या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-ऋ.. वर्णनविस्तार व वर्णनसंक्षेप. पंतांच्या काव्यांत वर्णनविस्तार हा प्रकार फारसा आढळत नाही. त्यांना भारत, रामायण,भागवत वगैरे अनेक मोठ्या ग्रंथांतील कथा वर्णन करावयाच्या असल्यामुळे वर्णनविस्तार करण्यास सवडच नव्हती. एक रामकथाच त्यांनी १०८ निराळ्या प्रकारांनी वर्णिली आहे. मंत्रभागवतांत भागवतांतील सर्व कथा आणली असून दशमस्कंधाच्या आधारे त्यांनी बृहद्दशम (कृष्णविजय)ही रचिला. याशिवाय १८ पर्वे भारत, कित्येक पौराणिक आख्याने व अनेक स्फुट काव्ये त्यांनी रचिली असल्यामुळे जेथे जेथें त्यांना विस्तारपूर्वक वर्णन करण्याची आपली आवड कष्टाने एकीकडे ठेवून व हात आटोपून वर्णनसंक्षेपच करावा लागला असावा असे दिसून येते. तरी काही ठिकाणी त्यांनी वर्णनविस्तार केल्याचे दिसून येते. या दोन्ही प्रकाराची थो" डींशी उदाहरणे खाली दिली आहेत. (१) वर्णनविस्तार—कृष्णविजयांत पंतांनी थोडाबहुत वर्णनविस्तार पुष्कळ ठिकाणी केलेला आढळतो. यांतील कित्येक वर्णनांस मूळांत मुळीच आधार नसून ती वर्णने पंतांच्या स्वतंत्र करामतीची व उज्ज्वल प्रतिभेची दर्शक आहेत. कित्येक ठिकाणी मूळांतील अत्यल्प वर्णनांत पंतांनी आपल्या उज्ज्वळ कल्पनेचा नवीन मालमसाला घालून सुरेख चिरेबंदी काम उठवून दिले आहे. कृष्णविजयांतील टीपांत याविषयी जागोजागी उल्लेख केले आहेत. याची थोडी उदाहरणे:(नारदाचे वर्णन) जो लोकत्रितयीं फिरे, स्थिर नसे, ताटी जसा पारद,। . . स्वांत ध्येयपदींच निश्चळ भवांबोधीत जो पारद, ॥ जो वर्णे गगनोदरी क्षण दिसे पूणेंदु की शारद,।। श्रीशांतःपुरचत्वरीच उतरे तो सन्मुनी नारद. ॥ १ ॥ (कृष्ण, ५५-३८.) वरील नारदाच्या वर्णनास मूळांत कांहीं एक आधार नाही. तसेंच पुढे नारदानें प्रद्युम्नाचें शंबराहरणादि सर्व वृत्त कथन केलें एवढ्याशा पराला धरून कवीने ३९-४६ या श्लोकांत वर्णनविस्तार केला आहे. तसेंच अ० ५६ श्लो० ३५ त कृष्णाच्या सुहृद्वानी महामाया दुर्गेची स्तुति केली एवडेच वर्णन असून पंतांनी कृष्णविजयांत अ० ५६ श्लो० ४०-४२ त देवीची विस्तारपूर्वक स्तुति वर्णिली आहे. अध्याय ६५ श्लो० १, ११, १३, १७, २७-२९, ३६, ३७, ह्या श्लोकांस मुळांत क्वचितच आधार असून ते पंतांच्या प्रतिभारूपी मुशीतून निघाले आहेत. उदाहरणार्थः-३७ श्लोकांत यमुना बळरामाच्या पायां पडली तेव्हांचे वर्णनच ध्याना: रामाच्या पदपुंडरीकयुगुळीं सेवी रसा षट्पदी, किंवा भक्तसमर्पिता सुतुलसीमालाचि की तोरदी, । लोळे तत्पदशृंखळाचि, अथवा तो देव हंसच्छदीं छाया, किंबहुना दिसे प्रभुपदी रम्याचि कृष्णानदी. ॥ ६५-३७. २९