या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६ ) पृथुकोपाख्यान, नामरसायन, केकावली वगैरे छोटी प्रकरणे वाचली असतां देखील पंतांविषयींचा दुर्ग्रह निघून जाईल. भारतभागवतादि मोठे ग्रंथ लक्ष्यपूर्वक वाचले असतां तर पंतांच्या कवितेवर चिरस्थायी प्रेमच जडेल. पंतांच्या कवितेचा मोठा गुण व्याकरणशुद्धता होय. छंदोभंग, अशुद्धप्रयोग, चुकीचे समास, समास असून संधि नाही, हस्वदीर्घाकडे दुर्लक्ष्य इत्यादि प्रकार पंतांच्या काव्यांत अतिशय विरळ असून (परिशिष्ट-ओ' पहा) भाषेच्या ठाकठिकीकडे त्यांच्यासारखें लक्ष्य इतर फारच थोड्या महाराष्ट्रकवींनी दिले आहे. तसेंच पंतांनी देशावरील निरनिराळ्या ठिकाणची व क्वचित अस्सल कोंकणची शब्दयोजना आपल्या काव्यांत केलेली आढळते. इलुसी, आखाडा, कानकोंडा, चेंगट, चेव, परसें, वरीक, मुंडासें हे शब्द याची थोडी उदाहरणे होत. तसेंच शुद्ध व सरळ मराठी भाषणसंप्रदायाचे मासले पंतांच्या काव्यांत मुबलक आढळतात (परिशिष्ट-क). काही ठिकाणी भाषेतील ह्मणीही जशाच्या तशाच त्यांनी आपल्या कवितेत ठेऊन दिल्या आहेत. फारशी, अरबी, हिंदुस्थानी ह्या परकी भाषेतील पुष्कळ शब्दांचा त्यांनी आपल्या काव्यांत उपयोग केलेला आढळतो (परिशिष्ट-अः' पहा). ___ असो. तर पंतांची कवितासुता इतकी सरस, निर्दोष व रूपयौवनसंपन्न कशामुळे झाली तें वरील अल्प विवेचनावरून वाचकांच्या थोडे तरी लक्ष्यांत येईल. पंतांची प्रतिभाशक्ति ईश्वरदत्त, संस्कृतप्राकृतभाषा त्यांस करतलामलकवत् , काव्यसाहित्यांचा त्यांचा अभ्यास उत्तम, प्रांजळ, एकाग्र, भगवद्भक्तिपरायण व व्यापक बुद्धि, चांगले व्यावहारिक ज्ञान व उत्कृष्ट सहृदयता इतके गुणगण जनकाचे ठिकाणी असल्यावर कन्या मनमोहिनी होईल यांत नवल काय ? तिच्या पायांतील नूपुरांचा झणत्कार व हातांतील सुवर्णकंकणांचा रुणत्कार ऐकूनच रसिकजन आनंदाने डोलू लागतात; मग ती तारुण्यांत येऊन जेव्हां परपुरुषासक्त होऊन बुद्धिपुरःसर कटाक्ष फेंकते, तेव्हां तिच्या अप्रतिम सौंदर्यास भुलून ते श्रृंगाप्रमाणे तिजभोंवती मंजु गुंजारव करावयास लागतात व आपले हृदयवाहु पसरून तिला प्रेमालिंगन द्यावयास सज्ज होतात यांत आश्चर्य कसचें? एथवर त्यांच्या गुणांचे व काही विशेष गोष्टींचे विवरण झाले. आता त्यांतील दोषांकडे पाहूं. पंतांच्या कवितेंतील पहिला दोष दुर्बोधता होय. संस्कृताचे अंग नसलेल्या निवळ महाराष्ट्र वाचकांस त्यांचे काव्य कठिण वाटून ते पुष्कळ ठिकाणी समजणारही नाही. संस्कृत ताच्या धर्तीवर केलेले लांब समास (परिशिष्ट-ए), संस्कृत शब्दांचा, पदांचा व वाक्यांचा भरगच्च प्रयोग (परिशिष्ट-ऐ), तसेंच लांब यमकांची सांखळी (परिशिष्ट-ह), ह्यांमुळे पंतांची कविता थोडीशी क्लिष्ट झाली आहे. दुसरा दोष पंतांची यमकाधीनता. प्रथमार्धात 'आतेला', 'ते लटिके', 'बोलका नाही', 'पाप डसे' इत्यादि शब्द शेवटी आले की 'आ तेला,' 'तेल टिके,' 'बोल कानांहीं, 'पापडसे' इत्यादि यमक द्वितीयार्धात पंतांनी शिरकविलेंच ह्मणून समजावे (परिशिष्ट-हृ). त्यामुळे कांहीं आयांचे पूर्वार्ध कथानुसंधानाने मोठे सुंदर रचिले असून उत्तराध पहा तो यमकाकरितां ह्मणून दूरान्वित, कृत्रिम व कवितेत न शोभणाऱ्या अशा ग्राम्य किंवा अप्रकृत अर्थाने युक्त असे आढळतें (परिशिष्ट-ग पहा). पंतांच्या काव्यांत प्रौढ