या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४२ ) (पंतांच्या काव्यांत दोन अर्धांच्या शेवटी जी यमकें आढळतात ती याचीच उदाहरणे होत. त्यांतील कांहीं लांब यमकें पुढे दिली आहेत.) (३) पुष्पयमकः-वृत्तांत यति येणारी अक्षरें सारखी जुळविली असल्यास पुष्पयमक होते, त्याची उदाहरणें केका ११८, ११९ ह्या होत. त्याची आणखी थोडी उदाहरणे: कितेक रथ मोडिले, ध्वज कितेकही तोडिले, । कितेक शर सोडिले, गज कितेकही झोडिले, ॥ असंख्य भट ताडिले, यमपुराकडे धाडिले.। शिरःप्रकर पाडिले, बहुत यापरी नाडिले. ॥ २९ ॥ (कुशलवा. १०-९) शिळेसि दिधली गती, जिस महामुनी मागती,। द्विषत्सहज सन्नती करि, तयासि अत्युन्नती, ॥ करूनि नत पावती, वरिति सिद्धि दे पाव ती, । जयास खळ कांपती, अजित आमुचा तूं पती. ॥ ३० ॥ (कृष्णवि.५६-३०) ( कृष्णविजय अध्याय ५६ श्लोक २९, ३१ व ३२ ह्यांतही पुष्पयमक साधिलें आहे.) (४) अश्वधाटी यमकः-'यमकाच्या पाठी व पुढे निराळे व्यंजन असल्यामुळे, प्रत्येक व्यंजनावर जशी काय उडी मारित यमक चालले आहे, असा भास झाला ह्मणजे अश्वधाटी यमक झाले. हे जसें चरणाच्या आरंभापासून तसें एकदम मधून व आयंतीही गुंफलेलें आढळतें' ( अलंकारमीमांसा ). याची थोडी उदाहरणे: वाजत, गाजत, लाजत साजत राजतरणी पुरा गेला. ॥ ३१ ॥ (शांति. ५-३) हरिजन अरिजन परिजन करि, जननि ! प्राज्ञजनसभे ! काय । हा दास यास हास त्रास नसो,-शिशुसि निदिना माय.॥३२॥(स्वर्गारोहण.२-४८) माटुनि वाटुनि घाटुनि चाटुनि पीतोसि विष मरायातें.॥३३॥ (गदा. १९०) न धरी बा ! दर, हा दर, सादर दे वाजवू पुन्हां नीट. ॥ ३४ ॥ (विराट.४-८) (५) आद्यंत यमकः-चरणाच्या किंवा अर्धाच्या आरंभी व अखेर यमक साधिल असले तर त्याला 'आद्यंत यमक' ह्मणतात. याची थोडी उदाहरणे: गळतीसमान नयनें गळती; । लपने न येति धड आलपने;॥ निजविग्रहासि उठवी निजवी; । जनकात्मजा स्मरतसे जनका. ॥ ३५ ॥ (कुशलवा. ४-७०) शोक लास्य करी हृदंगणिं कंठ केवळ शोकला;। कोमलानन पूर्णचंद्र तिचा तदा बहु कोमला; ॥ कां पती रुसला ह्मणे सकळेंद्रिये बहु कांपती। भार तीस निजांग होय, वदे अशी मग भारती. ॥३६॥ (कुशलवा. ४-७१ कां नवलास नव्हे, घट कर्ण गळी जरि बसेल कानवला?॥३७॥(द्रोण.१०-२१