या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ७४ ) कपिपतिसुतनुस महिजनि निजनिकटचि बसवि, सुखवि बहु परमा; । वदलि, 'सखि ! मम पतिस तव पतिच जवळि मजहि सदयमति सरमा.' ॥ . या रामायणांत पंतांनी लघ्वक्षरें योजून अनुप्रासही चांगले साधले आहेत. चित्रकाव्याच्या नात्याने या रामायणाची योग्यता मोठी आहे. २८ निरोष्ठरामायणांत पंतांनी ओष्ट्यवर्णांची योजना केली नाही. पुढच्या दामरामायणांत गीतीच्या प्रत्येक अर्धाची शेवटील थोडी अक्षरें (बहुतकरून तीन, क्वचित् स्थळी दोन किंवा चार) दुसऱ्या अर्धाच्या आरंभी आणून फुलें एकांत एक गुंतवून जसा त्यांचा हार करितात तसा (दाम-हार) बनविला आहे. याची उदाहरणे:- (प्रभुचरित्रमहिमा) पिक वीतबाध कवि या चरिताम्रवनांत कूजिती, सुरस । सुरसमींचा लाजे, यश हे श्रीशिव ह्मणे 'शिवे परिस.' ॥३ परिस सुवर्ण करितसे लोहा, जीवासि शिवचि हा महिमा, । महिमान्या वर्गाही, खकुल ह्मणे धन्य यत्प्रभा अहिमा. ॥ ४ ३१ व्या दीर्घरामायणांत प्रत्येक गीतींत कवीने योजवतील तितके 'म'गण योजिले आहेत. गीत्यर्धाच्या सहाव्या स्थानी फक्त पंतांनी 'ज'गण निरुपायास्तव योजिलेला आढळतो. प्रत्येक गीत्यर्धातील १६ अक्षरांपैकी १४ अक्षरें गुरु असून २ मात्र लघु आहेत. उदाहरण: कल्याणाच्या मूळा श्रीकांता भक्तवत्सला ताता प्रार्थी अत्युन्मत्ता दिकंठातें वधावया धाता. ॥ १ ३७ व सौम्य रामायणां'त वृत्तनियमाप्रमाणे पहिल्या अर्धात सर्व गुरु अक्षरे व दुसऱ्या अर्धात सर्व लघु अक्षरें योजिली आहेत. लघुरामायण, दीर्घरामायण, व हे सौम्य रामायण यावरून पंतांचे भाषाप्रभुत्व चांगले व्यक्त होते. याचे उदाहरणः- (अहिल्योद्धार व सीताहरण.) • वारी पादस्पर्श तापा, तारी साध्वी, नाशी शापा;। पुरवि जनकपण, चुरि पुरहरधनु, वरि विभु महिजनु सुरुचिरतरतनु. ॥ ८ अद्भुत रामायण- या नावाचे एक त्रुटित प्रकरण मोरोपंतकृत ह्मणून आढळतें अस एका गृहस्थानें काव्यसंग्रहकारास मागे कळविले होते. रसिकांनी त्याचा शोध करावा ह्मणून त्यांतील एक आर्या पुढे दिली आहे:- . कैलासा डळमळवी त्यातें शिवचाप काय न ढळावें ? । हे अद्भुत सीतेनें तें धनु घोडा करूनि खेळावें. ॥ ७३ वे ओवी रामायणः- यांत ओवी व गीति अशी दोन्ही वृत्तं साधिली आहेत. त्याची उदाहरणें वंदुनि सरस्वतीला ध्याती कुलदेवतेसि कवि सर्व । गाती निजपूर्वजगुरुमूर्ती हरि गुरु तथैव कवि शर्व. ॥ ६३ ॥ (ओवी) वंदुनि सरस्वतीला ध्याती । कुलदेवतेसि कवि सर्व गाती । निजपूर्वजगुरुमूर्ती । हरि गुरु तथैव कवि शर्व. ॥