प्रार्थना केली आहे ती पूर्ण करणे तुमच्याकडेच आहे. म्हणून तुम्ही मजवर दया करून माझी एवढी इच्छा पूर्ण करा. 'स्वभक्तसुरपादप' हे पद साभिप्राय आहे म्हणून हा परिकर अलंकार होय. [मागें पृ० ३ टीप ३ पहा.] २. फलयुक्त, परिपूर्ण. ३. इच्छा, वासना. ४. प्रास्ताविकः-भगवत्कथेचा महिमा जाणून नारद सदा भगवद्गुणगायनांत निमग्न असतो असें कवि यांत सांगतात. अन्वयार्थः-सुरर्षि (देवर्षि नारद) म्हणतो:तुझें (भगवंताचें) यशचि (कीर्तिच) धन्य (मंगलप्रद, कल्याणकारक); मला (नारदाला) गायना (गाण्याकरितां किंवा गाणान्यास) यो (येवो); ते कवि (ज्ञानी पुरुष) अन्ययोगायना (भगवद्गुणांहून इतर जे योगमार्ग त्यांना) सुखद (सुख देणारे) म्हणोत; तो (नारद) तदितरें (भगवद्गुणकीर्तनाहून दुसरी) विमुक्तिबहुसाधनं मोक्षप्राप्तीची पुष्कळ साधनें) गणीनाच (तुच्छ मानतो); [आणि] वरवल्लकी (श्रेष्ठवीणा, अर्थात् ब्रह्मवीणा) सजूनि (सजवून) मग] तव (तुझ्या, भगवंताच्या) सभांगणीं (सभांगणांत, भगवंताच्या मंदिरापुढे) नाचतो (नृत्य करितो). प्रथमार्धाचा अर्थः-देवर्षि म्हणतात:-भगवंताची कीर्तिच केवळ कल्याणप्रद आहे म्हणून ती माझ्या गाण्यांत येवो, वशिष्ठवामदेवादि इतर ज्ञानी पुरुष भगवद्गुणांजन इतर जे योगमार्ग किंवा योगसाधनोपाय ते सुख देणारे आहेत असे पाहिजे असल्यास म्हणोत. सनकसनंदनादि ज्ञानी पुरुषांनी जरि अन्य योगसाधनें ही कैवल्यशादीची साधने आहेत असे समजून भगवत्प्राह्यर्थ त्यांचा आश्रय केला, तथापि नारदाच्या मते भगवद्गुणवर्णनच अत्यंत श्रेयस्कर असल्यामुळे तेच आपल्या गा तून नेहमी यावे अशी त्याची इच्छा. ५. कीर्तिच, भगवद्गुणवर्णनच. व्यु:-'व्याप्नोति इति यशः' जे चहूकडे पसरतें तें यश=(कीर्ति). ६. येवो. व्या:-यो' हे महाराष्ट्रभात 'ये। ह्या धातूचे केवळ ग्राम्यरूप आहे. ह्याची उदाहरणे पंतांच्या व इतर कवींच्या काव्यांतून पुष्कळच आढळतातः-(१) 'असुरेंद्र म्हणे हंसी! त्वरितचि यो भद्रनट पुरांत, नया' । [हरिवंश-अ०