या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ मोरोपंताचे चिरंजीव रामकृष्णपंतकृत. श्रीमन्मयूरकविची देते संतोष मानवा कविता । असता जरि भूमिवरी सुरगुरु तरि तोहि मान वांकविता. ॥ १ ॥ ३ मोरोपंताचे समकालीन प्रसिद्ध 'लावणी'कार रामजोशीबोवा सोलापुरकरकृत. वाणी मयूरवदनीं जी न शुका या द्विजोत्तमा यावी। पक्ष श्रीहरि धरि जरि काय न करि जो अनंत माया वी. ॥ (नि. मा. ६२). ४ अनामकविकृत. आर्यातरुचा पक्षा त्या गा बारामतींत मोराशीं । आर्यात रुचा, पक्षा त्यागा वारा मती तमोराशी. ॥ १ ॥ आर्या कविता कीजे एका बारामतींत मोरानें । अन्य कवी ते करिती, फिरती बारामती तमोरानें. ॥ २ ॥ वा राम तींत आहे ह्मणउनि बारामती असें नांव । तीत वसे तो मोरोपंत भवाब्धींत जीत नव नाव. ॥ ३ ॥ आर्याछंदें जोडुनि रामायणभारतादि आयकवी । ६ नायक वीरकवींचा, ऐसा होईल अन्य काय कवी. ॥ ४ ॥ (काव्येतिहाससंग्रहांतील मोरोपंताचें चरित्र ). ५ रामचंद्र बडवेकृत. tr भगवत्तनू हरि कथा करि आर्यांनी अलंकृतीयुक्त । मोरेश्वरपंताची ह्मणती पंडित अलं कृती युक्त. ॥ १ ॥ मोरेश्वरपंताची ऐकुनि कविता मनीं सुकवि लाजे । पावे विवर्णता तें मी किति वर्जू जनीं सुकविला जे ॥ २ ॥ मोरेश्वर पंताची कविता रसनिपुण सत्सभागेया । अभिमाने सेर्प्य कवन करितां सम सुरभिवास भागे या. ॥ ३ ॥ अक्षरसंगति, यमकें, सुशब्द, अर्थाचिया चमत्कृतिला ।। पाहुनि भुले कवि ह्मणे बुडवू या काय नीच मत्कृतिला. ॥ ४ ॥ आर्या केका करितचि शिरला वाटे मयूर यमकवनीं । सुजनासि फार पीडिल ह्मणुनि भुलविला किरातयम कवनी. ॥ ५॥ यत्स्थिति पहातां मूर्धा डोलविला निज असेल जनकानें ।। यच्छांति यत्सदयता ऐकोनि किती शिके सुजन कानें. ॥ ६ ॥