या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २९ ) (इ) रामदास व मोरोपंतः-रामदासांची सर्व कविता ओवी, श्लोक व अभंग या छंदांत रचिली आहे. त्यांची कांहीं पदें, भूपाळ्या व आरत्याही आहेत. त्यांच्या ग्रंथातून व्यवहारज्ञान व अध्यात्मविद्या यांचे उत्तम विवेचन असून त्यांत त्यांचा हातखंडा होता. पंतांच्या काव्यांत वरील प्रकार इतका दृष्टीस पडत नाही. आर्यावृत्त जसे पंतांचे तसें भुजंगप्रयातवृत्त रामदासांचे आवडते दिसते. त्यांचे काव्य सोपें व रसाळ असून त्यांत अनुप्रास पुष्कळ ठिकाणी साधले आहेत. व्याकरणशुद्धतेकडे त्यांनी फार लक्ष्य दिले नसून त्यासंबंधी 'ताल जाती एकीकडे । गाणे माझें भलतीकडे ।। शेंडा मूळ तें नकळे । माझें गाणेंचि मोकळे ॥ (आळसपंचक)' अशा प्रकारची त्यांची कविता आहे. भाषा साधी पण जोरदार व अधिकारयुक्त अशी असते. त्यांच्या काव्यांत व्यवहारज्ञान, भक्ति, नीति व तत्वज्ञान यांचा सर्वत्र उपदेश केलेला आढळतो. त्यांच्या काव्यांत अगदी घरगुती भाषा वापरली असून त्यांत ह्मणींचाही समावेश केलेला आहे. राज्यकारणांत, व्यवहारांत व परमार्थात कसें वागावें या सर्व गोष्टींचा उपदेश त्यांच्या दासबोधांत उत्तम केला आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टींचा उत्कृष्ट मिलाफ यांच्या काव्यांत (विशेषतः दासबोधांत) केलेला आढळतो. यांच्या काव्याच्या वाचनाने स्वाभिमान जागृत होऊन 'रुक्मांगद होता नर । आह्मीं काय आहों खर ॥' अशा प्रकारची स्थिति होऊन कर्तव्यजागरूकता उत्पन्न होते. यांची अनेक 'पंचकें, 'मनाचे श्लोक,' 'पंचीकरण,' व 'रामदासी कुबडी' इत्यादि ग्रंथ फार वाचनीय आहेत. कवित्व कसे असावे याविषयी जरि रामदासांनी दासबोधांत उत्तम विवेचन केले आहे तरी त्यांच्या काव्यांत भगवल्लीलावर्णन नसून केवळ व्यावहारिक व आध्यात्मिक विचारच ग्रंथित केले असल्यामुळे त्यांच्या काव्यांत मोरोपंत, वामन, मुक्तेश्वर यांच्या काव्याप्रमाणे रसभरित वर्णन आढळत नाही. आध्यात्मिक विचारांतही तुकोबाप्रमाणे ते तल्लीन झालेले दिसत नाहीत. त्यांचा उद्देश 'मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा' हा असल्यामुळे त्यांची सर्व काव्यरचना त्याकरितांच निर्माण झालेली आहे. तेव्हां त्यांत काव्यशास्त्रोक्त गुणांची विशेष अपेक्षा करणे योग्य होणार नाही. असें आहे ह्मणून त्यांच्या काव्याची योग्यता कमी नाही. स्वकर्तव्याची ओळख, स्वाभिमान, व प्रपंच साधून परमार्थलाभ करून घेण्याची अजब हातोटी जशी त्यांच्या काव्यवाचनापासून प्राप्त होते तशी इतरत्र होत नाही. सध्याच्या काळाला दासबोधासारख्या ग्रंथांची पारायणे होणेच फार अगत्याचे आहे. (ई) वामन व मोरोपंतः-मोरोपंत जसे उत्तम पुराणिक होते तसेच वामनपंडित हे मोठे षट्शास्त्रवेत्ते पंडित होते. पंडितांचा भर जसा केवळ अद्वैतप्रतिपादनाकडे आहे तसा पंतांचा नाही. पंतांनीही एकादशस्कंधांत (मंत्रभागवत) अद्वैत प्रतिपादन केले आहे. पण त्यांचा सगुणावतारकथावर्णनाकडे विशेष भर होता ह्मणून त्यांनी देवाची स्तुतिस्तोत्रंच फार केली आहेत. पंडितांनी ओवी व श्लोक या वृत्तांतच आपल्या काव्यांची रचना केली आहे. त्यांच्या 'यथार्थदीपिका' नामक प्रचंड टीकेंत सांख्य बौद्ध वगैरे मतें खोडली असत अद्वैत प्रतिपादन केले आहे. ह्या टीकेवरून त्यांची जाडी विद्वत्ता व स्वमतप्रतिपादनशैली ही दृष्टीस पडतात. पंडितांची मुख्य प्रसिद्धि त्यांच्या मधुर श्लोकांवरून आहे. त्यांच्या शोकांत