या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९ ) आर्या अर्थविचारें गातां ही सुस्वर शिकतांना ही। अक्षरसंगति यमकें वेधी मन जेंवि रसिक तानांहीं. ॥ ७ ॥ कवितेत भाषणांतहि भासे मृदुतेकरोनि शुकपिकसा । विश्वफळ श्रीरामा घाली कव तेंचि हा शिशु कपि कसा ?॥ ८ ॥ सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची । ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची. ॥ ९ ॥ अष्टोत्तरशत केली जेणें रामायणे पृथग्रस तीं। भारतभागवतादि ग्रंथ करी मान्य जे समग्र सती. ॥ १० ॥ सर्वोत्कृष्ट कवन करि परि वाधे गर्व लेशही न जया । सत्कुलज नम्रता धरि गुणनिभृतत्वें न होय हीनज या. ॥ ११ ॥ कठिण ग्रंथ ह्मणुनियां आर्यातें निंदिती, न सुकवी ते; । मोठ्या मोठ्या कविंचे मान्या यद्भणिति ओष्ट सुकवीते. ॥ १२ ॥ सुजनोत्थ कवनसद्रस दुष्टास न घेववू सके कानीं । संतोष मयूराच्या काय बिडालास होय केकांनी ? ॥ १३ ॥ सुस्वर कंठें रसिकें आर्या गातां मयूरबावाची । वेधी सुजनमनातें न तशी धुन एक तार वावाची. ॥ १४ ॥ खग शब्द ब्रह्मज्ञा, ह्मणउनि शुक धरितसेचि अभिधान । ' हा धरि मयूरपंतहि आणी गौणत्व यासि अभिधा न. ॥ १५ ॥ वानी पंढरि न तसें साकेतातें गयाविमुक्तातें । वर्णी भक्ताभक्ता न तसें सत्यास भवविमुक्तातें. ॥ १६ ॥ कवन सुरेंद्राद्यमरा मिळतें तरि हे सदार शिकते तें। साखर मिळतां सेविल नामाभासें उदार सिकतेतें ? ॥ १७ ॥ हैं मिळतां अन्य न मनि, घृत मिळतां जवि सदसिक तेला। वणिज न गंगेच्याही आणुनि पावेल भद्र सिकतेला. ॥ १८ ॥ रामायणभागवती मंत्रोद्धारेंचि रामहरिपूजा । संपादी ह्मणुनि भिउनि कामादिक देति हे मह रिपू जा. ॥ १९ ॥ कवनश्रवणक निर्बल मानव न रमेल येथ न रमो; तें। परि सज्जन श्रुतीतें भूषविलचि तेंवि जेवि नर मो. ॥ २० ॥ केकारवें मयूर विठ्ठलघनकाय जाण नाचविला । ऐशाही कवनाच्या पशु तो, नर काय ? जाणना चविला. ॥ २१ ॥ या जन्मतांचि गेल्या काशीरामेश्वरा नमायाला । प्रौढपणीं आर्यातं जगतीतलही पुरे न मायाला. ॥ २२ ॥ आर्याग्रंथ रचुनि बहु विठ्ठलचित्तासि तोषवी फार । त्या मोरेश्वरपंता माझा साष्टांग हा नमस्कार. ॥ २३ ॥ २८