या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २७७ मला; कवि म्हणोत ते सुखद अन्ययोगायना.' । ३५ गी० ९२], (२) 'प्रेमोपायन घेउनि भेटाया धन्य यो, गया गमला.'। [भागवत एकादशगी० २८७], (३) 'मागे वरुण, पुढे हरि, उजवा यम, आणि यो धनद डावा.' । [गदापर्व-अ० १ गी० २५.] ७. गाणायास. व्या०:-गै+अन् गायन. अन् प्रत्यय अकर्मधातूस लागून कर्तृत्ववाचक शब्द उत्पन्न होतात. जसेंः-ज्वलन (जाळणारा), मंडन (शोभविणारा) इ०. 'गायना' म्हणजे 'गाण्याकरितां' असाही अर्थ केल्यास प्रशस्त. नारदाच्या मतें भगवद्गुणवर्णन करून भगवत्प्राप्ति करून घेण्याचा भक्तिमार्ग इंद्रियांचा निरोध करून तद्वारा ईशप्राप्ति करून देणाऱ्या योगमार्गापेक्षां निःसंशय श्रेष्ठ होय. १. जे म्हणणार असतील ते; किंवा प्रसिद्ध वशिष्ठवामदेवादि ऋषिवर्यः २. अन्य (इतर)+योग+अयना (स्थाना, मार्गाला)=इतर योगसाधनास किंवा योगमार्गास. योगाविषयी संक्षिप्त विवेचन:-'चित्तवृत्तीचा निरोध करून तिचा स्वतःमध्ये लय करून द्रष्टा जेव्हां स्वरूपानुभवांतच निमग्न होऊन राहातो तेव्हां त्या स्थितीस योग म्हणतात' अशी योगशास्त्राचे मुख्य प्रवर्तक जे महर्षि पतंजली ह्यांनी योगाची व्याख्या केली आहे. योगाची अंगें आठ आहेतः-यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधि. 'दुसयाला पीडा न देणे, सत्यभाषण, परवस्तूचा अभिलाष न धरणे, वीर्यरक्षण करणे, व पंचभोगांकडे लक्ष्य जाऊ न देणे' ह्याला 'यम' म्हणतात. 'अंतर्बाह्य पवित्रता, संतोष, (चित्तशुद्धि करणारी कम करणे) तप, पवित्र मंत्रांचे व अध्यात्मग्रंथांचे पठण करणे, व ईश्वरपूजन' ह्याला 'नियम' म्हणतात. 'यम, नियम'ही दोन अंगें मिळून वैराग्यकला होते. तिसरे अं ग आसनास (आत घेण्याचा वायु) व प्रश्वास (बाहेर सोडण्याचा वायु) यांची गतिन थर करणे ह्याला 'प्राणायाम' म्हणतात. हे योगाचे चवथें अंग-'आसन' व 'प्राणायाम' मिळून अभ्यासकला होते. 'चित्ताचा आत्मस्वरूपी लय करून इंद्रियांचे लक्ष्य विषयांपासून मागे परतवून ते आत्मस्वरूपी लीन झालेल्या चित्ताकडे लावणे याला 'प्रत्याहार' म्हणतात. 'चित्ताला कोणत्याही स्थानों बांधून ठेवणे' ह्याला धारणा म्हणतात. या धारणेचा एकसारखा जो अनुभव' त्याला ध्यान म्हणतात. 'धारणा आणि ध्यान यांचे संबंधांत मनाचा लय होऊन त्या वेळेस दुसऱ्या कशाचाही अनुभव न होणे याला समाधि म्हणतात. 'धारणा, ध्यान व समाधि' या तिहींना एकत्र मिळून संयम म्हणतात. 'प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधि ही चार अंगें मिळून समाधिकला होते. समाधि. कला व वैराग्यकला मिळून राजयोग होतो. अभ्यासकलेला हटयोग म्हणतात. 'ह' म्हणजे सूर्य व 'ट' म्हणजे चंद्र या दोन नाड्यांतून वाहाणाऱ्या वायूंचा (प्राण व अपान यांचा) प्राणा- यामांत योग करावा लागतो म्हणून 'हटयोग' हे नाव पडले आहे. हटप्रदीपिकेंत 'आसन. कुंभक, मुद्रा व नादानुसंधान' अशी हटयोगाची चार अंगें सांगितली आहेत. हटयोगांत चव. यायशी आसने सांगितली असून त्यांतली अठरा मुख्य आसनें हटप्रदीपिकेंत सांगितली आहेत. त्या अठरांतही सिद्धासन मुख्य समजतात. 'वाम पायाचा तळवा गुदाच्या आणि उपस्थाच्या मध्यप्रदेशी ठेवून दक्षिण पाय शिश्नावर घ्यावा आणि हनुवटी होईल तितकी छातीवर ठेवन व