या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० मोरोपंतकृत दाहावी खिडकी म्हणतात) द्वारांतून मेंदूच्या वरती अधर असें सातवें 'सहस्रदळ कमळ' (येथे 'सहस्र' शब्द अनंतवाची आहे.) आहे तेथें प्रवेश करिते. या कमळाची कांति अवर्णनीय आहे. वर्णनच करावयाचे म्हणून कोणी ती सुवर्णवत् आहे, कोणी कर्पूरवत् आहे असे लिहितात. मनुष्यदेहांतील परमात्म्याचे विश्रांतिस्थान हेच होय. ह्यालाच त्रिकुटशिखर, मेरुशिखर (पाठीच्या कण्याला मेरु म्हणतात), इत्यादि नांवे आहेत. उन्मनीचे लावण्य, तूर्येचे तारुण्य, आकाराचा प्रांत, मोक्षाचा एकांत, महाभूतांचे वीज, महातेजाचें तेज, योगगुमाचे फळ, आनंदाचे चैतन्य असें अनादि अगण्य परमतत्व याच ठिकाणी सांठविले आहे. सत्रावी जीवनकळा, (हिलाच 'अमृताचा झरा' किंवा 'कामधेनूचा पान्हा' म्हणतात) किंवा आत्म्याची प्रभा येथेच असून तिच्यांतून एक अमृतबिंदु अक्षय स्रवत असतो. तो हल्ली जठराग्नीवर पडून फुकट जातो, त्याचेच योगमार्गाने पान केल्यास मनुष्यास अमर होतां येईल असें ग्रंथांतून वर्णन आढळतें. सारांश ह्या सहस्रदलकमळांत विसांवा घेणे हेच योग्याचे आद्यकर्तव्य होय. तेथे राहाणारा अनिर्वचनीय परमात्मा हाच ज्ञानेश्वर तुकारामादि अर्वाचीन संतांचा पांडुरंग होय. राजयोग व हटयोगाचा हाच मार्ग होय. - या मार्गाचे संक्षिप्त, पण करवले तितकें स्पष्ट विवरण, श्रीसद्गुरुप्रसादाने केले. त्याचा विज्ञानयुक्त विशेष खुलासा गुरुकृपेनेंच करून घ्यावा. वेदसंहिता व उपनिषदें ह्यांतून गुप्तरीतीने सांगितलेला हा योगमार्ग पतंजलीच्या योगसूत्रांतून, तसेंच भारतभागवतादि पौराणिक वर्गात मोडणाऱ्या ग्रंथांतून विशेष खुलाशाने सांगितला आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम, सोहिरोबा, देवनाथ इत्यादि अर्वाचीन संतमंडळीने तर ह्या सुंदर यो रंदिराचे द्वार यमा मुक्त करून शोधक व तत्वदिदृक्षु मंडळीस त्यांतील अमूल्यरत्ने हवीं तिरी पूर्ण के निस्तारभयास्तव त्यांतील दोन तीनच निवडक र ची येथेच इतिश्री करितों. (१) 'दह . रा, आत्मा पाई- .. मन पुंडलिक आवरूनि धरा । तेणें येइल घरा नारायण. ॥२॥ चहूं या देहाची करुनिया वीट। विटेवरी नीट उभा असे. ॥ ३ ॥ मेरूचे शिखरी सत्रावी सुंदरी, । वैकुंठ पंढरी नांदतसे. ॥ ४ ॥ तुका ह्मणे अलक्ष लक्षावी अंतरीं । धन्य तो संसारीं जन्मा आला.' ॥५॥ (२) 'डोळ्यांची बाहुली करुनि उफराटी । पाहे ज्ञानदृष्टी ऊर्ध्वपंथा. ॥ १ ॥ त्रिकुटसंगमीं करोनि मज्जन । मग निरंजन ओळखावा. ॥ २ ॥ श्रीहाट गोल्हाटावरी भ्रमरगुंफा । तया स्थानी बापा ! दशनाद. ॥ ३ ॥ प्रणवाचे बीज, बिंदु ज्योतिकळा । तेजाचा उमाळा दुमदुमित. ॥ ४ ॥ ऐसा हा अनुभव अनुभवी जाणे । शब्दज्ञान जाणणे बहिर्मुखा. ॥ ५ ॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे । संताची हे खुण संत एक. ॥६॥ (३), 'नरदेहीं सुगम उपाय । अजपी धरी सोय । तोचि नरनारायण होय। उलटोनि पाहतां ॥ १७८ ॥ अजपा अव्यक्त गायत्री । योगियांसी मोक्षदात्री । हृदयीं पठण किजे नित्यरात्रीं । त्यासी पुनर्जन्म नाही. ॥ २६२ ॥ स्वस्वरूपाची व्हावया प्राप्ती । अभ्यास करावा नि- १. गुती । अभ्यासाची प्रथम गति । ऐसी आहे जाण पां. ॥ १२५ ॥ मुख, नासिक, नयन, । आणिक दोन्ही श्रवण । दोन्ही हातांच्या अंगुल्या कीजे निरोधन । स्थानस्थ की. ॥ १२६ ॥ ऐसें साधकें करावें । भ्रमध्य लक्ष द्यावें । नित्यनेमें अनुभवावें । श्रीगुरुकृपें. ॥ १२७ ॥ हे षण्मु. द्रासाधन । येणेंचि होय ब्रह्मसनातन । न घडे तया जन्ममरण । आपला आपण भोगितो. १२८ याबान तानच निवडक