या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. २९५ तुह्मां जड भवार्णवीं उतरितां न दासां पडे. ॥ १२१ उपसंहार. [स्रग्धरा.] - कारुण्यांभोद राम प्रियसख गुरुही जो मयूरा नटाचा, कृपा करून माझे पापदारिद्र्य नाहींसें करा. उपमासौंदर्यः-स्वतःस अतिथि कल्पून देवाला दात्याची उपमा देण्यांत कवीने फार चातुर्य दाखविले आहे. कवीच्या म्हणण्यांत पुढीलप्रमाणे आशय दिसतोः-अत्यंत दानशूर व अत्यंत भिकारी अशा दोघांची गांठ पडली असतां पहिला जसा दुसऱ्याचे दारिद्य नाहीसे करून त्याला खूप श्रीमंत करून सोडतो व आपल्याला औदार्य दाखविण्याची आलेली वेळ सफल करितो त्याचप्रमाणे देवा ! तुम्ही पतितोद्धार करण्याविषयी सदैव तत्पर असे आहां व मी अत्यंत पतित असा आहे. तेव्हां माझाउद्धार करण्यास विलंब लावू नका. जितका याचक भिकारी असेल तितकें धार्मिकाचे औदार्य जास्त समजले जाते. शरणागत जितका जास्ती पापी असेल तितकीच भगवंताच्या पतितपावन गुणाची कीर्ति जास्त होईल. म्हणून कवि म्हणतो की देवा! मजसारखा पापी मनुष्य आजपर्यंत तुम्हांला कचितच शरण आला असेल. तो आज आला आहे म्हणून तुम्ही त्याचा सत्वर उद्धार करून त्यामुळे मिळणारी कीर्ति प्राप्त करून घ्या. ४. याचक, भिकारी. ५. धामिक (दानशील, उदार अशा सर्वांनीं) स्तुत (स्तविले आहे) पद (चरण) ज्याचें ते तुम्ही, 'वदान्यजनसद्गुरो !' (केका १.) ६. कधी. कदा सांपडे ?=कधी सांपडणार आहे ? अर्थात् कधीही सांपडणार नाही. १. भव (संसार) तोच अर्णव (समुद्र) त्यांत, संसारसागरांत. चतुर्थचरणार्थः-तुम्हांसारख्या समर्थीना आम्हांसारख्या पतित सेवकांचा उद्धार करणे कांहींच कठिण नाही. हे काम तुम्हांला हाताच्या मळासारखें रहो आहे. म्हणून या संसारसागरांत गटंगळ्या खाणाऱ्या मला पैलतीरी न्या. २. पार नेत असतां. व्यु:-येथे ‘उतरणे' ह्या क्रियेचा 'उतरविणे' असा प्रयोज्यार्थ केला आहे. ३. येथें कवि आपल्या उपास्यदेवतेचे स्मरण करून कविसंप्रदायाप्रमाणे भिन्न वृत्तांत (स्रग्धरावृत्तांत) ग्रंथसमाप्ति करितात. कारुण्य (दया) अंभोद (घन-जलद)-दयाघन. मेघाचे दर्शन मयूरास अत्यंत हर्षप्रद होते. पंताच्या मुक्तामालेतील दील शोक पहा:-'शृणुत मयूरा यं प्रियमीक्षितुमत्यंतमुत्सुकामुदिरं । स महाभागत आगत उत्सव एकांतिकेऽद्य नृत्यध्वं ॥' ४. श्रीरामचंद्र(किंवा) पिता रामाजीपंत पराडकर; येथे कवीने 'राम' शब्दाने पितृनामनिर्देश करून ग्रंथाच्या अखेर पित्यालाही वंदन __ केले आहे.] (पक्षी) रमविणारा, मनोरम (मेघ). अन्वयार्थः-जो मयूरा नटाचा (नाचणाऱ्या मोराचा, पक्षी भगवत्कथेत नाचणाऱ्या भक्त मोरोपंताचा) प्रियसखा (आवडता मित्र, पक्षी भक्तवत्सल) गुरुही (आचार्य देखील, मयूरपक्षी गुरु-नृत्य. शिकविणारा, मोरोपंतपक्षीं गुरु-उपास्यदेवता श्रीराम), [मयूर] भववनी (संसार