________________
वासराधिपराजीवा ! वासरा जननीस्तन। वा! सरा! भक्तयादांच्या आसरा तूं दयाघन. ॥ १७ ॥ (विठ्ठलविज्ञापना १७) कुशल वचन ऐकतांचि ऐसें, कुशलव मुष्टिधर द्विजेंद्र गेला;। रुचिरवदनवालकद्वयाच्या । रुचिरवसंग्रहणे प्रहृष्ट झाला. ॥ १८ ॥ (कुशलवा. ५-२४) कृष्णाग्रजावरज बळकृष्णाश्रित करुनि कीर्तिला जतन, । कृष्णात्मजकुळनंदन कृष्णापति वीर पावले वतन. ॥ १९ ॥ (आदि. ३६.६७) पर्वरात्रिरमणामृतभासां सर्वगर्वहर निर्मलकांते । पर्वतेश्वरसुताधव शंभो ! शर्वमामवनतं जनमार्तम् ॥ २० ॥ (शंकरस्तव १) राधापुत्र बहु करी बाधा पार्थासि; तेधवां त्याला । राधाहृच्चोर ह्मणे, वा! धाक प्राप्त का तुला झाला. ॥ २१॥ (कर्ण. ४८-५२) तारामणमुखी ते तारारावें रडोनियां त्यातें, । तारा ह्मणे कपीदा ! तारावें दुःखसागरी मातें. ॥ २२ ॥ (मंत्ररामा. ४-७२) (आ) अयुतावृत्ति मध्यपद्यमकेः वंदेऽहं विठ्ठलं दातुं शं देहं धृतवान्प्रभुः । संदेहं हंतुमुदितो मंदेहं योऽशुमानिव ॥ २३ ॥ ( विठ्ठलप्रणिधि १) स्तविति नमुनि समुनिसुर प्रभुच्या शस्त्रास मग रुडनळास । स्तवितिल कवितिलकहि कां परमदकलिच्याहि न गरुड नळा). ॥२४॥ (हरिवंश. ९.१७१) ( यांत संयुतावृत्ति मध्यपदयमक, अयुतावृत्ति आदिपदयमक व अंत्यपदयमक ही साधिली आहेत.) सेवावा सर्वतीर्थीनीं, ठेवावा मनिं सज्जनी, । देवा वाटे त्याहि तोष, रेवावारिनिमज्जनीं. ॥ २५ ॥ (कृष्ण. ७९-२१) (वरच्यांत संयुतावृत्ति मध्यवर्णयमकही साधिलें आहे.) (इ) अयुतावृत्ति अंत्यपदयमकेः खजनभवांबुधितरणे! त्रिजगभूषणमहामणे तरणे ! ॥ . दे मज चापास रणीं दाविन दुटासि काळग्रहसरणी.॥२६॥ (कुशलवा. १०-४) मज दुःख पहावेना, आरडणे क्षणहि हे सहावेना। सदनांत रहावेना, उद्वेगें राज्यभर वहावेना. ॥२७॥(ब्रह्मोत्तरखंड.१०-१४) अस्मत्परिभव करितो आजि नभातें शरव्रजें भरितो। गोधन हरितो,वरितो कीर्ति,अशनिभृदरिकरिघटा हरितो.॥२८॥(विरा.३-८६) तसेंच हरिवंश (‘शनचिकीर्षित कळलें इ०') अ० ५० गी० ५२ पहा.