या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ मोरोपंतकृत इंद्रियें विषयांपासून परावृत्त करून दोन्ही भिवयांच्या मध्ये दृष्टि ठेवून राहाणे याला मोक्षद्वार कपाट उघडणारे सिद्धासन म्हणतात.' (हटप्रदीपिका) 'ज्ञानेश्वरी'त गुद व लिंग यांच्यामधील शिवण उजव्या पायाच्या टांचेनें दाबून त्यावर डावा पाय ठेवण्याचे वज्रासन प्रशस्त म्हणून सांगितले आहे. वरील दोन्ही आसनांत 'मूलबंध' साधतो. (पायाच्या खोटेने गुद व लिंग याज मधील शिवण जोराने दाबून गुदाचे आकुंचन करणे व अशा रीतीने 'अपान' वायूचें अधोगमन बंद करून त्याला ऊर्ध्वगमनी करणे ह्यालाच 'मूलबंध' म्हणतात.) आसनानंतर प्राणायाम करितात 'पूरक, कुंभक, रेचक' अशी प्राणायामाची तीन अंगे आहेत. बाहेरचा वायु नासिकाद्वारे हळुह आंत ओढण्याच्या क्रियेस 'पूरक' (भरणे, पूर्ण करणे) म्हणतात. तो वायु बाहेर जाऊ न देत मस्तकरूपी कुंभांत सांठवून ठेवणे ह्याला 'कुंभक' म्हणतात. नंतर त्या कोंडलेल्या वायूस हळुहद नासिकाद्वारे बाहेर सोडणे ह्याला 'रेचक' (सोडणे) म्हणतात. आठ मात्रांनी पूरक केला तर बत्तीर मात्रांपर्यंत कुंभक करावा व मग सोळा मात्रांनी रेचक करावा असे क्षुरिकोपनिषद्दीपिकेंत नारा यण सांगतात. सुमारे साडेबारा सेकंड पूरक करून पन्नास सेकंड कुंभक करावा व मग पंचवीर सेकंड रेचक करावा असे केले म्हणजे तो कनिष्ठप्रतीचा प्राणायाम होतो. प्राणायामाची बाराप झाली म्हणजे त्याला 'प्रत्याहार' म्हणतात. प्रत्याहाराची बारापट झाली म्हणजे 'धारणा' होते म्हणजे धारणेत सारखा दोन तास प्राणाचा अवरोध होतो. धारणेची बारापट झाली म्हणजे 'ध्यान' होते. अर्थात् अहोरात्र (२४ तास) मस्तकांत श्वास कोंडून राहिला म्हणजे त्याला 'ध्यान म्हणतात. ध्यानाची बारापट केली म्हणजे एक 'समाधि' होते. यावरून बारा दिवसांचा समाधि काल ठरतो. योग करणाऱ्याने प्रथम 'यम' 'नियम' साधून मग चैलाजिनकुशाचे पवित्र जागें भासन माडावे. नंतर त्या.. वर सिद्धासन किंवा वज्रासन घालून मूलबंध साधावा. पुढे नाभीच्च ठेकाणी कोंडलेला वायु उडियान पा. ध साधून 'सोहं' मंत्रोच्चार करित वर ओढावा. (नाभीच्ट परच्या उदरप्रदेशास पश्चिमताण देणे म्हणजे त्याचे पाकना पण करणे ह्या क्रियेला उडि पानबंध म्हणतात.) तसेंच कंठ आकुंचित करून मान ने पाकविता हनुवटी हृदयाच्या ठेववेल तेतकी जवळ ठेवून जालंधर बंध साधावा. दृष्टि अधोन्मीलित करून नासिकाग्री ठेवावी किंवा पृष्टि ऊर्ध्व करून (बुबुळे वर करून) भ्रूमध्यस्थानी एकाग्रतेने लक्ष्य लावावे. तसेंच पोंक्त रीतीने प्राणायाम करून, ॐकाराचें, 'सोहं' मंत्राचे किंवा इतर गुरूपदिष्ट मंत्राचे मनन करावें व आपल्या आराध्य देवतेच्या मोहरीच्या आठव्या हिश्श्याएवढ्या बारीक सावयव मूर्तीचे ध्यान करावे. याविषयी 'नीलतोयदमध्यस्था विद्युल्लेखेव भास्वरा । नीवारशुकवत् तन्वी पीता भास्वप्रणपमा' ॥ (नीलमेघस्थ विजेप्रमाणे प्रकाशमान, पिवळी, ठिणगीएवढी व धानाच्या शेंड्याच्या गग्राएवढी बारीक अशी प्रभूची मूर्ति आहे.) असा उपनिषदाचा आधार आहे. आराध्यदेवतेच्या तिसक्ष्म मातीच्या ध्यानाऐवजी षण्मुखी मुद्रा साधून, व बुबुळे वर चढवून भ्रूमध्यस्थानी एकाग्र चत्त करून, मस्तकांत ब्रह्मरंध्राचे ठिकाणी सुवर्णकमळांतर्गत नीलाकाशगुहेत प्रकाशमान होणाऱ्या सवितृदेवाच्या वरेण्य भर्गाचे' ध्यान करितां आले तर अत्युत्तमच. ['मुखनासाक्षिकर्णीतान् अंगुलीभिनिरोधयेत । तत्वोदय मिति ज्ञेयं षण्मुखीकरणं प्रियं ॥' (शिवस्वरोदय ३८२). मुख, नाकप घ्या, डोळे व कान ह्यांना दोन्ही हातांच्या बोटांनी दाबणे ह्याला तत्वोदय करणारे 'घण्मुखी