या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४३ ) जा, गा मद्दानगुणा, दिधलें तुज जीवदान जा जा गा, । जागा दाटुनि केल्या हरि, वांचाया नसे गजा जागा. ॥ ३८ ॥ (कर्ण. ३१-४१) (वरच्या ३८ व्या गीतींत आद्य यमकही साधिलें आहे.) (६) दामयमकः-वृत्ताच्या जवळच्या दोन चरणांस जोडणाऱ्या यमकास दामयमक ह्मणतात. याचे उत्कृष्ट उदाहरण मोरोपंताचें दामरामायण होय. या यमकप्रकाराची थोडींशी उदाहरणे: सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करितात, । तो प्रिय या स्तवना की यास्तव नाकींहि हेचि वरितात.॥३९॥ (भीष्मभ.११७) पुसोनियां शोकपाणी, पाणी जोडूनियां नयें, । रामापुढे दीनवाणी, वाणी भरत हे स्वयें. ॥ ४० ॥ (कुशलवा. ३-५) करूनियां मज्जन विश्वपावनी, वनीं प्रवेशे मग जानकी वनीं; ॥ सचिंत पाहे मग देवरास ती; । सती ह्मणे आश्रम कां न दीसती. ॥ ४१ ॥ (कुशलवा. ४-१७) ह्मणे श्रीरामरमणी रमणीय वपुर्धरा । धराकन्या जगत्पद्मा पद्माक्षी कंबुकंधरा. ॥ ४२ ॥ (कुशलवा. २-२०) त्याचें करूनि निवारण वारणशत्रुप्रताप कुश बोले । धरुनि वृथा काम रणीं कां मरणीं सिद्ध मूढ हे झाले.॥४३॥(कुशलवा.१३-१२) गुणग्रहण दक्ष ते ह्मणति साधु साधु क्षमा । क्षमादुहितृनंदना ! धरु तुझा सदा पक्ष मा ॥ क्षमावळपराक्रमद्युति यशोनिधी सर्वदा । वदान्यपति हो सुखी चिर वसे सुहृत्सर्वदा. ॥ ४४ ॥ (कुशलवा. १३-५१) (७) समुद्यमकांची उदाहरणे: बहुमान सदा सांवरि साधु निका महित सज्जन वनौका । बहु मानस दासावरि साधुनि कामहित सज्ज नवनौका ॥ ४५ ॥ (नामरसायन ११ अनलसमीहित साधी राया ! वारा महीवरा ! कामा। अनलस मीहि तसा धीरा ! यावा रामही वरा का मा ? ॥ ४६ ॥ (वनपर्व ८-५०) (८) संदंश यमकाची उदाहरणे: हार विलासवतीने केला हा लक्ष्मणप्रसूनें कीं;। हारविला सवतीने क्षितिनें पुजिला सुरप्रसूनें की. ॥ ४७ ॥ (स्त्रीपर्व ४-१६) अश्वत्था मागावा वर पूजुनि परि भला नव्हे मुंजा;।। अश्वत्थामा गावा की तो गुरु खंडिजेचि शरपुंजा. ॥४८॥ (कर्ण. ११-३१) तोया याद वराया ज्या प्रेम्या धरितसे, भला भजनीं तो या यादवराया प्राप्त असो, की दुजा न लाभ जनीं.॥४९॥(विष्णुपदवकिली२८) पुंडरिका! क्षमा केली त्वां वैकुंठाधिका सदा. । पुंडरिकाक्ष माकेलीस्थाना त्या नाठवी कदा. ॥ ५० ॥ (पुंडरीकप्रार्थना १५)