या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ७३ ), राजरामायणांत नृग, ययाति, नहुष, यदु, पुरु, धुंधुमार......शत्य, द्रुपद, विराट, ककुत्स्थ, प्रियव्रत, उत्तानपाद अशी नांवें गोंविली आहेत. उदाहरण: उत्तम आनंद दिला, हृत्ताप न उरविला जनीं कांहीं, । पापषडरि दमिले प्रभुनामेंचि, अजेय जे अनीकांहीं. ॥ ८६ सन्नामगर्भरामायणांत श्रीगणपति, सरस्वती, कुलदेव, गुरु, शिव, विधि, नारद, प्रन्हाद, पराशर, पुंडरीक, सनक, बळी, व्यास, अंबरीष, शुक, शौनक, परीक्षिति, निवृत्ति, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, भानुदास, जनार्दन, एकोपंत, वामनखामी, श्रीधर, केशव गणेश, अनंत, कृष्णदास, जयराम, आनंदमूर्ति, रंगनाथ, रामदास, कल्याण, उद्धवचिद्धन, केशवखामी, शिवराम, पुरंदर, दासोपंत, दामाजीपंत, रामानंद, कवीर, रोहिदास, मलूकदास, पीपाजी, धनाजाट, नानक, मीराबाई, कर्माबाई, सेना न्हावी, माधवदास, तुळसीदास, मनसुखदास, रामप्रसाद, त्रिनयनवाणी, नरसिंहमहता, केवळकुवाजी, श्रुतिदेव, सुदामदेव, नामदेव, लाखाभक्त, जनी, गोरा कुंभार, सांवता माळी, खेचरविसोबा, चिंचवडकर देव, दामोदर देव, तुकावाणी, बोधला, मालोपंत, मुद्गल, बहिरापिसा, परिसा भागवत, हरिनारायण, मुकुंदराज, मुक्तेश्वर, कृष्णदयार्णव, जगमित्रनागा, आनंदतनय, निपटनिरंजन, मानपुरी, सूरदास, केशवदास, भक्तमालाकार, बिहारी, भक्तविजयकार, हरिविजयकार, वृंदावनवासी, अयोध्यावासी, काशीवासी, द्वारकावासी, सर्वक्षेत्रवासी, चोखामेळा, शंकराजीवावा, नारायणवावा, शिवदीन, प्रहाद बडवे, अमृतराय, पांडोबा आपा, गोविंद गोसावी, बाळकृष्ण बावा, विठोबादादा, सकळहरिजन, बाबूराय सदाशिव कालिदास, वैकंठाश्रय, ही नांवें गोंवून शेवटी 'पंढरपुरवासी हरिकथायज्ञश्रवणरासकसेवक सयर' असें स्वतःचे नावही घातले आहे. यावरून पंतांची समदृष्टी व सत्संगलालसा ही सुव्यक्त होतात. या रामायणाचे एक उदाहरण:-- भव्यार्थ व्यक्त कथी अंगद, परि साम न करि अविचार । तो निजलयरुचि दावी रामहरिपुढे निकाम अविचार. ॥ ८७. २६ वे परंतु रामायणः श्रीरामचरित करितें मुक्त सकृत् किमपि सेवितां भावें। पार न लागे दशशतवदनांहि, परंतु वाटतें गावें. ॥१ थोडे परंतु रामायण रामपदी उदंड हो भावें। लोभावें रसिकजनीं या सुयशें सज्जनांत शोभावें. ॥ ८८ । यांतील प्रत्येक गीतींत 'परंतु' शब्द कवीने मोठ्या चातुर्यानें अर्थहानि बिलकुल होऊं न देतां योजिला आहे. २७ व्या लघुरामायणांत केवळ लध्वक्षरेंच योजिली आहेत. कुशिकतनयसवसमवन करि मुनिवरयुवतिदुरितगिरिस खणि, । मग पुरहरधनु चुरि, वरि अवनिजनिस, सकळसुभटमुकुटमाणि. ॥२