________________
२८२ मोरोपंतकृत विमुक्तिबहुसाधनें तदितरें गेणीनाच तो; संजूनि वैरवल्लकी तव सभांगणीं नाचतो. ॥ ११४ १. मोक्षाची पुष्कळ साधनें. द्वितीयार्धाचा अर्थः-योगयागादि भगवत्प्राप्तीच्या साधनांची प्रशंसा इतर ज्ञानी जनांनी पुष्कळहि केली तरी देवर्षि नारद त्यांना अगदी तुच्छ समजतो व सर्वांपेक्षां भगवद्गुणकीर्तनच उत्तम व त्यामुळे भगवंताची प्राप्ति अत्यंत सुलभ रीतीने होते असे समजून तो आपल्या ब्रह्मवीण्याच्या तारा यथास्थित लावून प्रभूपुढे प्रेमभराने गातो व नाचतो. कारण त्याला ठाऊक आहे की मी प्रभुकथा गात नाचत असलों म्हणजे भगवान् लवकर येऊन मला दर्शन देईल. 'ह्या अभिन्न सुखसेवे आंत । नारद आनंदें नाचत गात । शुकसनकादिक समस्त । जाहले निजभक्त येणेंचि सुखें.' ॥ (एक. भाग. १.९२.) २. समजत नाहीं, तुच्छ मानतो. भगवंताची प्राप्ति कडीकपाटी बसून तपश्चर्या करीत बसण्यापेक्षां भक्तिपुरःसर नामस्मरण केल्याने लवकर होते ही समजूत संतमंडळांतील सर्व साधूंची आहे. मोरोपंताचा पुढील श्लोक पहा:(१) श्रीरामनाम जपतां तरशील लाटीं; । हूं काय पाहसि असो भलतें ललाटी । राहें घरींच, न शिरेंहि कडे कपाटी, । तें बैसवील तुज मुक्तिशिं एकपाटी. ॥ १ ॥ [वाङ्मनःप्रार्थना]. कबीराचेही असेंच एक पद आहे. त्यांत परमेश्वर भक्तांच्या अगदी जवळ असून ते त्याचा शोध योगयागध्यानपूजातीर्थयात्रेत करितात म्हणून आश्चर्य दर्शविले आहे. तें पद असें:-(२) मोका का तूं ढूंढे बंदे मैं तो तेरे पासमें । ना मैं कोई क्रिया कर्ममें ना जोगसंन्यासमें. ॥ ध्रु० ॥ नानी पी. ना मैं मतरम मशीकैलासमें । ना रहता में श्रीद्वारका ना रहता जगन्नाथमें. ! मैं कबीर सुनो भाई साधो सब श्वासोकं श्वासमें । जो खोजे तो तुरत मिलूं मैं छनभरकी तल्लासमें. कहत ॥३॥ (३) शुकाचार्य राजा परीक्षितीस म्हणतो:-'नरवर्या ! यज्ञतपोयोग असे मार्ग मुक्तिचे फार । परि बा! हष्णीं होतो ज्या मार्गे भक्तियोग तो सार'. ॥ [भागवत-द्वितीय स्कंध-गी० १२]. (४) 'न साधयति मां योगो न सांख्यं धर्म उद्धव ! न स्वाधायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता.।। (भागवत ११.१४,२०.) तसेंच भागवतमाहात्म्य अ० २ श्लो० २१:-'अलं व्रतैरलं तीर्थैरलं योगैरलं मखैः। अलं ज्ञानकलालापैभक्तिरेकैव मुक्तिदा.' ॥ तसेंच (५) 'कासया करावे तपाचे डोंगर' अशा आरंभाचा तुकारामाचा अभंगही ह्यासंबंधीं वाचावा. (६) 'व्रत, तप नलगे करणे सर्वथा। नलगे तया तीर्था जाणे आम्हां ॥ १॥ आपुलेचि ठायीं असा सावधान । करा हरिकीर्तन सर्वकाळ.॥ २ ॥ नलगे कांहीं वर्जावें तें अन्नजीवन । लावा अनुसंधान हरिचे पायीं. ॥३॥ नलगे योगयाग नलगे संगत्याग । असो द्या अनुराग हरिचे पायी. ॥ ४ ॥ नलगे निरंजनी करणें वास तुह्मां । दृढ धरा प्रेमा हरिचे पायीं. ॥ ५ नामा म्हणे नाम दृढ धरा कंठीं । तेणें येइल भेटी पांडुरंग ॥६॥ ३. सजवून, तयार करून, तिच्या तारा नीट करून. व्या०:-'सजणे' हा धातु बहुधा । अकर्मक असतो परंतु केव्हां केव्हां याचा सकर्मकाप्रमाणे उपयोग करितात तसा येथे केला आहे. सजोनि-भगवद्गुणगायनाकरितां ब्रह्मवीणेच्या तारा यथास्थित लावून. ४. श्रेष्ठ वीणा,