या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३३ ) व्यासकृत महाभारत लक्ष ग्रंथ प्रसिद्ध हा भारी। । आर्यावृत्तं रचितों स्वल्पांतचि आणितों कथा सारी. ॥ १ ॥ (आदि. १-९) अमृतार्थ युद्ध दारुण केले ती बहुकथा, असो; यत्ने । सिंधूंतूनि चतुर्दश संख्याक प्रकट जाहली रत्नें. ॥ २॥ (आदि. ४-६३) रणविस्तर काशाला हेमाक्षरणी महाकिरी टिकला, । की अर्जुन कर्णरणी अरिस बहू तोषवी किरीटिकला. ॥ ३ ॥ (आदि. ३३-६९) विस्तर असो तयासी भीमासी बाहुयुद्ध आरंभे;। पूर्वागत ह्मणति किती हा उर्वशि! हा घृताचि! हा रंभे! ॥ ४ ॥ (सभा.१-१०१) सेवी पांडव सिद्धाश्रमतीर्थातें; तदीय महिम्यातें। विस्तरभयें न लिहिले रसिकानुमतें मनोरमहि म्यां तें. ॥ ५ ॥ (वन. ५-१०) खल्पचि रसिक मत वदति; बहुत लिहुनि काय कवि कथा विकिती ? ॥६॥(द्रोण.५-५४) . गाया श्रवण कराया योग्य परी ग्रंथ विस्तराकरितां । इतिहास गाळिला हा झाला भ्रम मजहि चित्त आंवरितां ॥ ७ ॥ (कर्ण. २१-४४) राजा! त्या देवांच्या आचायांत प्रवेशला द्रोण; । मुनि वदला परि विस्तरभीरु कवि पुन्हां वदेल हे कोण? ॥ ८ ॥ (स्वर्गा. २-२३) होउनि पुल्कसदास द्वादशमास क्षितीश तो राहे,। पाहे स्वप्न तयावरि तें, हे संक्षिप्त वर्णिले आहे. ॥ ९ ॥ (हरिश्चंद्राख्यान ३-४) नंद कुरुक्षेत्रांतुनि गेला यदुवीरही निजावासा। या सार कथा गातां आंवरितों ग्रंथविस्तरचि दासा. ॥१०॥ (कृष्णविध्य ८४-४९) वाखाणावें किति तें म्यां विस्तरभीरुनें ? जयां न मन । विसरे क्षणहि कवींचें केलें साष्टांग हे तयां नमन. ॥११॥ (मंत्रभागवत७-१७५) मोठे चरित परि तसें तें देवें थोडक्यांत आठविलें। की सुख तज्ञ जनाला काय श्रीवामने न वाटविलें. ॥ १२ ॥ (मं, भा. ९६८) सुकुमारबुद्धि वक्ते श्रोते जे त्यांसि कीर्तनश्रवण । व्हाया खल्पाचि कथा लिहिन रसिकसाधुरंजन प्रवण. ॥ १३ ॥ (हरिवंश १-७) (आ) ग्रंथविस्तार फार होईल, अजून मजल पुष्कळ मारावयाची ह्मणून मुद्दाम कथासंक्षेप केला अशांची उदाहरणे: झाला नृपति वशिष्ठस्पर्धेनें विप्र तें असो आतां विस्तरभय दे नाहीं तरि काळाचेंहि भय नसे गातां. ॥ १४ ॥ (आदि. ३२-४०) वाढेल ग्रंथ ह्मणुनि आवरितों मी बचि रसनेला । परि म्यां भागवतानें भागवतांतील फार रस नेला.॥१५॥(मंत्रभागवत १०-४२८) वाढेल ग्रंथ बहु प्रणति करुनि सोडिलाचि म्यां गाता; । तत्वें पुरुषप्रकृती भक्त पुसे लिहिन किमपि तें आता. ॥१६॥ (मंत्रभा.११-४४७)