या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंताच्या चरित्राची परिशिष्टें. परिशिष्ट 'अ'-मयूरकविस्तुति. १ सुप्रसिद्ध सुश्लोकलाघवकार विठोबा अण्णा दप्तरदारकृत. इह मुख्यकलोपेतो कोऽभवत्कविनायकः । इति मीमांस्यमाने तु मयूरेशः स्मरत्यलं ॥ (सुश्लोकलाघव ४१३ ). ह्या जगांत ज्याची कविता उत्तम काव्यगुणांनी मंडित आहे असा कोणता कविश्रेष्ठ झाला असा प्रश्न निघाला असतां मला मयूरेशाची (मोरोपंताची) फार आठवण येते. ('कविनायक शब्दांतून आरंभींचा 'क'कार काढिला असतां 'विनायक' रणजे मयूरेश किंवा गणपति उरतो असा दुसरा अर्थ). आर्यार्पितमहानंदः सर्वलोककृतादरः । विराजते मयूरेशः कलाधरशिरोमणिः ॥ (४१४). आर्यावृत्तांत ग्रंथरचना करून ज्याने मोठा आनंद दिला व ज्याचा सर्व लॉक आदर करितात असा कविश्रेष्ठ मयूरेश (मोरोपंत) चांगल्या रीतीने शोभा पावतो. (पक्षी, जो आर्यलोकांस अर्थात् भक्तिमान् लोकांस किंवा आर्या पार्वती हीस आनंद देतो. सर्व लोक यादी भक्ति करितात, ज्याने मस्तकावर चंद्र धारण केला आहे असा मयूरेश ( गणपति उत्तम प्रकारें शोभतो). अतिचित्रकलापाढ्यः सदारामपरस्थितिः । कारिकाजनितानंदो मयूरेशो विराजते ॥ (४१५ ) ज्यानं अतिशय चमत्कृतियुक्त अशी ग्रंथरचना केली, ज्याचे श्रीरामाचे ठिकाणी (रामोपासक असल्यामुळे) सर्वदा लक्ष्य आहे, भारत भागवत रामायणादि विस्तृत ग्रंथांचें साररूपाने ज्याने वर्णन केले असा मयूरेश (मोरोपंत) शोभतो. (मोरपक्षी, ज्याचा चित्रविचित्र पिसारा आहे, ज्याला सदोदित बगिच्यांत राहणे आवडते, कालिका ह्मणजे मेघमाला हिला पाहून ज्याला हर्ष होतो असा उत्तम मयूरपक्षी फार शोभतो; गणपतिपक्षी, चित्राराशी अतिक्रांत झाल्यावर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेच्या कलापाने ह्मणजे चंद्राने जो युक्त आहे, रामध्यानतत्पर शिवाच्या जवळ ज्याचे नेहमी राहणे, कालिका (पार्वती) हि ज्याला आनंद देते असा मयूरेश्वर गणपति उत्कृष्टपणे शोभतो.)