या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरवणी ६. निवडक (मुंबई) विश्वविद्यालयीन प्रश्न. (१८६३ ) (म्याट्रिक) १. दयामृतघना अहो हरि वळा मयूराकडे । रडे शिशु तयासि घे कळवळोनि माता कडे ॥ वरील ओळींचें इंग्रेजीत भाषांतर करा व जाड टाइपांतील शब्दांचे व्याकरण चालवा. त्यांत सामासिक शब्द असल्यास त्याचा विग्रह करा. 'मयूराकडे' या शब्दांत असलेला व्याकरणविशेष सांगून त्याचे समर्थन करा. (के० १२१ पृ० २९३-२९४ पहा.) (एफ. ए.) १ चकोर, चातक, चक्रवाक व कौस्तुभ यासंबंधी कविसंकेत व माहिती सांगा. २ मोरोपंत कवीचे संक्षिप्त चरित्र लिहा व त्यांच्या ग्रंथाची यादी द्या. (परिशिष्ट 'इ' पहा ). ३ नवरसांची नांवे द्या व महाराष्ट्रकविवर्याच्या ग्रंथांत त्यांपैकी कोणते रस विशेष आढळून येतात हे उदाहरणासह सांगा. (पृ० ६६-६७, १४९-१५० पहा ). (१८६६) (एफ. ए.) १ 'तसाचि उरलों कसा...विषक्षीर वी' ह्या केकेचे इंग्रेजीत . भाषांतर करा. (बी. ए.) १ मुक्तेश्वर व मोरोपंत या कवींची तुलना करा व मोरोपंताच्या लोकप्रियतेची कारणे सांगा. ('मोरोपंताचें चरित्र' हे सदर पहा). (१८७०) (बी. ए.) १ अलंकार व रस यांच्या व्याख्या द्या. नवरसांची व मुख्य अलंकारांची नांवें सांगून त्यांची इंग्रेजी नांवें द्या. 'उत्प्रेक्षा,' 'श्लेष' व 'अन्योक्ति' या अलंकारांचं पूर्ण स्पष्टीकरण करा व त्यांची उदाहरणे द्या. (पृ. १४९-१५०: अलंकारांची पुरवणी; पु? ८१-८२, ९२-९३, ११८-११९ पहा.) २ 'दयाब्द वळशील तूं...उमोप द्रवा' या केकेचे इंग्रेजीत भाषांतर करा. ( १८७४ ) (म्याट्रिक) १ 'सदैव अपराध हे...अजांडशतकोटि ज्या...कां दवा ?' या केकेचा अन्वयार्थ द्या व जाड टाइपांतील शब्दांचे व्याकरण चालवा (के० ४७ पृ. ४८-४९). (१८३३ ) (म्याट्रिक) १ महाराष्ट्र काव्यांतून कोणत्या मुख्य वृत्तांचा विशेषतः उपयोग झाला आहे व कोणत्या महाराष्ट्र कवींनी त्यांत विशेषेकरून ग्रंथरचना केली तें सांगा. (यु. एस्. एफ.) १ 'पिता जरि विटे...जन्मदेचें फिटे; 'अशी तरि कृतज्ञता...पुनः पुन्हा तें न गा.' ह्या दोन केकांचा अन्वयार्थ लिहा. (के० ९५ पृ० २२९-२३०; के० ९९ पृ० २३८-२३९). - २ मोरोपंताच्या काव्यांतून उपमेची व उत्प्रेक्षेची पांच पांच उदाहरणे द्या. (अलकारावा सूची पहा). ३ केकावलीचे वृत्त कोणते व त्याचे लक्षण काय ते लिहा. ('काव्यवृत्त' सदर पहा): (१८९० ) (म्याट्रिक.) १ 'निजस्तुति तुह्मां रुचे स्तविति...नमस्कृतिपरा... नव्हे जना याच का' या कवितेचा अन्वयार्थ सांगून जाड्या टाइपांतील शब्दांचे व्याकरण चालवा. ह्या कवितेचे वृत्त कोणते ? (यु. एस्. एफ.) १ 'केकावलि' असें नांव काव्याला कां दिले ? यांतील तात्पर्य काय : काव या नात्याने मोरोपंताचे गुण कोणते आहेत ते सांगा. (टीपा पृ० १ व कविचरित्र पहा