या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ५' उत्प्रेक्षा' व 'अपन्हुति' यांतील भेद काय ? तो दाखविण्याकरितां प्रत्येकाची दोन उदाहरणे द्या. केकावलींत कोणत्या वृत्तांचा उपयोग झाला आहे व त्या वृत्तांत गण कोणते असतात ते लिहा. (१८९५) (यु. एस्. एफ.) १ मुक्तेश्वर व श्रीधर तसेंच मुक्तेश्वर व मोरोपंत या कवींच्या काव्यांत तुह्माला कोणता फरक दिसतो व तुमाला कोणत्या कवींची काव्ये आवडतात हे प्रमाणासहित सांगा. (मोरोपंताचें चरित्र पहा). २'असंख्य खळ...देशि बा! अमृत नेदिजे घातुकें याचे भाषांतर करा व जाड्या शब्दांचे व्याकरण चालवा. (१८९६) (यु. एस्. एफ.) १ 'कवीश्वरमनःपयोनिधिसुतास्तुतीच्या... गुणकदेशभ्रमें...संभ्रमें' या केकेचा अन्वयार्थ लिहा; तसेंच त्यांतील वृत्ताचे लक्षण सांगून जाड्या टाइपांतले सामासिक शब्दाचा विग्रह करा. (१८९७) (यु. एस्. एफ.) १ रामदास व मोरोपंत यांची संक्षिप्त चरित्रे लिहा. ('मोरोपंताचें चरित्र' पहा). २'मुक्तेश्वर' व 'मोरोपंत' यांच्या काव्यांची तुलना करा; व त्या दोघांत श्रेष्ठ कोण असें तुह्माला वाटतें तें सप्रमाण लिहा. 'करा श्रवण...सोमला...शिवे काय जी' 'दयामृतघना...उतरितां न दासां पडे;' यांचा अन्वयार्थ लिहा. यांतील वृत्त कोणते आहे ? जाड्या टाइपांतल्या शब्दांचे व्याकरण चालवा. (के० १०६ पृ० २५९-२६०, के० १२१ पृ० २९३-२९४ पहा ). ४'म अगइ ऐकिलें हि न कधी असें पाप गा!;' 'तयीं प्रभुवरा तसें सदय कां असें आज हो !' 'न तूजवरि ज्यापरी पशुपपाळ कोपे क्षण' यांतील कथासंदर्भ लिहा. ( के० १० पृ० ३३; के० ८१ पृ० २०६, के० ९२ पृ० २२६ पहा). (१८९८) (म्याट्रिक) १ उपमा, उत्प्रेक्षा व श्लेष यांची लक्षणे सांगा. (पृ० ५७, ८१, ११४११९ पहा). (यु. एस्. एफ.) १ 'कथासुरभि...शिशूस...सर्वथा बाटती;' 'पिता जरि... कुलकजले...फिटे;' यांचा अन्वयार्थ लिहा. यांतील वृत्ते कोणती त्यांची नांवें सांगा व जाड्या टाइपांतल्या शब्दांचे व्याकरण चालवा. २ 'भातुकें' या शब्दाचा अर्थ सांगा. (१८९९) (यु. एस्. एफ.) १ 'कवीश्वर,' 'प्रणतवत्सल,' 'अमृतकर' यांतील समास सोडवा व त्यांची नांवें सांगा. २ रामदास व मोरोपंत यांच्या काव्यांची तुलना करा. ('मोरोपंताचें चरित्र' पहा.) ३ 'गमो मधुर...सद्यशोमुख...प्रभवरा...ओपिशी' याचा अन्वयार्थ लिहा, लाताल त्त कोणत ? व त्यांतील गणरचना कशी आहे ती लिहा. जाड्या टाइपांतील समास सोडवा. ( के० २३ पृ०६२-६४ पहा). ४'पशुपपाळ' याचा अर्थ सांगा. १ धना परिजना घरी...सेविती,' याचे इंग्रेजीत भाषांतर करा.