या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि .२८५ न भागवत भेटतां, न घडतांहि सत्संगती, न अज्ञहृदयें, तशी तव यशोरसी रंगती. ॥ १. भगवद्भक्त, साधुपुरुष. भगवद्भक्तांचे प्रकारः-श्रीमद्भागवतांत भगवद्भक्तांचे कनिष्ठ, मध्यम, व उत्तम असे तीन वर्ग केले आहेत व त्यांची लक्षणेही दिली आहेत. ती अशी:-'यजितो हरितें श्रद्धेकरुनि प्रतिमेंचिमाजि जो, परि तो। न हरिजनी न च इतरी, प्राकृत की नवच भजन हे करितो. ॥ ३३ ॥ नलिनाक्षी, तद्भक्ती, मूखीं, अहितीहि, जो करि प्रेमा, । मैत्री, दया, उपेक्षा तो मध्यम भक्त जाण या नेमा. ॥ ३४ ॥ मोठा भागवत नृपा! सा भूतांत देव जो पाहे । देवीं सर्वहि भूतें साक्षात् हरिरूप तो जगी आहे. ॥ ३५ ॥ भगवद्भतोत्तम तो ज्याच्या हृन्मंदिरीं सदा वसती । करि हरि, नच सोडी, की प्रेमगुणे चरण गोविले असती. ॥ ३६॥ गरुडध्वजपद सोडुनि येतां त्रैलोक्यराज्य पदरा जा (ज्या) । निमिपार्धहि चलन नव्हे, त्याचे भागवत राज्यपद, राजा!' ॥ ३७॥ [मंत्रभागवत-एकादश स्कंध]. सज्जनांचे वर्णन एकनाथ स्वामी करितात:-'चैतन्याचे अलंकार । की ब्रह्मविद्येचे शृंगार । की ईश्वराचे मनोहर । निजमंदिर निवासा. ॥ ३५ ॥ की ते भूतदयार्णव । माहेरा आली कणव । ना ते निर्गुणाचे अवयव । जाण ठेव निर्गुणाची. ॥ ३७ ॥ (भागवंतप्रथमस्कंध). २. साधुसमागम, साधुसंगतिमाहात्म्यः-'दे साधुसंग में तें निरुपम निरवधि कवींद्र सुख गाती । सत्संगा सुगति कळे, तैसी हंसादिकां न सुखगा ती.' ॥ [मंत्रभागवत तांचा सग. २०], भगवान् म्हणतातः-(२) 'नवलचि सत्संगाचा महिमा मज पवडो (घडावा); सजनवाक्य (जीपण, सुगळ, हनूमान्हि हें विदित सर्वां. ॥ २05 भरो (ऐक, त्याहा गोपी, त्या दीक्षिताचिया भार्या । वेदव्रतेतप नसती सत्तंगें परित्या मला , आर्या. ॥ २७८ ॥ गतिपात्र साधुसंग, प्राप्तें प्रेमेचि केवळे गोपी; । नगखगमृगभुजगपशुहि,05 | त्संगतिनेंचि मुक्ति वा! सोपी.' ॥ २७९ ॥ [मंत्रभागवत-स्कंध ११]. (३) वर्णिति वेदप राणें तीर्थादिक म्हणुनि साधुच्या संगा । इतरांची काय कथा सत्संगा वांछिते स्वरों गंगा'. ।। (ब्रह्मोत्तरखंड २१-३.) सुंदरदास साधु आपल्या 'सुंदरविलास' काव्यांत म्हणतात:-'ज्या दिन तें सतसंग मिल्यो तब ता दिन तें भ्रम भाजि गयो है । और उपाय थके सबही तब संतनि अद्वयज्ञान दियो है । पोतप्रवालहि क्यु करि छंवत एक अमूलिक लाल लियो है । कौन प्रकार रहै रजनीतम सुंदर सूरप्रकाश भयो है; ॥ साधु तुकाराम म्हणतात:-'पाप, ताप, दैन्य जाय साउठीं । जालिया भेटी हरिदासांची इ०.' ३. जड मानवांची हृदयें. द्वितीयार्धाचा अर्थःजोपर्यंत अज्ञान जनांना एखाद्या सत्पुरुषाची गांठ पडून त्याच्याशी सहवास घडत नाही तोपर्यंत त्यांना भगवद्यशाची चांगलीशी गोडी लागत नाही व म्हणूनच त्यांचा तरणोपायही होत नाही. जसा एखाद्या वस्त्राला नुसत्या. रसांत बुडविल्याने रंग चढत नाही तर त्या रसांत कांहीं दुसरा मालमसाला मिळवावा लागतो म्हणजे रंग पक्का चढतो त्याप्रमाणे सत्संगतीवांचून अज्ञजनांची मनें ईश्वरभक्तीचे ठिकाणी तल्लीन होत नाहीत. अतएव भगवद्यशाची गोडी लागून मोक्ष प्राप्त व्हावा अशी इच्छा असल्यास सत्संगति जोडावी. भागवत ११-१२ श्लो०१-२ ('न रोधयति मां' इ०) पहा. ४. कीर्तिरूप रसांत. या केकेंत दृष्टांत अलंकार आहे.