या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८७ केकावलि, तयींच उतरी भवोदधितटी जनां लौकरी.॥ सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो; ११७ ती लोकांना संसारसागराच्या पैलतीरास सत्वर नेण्यास समर्थ होते. साधुसमागमाशिवाय ईशप्राप्ति लवकर होत नाही. 'तात्पर्य मुमुक्षुजनांस अविद्याजनितसंसृतिसागर पार उतरून ब्रह्मज्ञानावाप्ति करून देण्यास सद्गुरुकृपेची आवश्यकता आहे.' (य० पां०.) १. संसारसागराच्या पैलतीरास. काव्यालंकारः--सुकीर्ति ही तरी आणि भगवज्जन हे कर्णधार. एकट्या सुकीतीने भवसागराच्या पलीकडल्या तीरास जाववत नाही. तिला भगवज्जन सुकर्णधार (=नावाडी) मिळाला म्हणजे फार त्वरेने ती परतीरास जाऊन पोंचते. यांत दृष्टांत आहे. केका ४ पृ० १३ पहा. २. ११७ श्लोकाच्या अखेरच हे काव्य वास्तविक पाहतां संपले. ११८-१२१ या केकांत कवि देवापासून उत्कृष्ट आशीर्वाद मागून काव्याचा उपसंहार करितात. प्रास्ताविकः-आतांपर्यंत जी भगवत्प्रार्थना केली तिचे पर्यवसान सत्संगतींत आहे, असे समजून कवि मोरोपंत आपल्याला देवाने प्रथम सत्संगति द्यावी म्हणून प्रार्थना करून मग इतर वर मागतात. केका ११८-१२० ह्या तीन केकांत कवीने लोकहितार्थ प्रार्थना केली आहे असे म्हटल्यासही चालेल. येथे 'आशी' नामक अलंकार झाला. केका ५० पृ० १३४ टीप ३ पहा. २ चांगल्या लोकांचा (=साधूंचा) समागम; भगवद्भ-। क्तांचा संग. अन्वयार्थः-[ देवा !] [मला] सदा (निरंतर) सुसंगति (साधुसमागम) वडो (घडावा); सजनवाक्य (साधुजनांचे भाषण, सान त ताकानी गड़ो (ऐकावयास । ब्रह्मदवार प्रति बुद्धीचा) कलंकरण , पापरूपी 'मळ अथवा अज्ञानरूपी पटल) झडो (नाहीसा होवो); विषय (ऐहिक भोग्य पदार्थ) सर्वथा (कदापि) नावडो (न आवडो, न रुचो. ऐहिक वस्तूंच्या ठिकाणी माझी आ-/ सक्ति नसावी); मन सदंघ्रिकमळी (साधूंच्या चरणकमळी) दडो (दडून राहो, भ्रमरासारखें लीन होवो); मुरडितां (तेथून जर कोणी त्याला काढू लागले तर) [तें] (हटाने (आग्रहाने, नेटाने) अडो (अडून राहो; चिकटून राहो); वियोग (तुटातुट) घडतां (त्या मनाला कोणी जबरीने साधूच्या चरणापासून ओढून काढिल्यामुळे वियोग घडला असतां) रडो (दुःखित होवो, अतिशय वाईट वाटो) [आणखी भवचरित्री (देवा! तुमच्या कथेत) जडो (निमग्न होवो). सत्संगमहिमा:- भर्तृहरीने पुढील श्लोकांत सत्संगमहिमा मोठ्या सरस रीतीनें वर्णिला आहे:-(१) जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोनतिं दिशति पापमपाकरोति । चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीति सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम् ॥ [नीतिशतक-४७]. रामायणांत म्हटले आहे:-(२) 'सतां संगतिरेवात्र साधनं प्रथम स्मृतम् । आचार्योपासनं भद्रे मदुध्यामायया सदा ॥.' मोक्षप्राप्त्यर्थ सद्गुरुकृपाच पाहिजे याविषयी 'दासबोधांत' रामदास म्हणतात. (३) 'जे वस्तु परम दुर्लभ । जयेचा अलभ्य लाभ । तोचि होय सुलभ । सत्संगे करोनी ॥१॥ सद्गुरुकृपा न जोडे । तो भलतीचकडे वावडे । जैसे आंधळे चांचरोन पडे । गारी गडदरीं ॥ २ ॥ असो जयास मोक्ष व्हावा । तेणें सद्गरु वरावा ।