या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-ऋ. (१) अनुप्रासचमत्कार. सारख्या अक्षरांची आवृत्ति होणे याला अनुप्रास ह्मणतात (वाग्भट). जेथे केवळ व्यंजनाचेंच सादृश्य असते किंवा एका व्यंजनाची अनेकदा आवृत्ति होते तेथे वृत्त्यनुप्रास होतो (अलंकारसर्वस्व). जेथें अनेक व्यंजनांची खरसहित किंवा स्वररहित अशी वारंवार आवृत्ति होते तो छेकानुप्रास जाणावा. शब्दार्थाचे स्वरूप भिन्न नसून तात्पर्य मात्र भिन्न असते, किंवा जेथें अर्थसहित शब्दाची आवृत्ति होते (अन्वयमात्र भिन्न पदाशी असतो) तेथें लाटानुप्रास समजावा. मोरोपंताच्या काव्यक्षेत्रांत अनुप्रासांच्या पिकांची गर्दी अतिशय झालेली आढळते. त्यातून काही निवडक उदाहरणे पुढे दिली आहेतः श्रीकृष्णाचे चित्तीं चिंता सुचिर चारु पदकमळ; । प्रक्षाळी हृदयींचे जे श्रीवक्षस्थळेकपदक मळ. ॥१॥ (भीष्मभक्तिभाग्य १) देवा दयासमुद्रा दत्ता ! दासासि देसि अपवर्ग. ॥ २ ॥ ( दत्तदयोदय १३) हित इतर न धन शमसम, यावरि तुज हे न कार्य सत्र पहा; । कवि रविरुचि शुचिभव तव व्हावा येणें न आर्य सत्रप हा.॥३॥(आदि.३३-९४) दावी प्रियेसि अगनगगगनगखग मृग नवे नद नद्या या.॥४॥(वन १२-१३४) तो पाशपाणिपुरुषाप्रति पतिपाी पतिव्रता पाहे. ॥५॥ (वन. १३-५३) धीर धरुनि धर्मझें धीरे धर्मे धनुष्य चढवीलें. ॥ ६ ॥ (द्रोण. २-२७) पावे पराक्रमि पुरुष पति पाहुनि दृष्टिपारणा रंभा. ॥ ७ ॥ (द्रोण. २०-७९) विश्रतविभव वरप्रद विभु विश्वावास विश्व जो रचितो.॥८॥६.२१-४३) स्पर्श पिनाकपाणी परमेश्वर पूतपाणिपद्मानें ॥ ९ ॥ (कर्ण. २२-२३) भक्षिति गरुड पळति अहि, महिसहितहि अहित कांपती धाकें । पक्षिपपक्षपवनरय भय दे, जय देव ह्मणितलें नाकें. ॥१०॥ (कर्ण. ३३.४७) पल्यंकावरि पडला पांडपृथापुत्र पावला पीडा; वैरिविजित विक्षतवपु विमुखत्वे वीरवर वरी व्रीडा. ॥११॥(कर्ण.३९-६) करिल क्रूर कुमति कुरुकुळकीर्तिकलंककाळ कां हो तें? ॥ १२ ॥ ( शल्य. ३.६८) मुनिमान्य मुक्तिचा हा मार्ग महामहित मानला मजला.॥१३॥(शांति.३-२६) सेवुनि सोमरसाते सकल सुरसमाजसहित शतमन्यु । स्वर्गासि जाय होउनि सत्कृत सानंद साश्रु गतमन्यु. ॥ १४ ॥ (अश्व.३-७५) झाला हा निबरवया हानि बरवया न जाणतां होय ॥ १५॥ (अश्व. १-१२५) भीम वधी पर-वारण परवा रणपंडिता तया नाही. ॥ १६ ॥ (कर्ण. ३८-२१)