या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुराणीक लोकांचा तसा समज असल्याचे दिसून येते. परंतु हा समज सर्वस्वी निराधार आहे. कै. रावबहादुर दादोबा पांडुरंग यांनी पहिल्या व इतर काही केकांच्या चरणांचे दोन दोन अर्थ केले आहेत, त्यावरून ही गैरसमजूत पुष्कळ लोकांच्या मनांत वाणली असावी असे वाटते. पण ते अर्थ किती ओढून ताणून बसविले आहेत ह्याकडे पुष्कळांचे लक्ष्य गेले नाही. पंडितलोकांची श्लेषप्रीति शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पंतांच्या काव्यांची जेव्हां चहूंकडे प्रसिद्धि झाली तेव्हां पांडित्याचा एक मोठा आधार जी श्लेषप्रीति ती पंतांच्या काव्यांत असेल असें समजून हरदास, पुराणीक, पंतांच्या काव्यांत श्लेष हुडकू लागले व एकाक्षरी यक्षरी कोशांच्या साह्याने पंतांच्या साध्या कवितेच्या ते चिंधड्या उडवू लागले. 'कृष्णानुजा सुभद्रा' इ०, 'आर्या आर्यांसि रुचे' इ०, ह्या साध्या आर्याचे अनेकार्थत्व कोणत्या प्रकारचे आहे हे 'निबंधमाला'वाचकांस विश्रतच आहे. 'प्रत्यक्षर श्लेषमयप्रबंधविन्यासवैदग्ध्यनिधिनिबंधम्' अशा प्रकारच्या श्लेपरचनेस मान डोलविणाऱ्या पंडितांच्या अनुयायांनी केकावली' व इतर पंतांच्या कवितेत अनेक अर्थ धुंडणे यांत आश्चर्य कसचे ? _ (३) खुबीदार शब्दयोजना. बहुतेक केकांतील बहुतेक शब्द मोठ्या मार्मिकतेने योजिलेले आढळतात. याची उदाहरणे:-सुरभि, जगन्नायकी (के० ४), कन्यका (के १०), (के० १२), वरद, वत्सल, श्रीकरा (के० १३), करुणार्णवा (के० २०), परम चांगले बहुसमर्थ, दाते इ० (के. २९), हितकरा दयासागरा (के० ३०), स्वरिपुची, तशी, बटिक (के० ३७), सुनय, आप्त (के० ३८), (के० ३९), प्रभुवरा (के० ४७), बृहदुदारलीलाकरें (के ०४३), (के० ५८), उद्धतें (के ० ५९), स्वभक्तमुरपादपा (के० ६१), पराक्रमपटो (के० ६२), प्रसादचतुर (के० ६३), योगमायाधवा (के० ७४), आटला (के० ७६), जगत्रयमनोहरा, बलगुणैकरत्नाकरा (के० ८३), असाधुला (के० ९३), प्रतिक्षण, नवीच, शुकाहि, संन्यासिया (के० १००), -- नारदा (के० ११२), स्वभक्तसुरपादपा (के० ११३), जगद्गुरुमहेश्वर इ० (के. ११८), के० ११९) इत्यादि. काव्यरसिकांस पंतांची कवितावधू अशाच प्रकारच्या आपल्या अंगच्या गुणांमुळे 'प्रतिक्षणी नवीच रुचि देते.' (४)केकावलीचा सूचकपणा. वाचकांस या काव्यांतील पौराणिक दृष्टांत वाचून शेकडो प्रसंग आठवतात. कित्येक गोष्टी सुचतात व चमत्कृतिजनक व आन ददायी असे भिन्न भिन्न देखावे दिसतात. प्रसिद्ध इंग्रज टीकाकार मेकॉले यान आंग्ल कविश्रेष्ठ मिल्टन याच्या Paradise Lostइत्यादि काव्यांसंबंधी पुढील वाक्यांत जे झटले आहे ते पंतांच्या 'केकावली'स चांगले लागतें:-"The most striking characteristic of the poetry of Milton is the extreme remoteness of the associations by means of which it acts on the reader. Its effect is produced not so much by what