या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २८ ) - रामसुत मयूर ह्मणे ज्ञात्या रसिकांसि पसरुनी पदर. ॥ २३ ॥ (अनु. अ. ८.९९) रामकृष्णचरणीं समर्पित ग्रंथ हो रसिकचित्त तर्पित.॥२४॥ (कृष्णवि.पूर्वार्ध अंतिम सज्जनप्रार्थना) सांगुनि असे दिराला निरोप हा पाठवी क्षितिवराला। दृढ करुनि हृदय कानें तो ऐकावा समस्त रसिकानें. ॥ २५ ॥ ( कुशलवा० ४-५४) ऐसें ऐकूनि वाल्मीकि वदता जाहला मुखें। आकर्णावें रसज्ञांहीं स्वस्थ होऊनियां सुखें. ॥ २६ ॥ (कुशलवा० ५-५) रसिकास जैशी कविता ती सती, पाहे योग्य पति जनीं वनी. ॥ २७ ।। (सावित्रीआख्यान अभंग २२)