________________
( ३८ ) चिरंतन कल्याण आहे असे स्पष्ट दर्शविले आहे. तसेंच केका ३०-३२ त परमेश्वराचा अधिकार साधुसंतांच्या अधिकारापेक्षां सहस्रपटीने मोठा आहे, यास्तव साधुसंतांचं स्तवन न करितां परमेश्वराचे स्तवन करावें; स्तुति साधुसंतांना शोभत नाही व पचत नाही, ती परमेश्वरालाच साजते व पचते, म्हणून 'स्तुती करावी परमेश्वराची । करूं. नये व्यर्थ कधी नराची. ॥' असा यथार्थ अभिप्राय कवीने दर्शविला आहे. इतर कवींनी आपल्या काव्यांतून व पंतांनीही इतर स्फुट प्रकरणांतून साधुसंतांचे अतिशय महत्त्व वणून त्यांना देवापेक्षाही जास्त मान दिलेला आहे. पण ३० व्या केकेंत भगवद्भक्तांना आपली स्तुति आवडत नाही, आपली स्तुति करणाऱ्या माणसांना ते 'आझी स्तुतीस पात्र नाही, तुम्ही भगवंताची स्तुति करा' असे सांगतात म्हणून वर्णन केले आहे; व हा त्यांचा अभिप्राय यथार्थ, सर्वमान्य होण्याजोगा व वरच्या पायरीचा असा आहे. तसेंच भगवत्स्तुति हाच काव्याचा खरा विषय असें ३२ व्या केकेंत कवीने स्पष्ट सांगितले आहे. 'मंत्रभागवताच्या एका गीतींत पुढील बाणेदार उद्गार आढळतो तोही यासंबंधाने संस्मरणीय होय:-'सुयश न जयांत हरिचे चित्रहि गुणभवन कवन तें अशुची; । त्यांत सुमति नर न रमति पळही, बहु मानिती तया पशुची. ॥.' पंतांनी कविता केली ती परमेश्वराचे गुण वर्णन करण्याकरितां नसून स्वतःस यशोलाभ व्हावा म्हणून रचिली ह्या आक्षेपांस वर निर्दिष्ट केलेल्या केकांत, वरील गीतींत व पंतांच्या एकंदर कवितेंत उत्तम उत्तर सांपडतं. सारांश गीतेत परमात्म्यांनी अर्जुनास 'मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवैष्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे ।।' या व इतर श्लोकांत में भक्तीचें सकल रहस्य सांगितले आहे त्याचाच अनुवाद पंतांनी ह्या काव्यांत केला आहे. (६) भक्तिमार्गाचे प्राधान्य. या काव्यांत जपतप, दानधर्म, योगयाग इत्यादि मार्गीपेक्षां भक्तिमार्गाचे फार महत्व वर्णिले आहे. गीतेप्रमाणेच यांतही कर्मयोग व ज्ञानयोग यांची पायरी भक्तियोगाच्या खालचीच मानलेली आढळते. कृष्णाने केलेली अर्जुनाची मोतद्दारी,धर्मराजाच्या यज्ञांत त्याने ब्राह्मणांच्या पत्रावळी काढणे, 'कंसदासी कुब्जेचा स्वीकार, 'पृथुकतंदुलप्रसृति स्वीकार, विदुरमंदिरी कण्या खाणे, शबरीने दिलेली बोरें खाणे, शुक प्रहाद नारद यांची भक्ति, इत्यादि गोष्टी भक्तिमार्गाचेच प्राधान्य दाखवितात. केका ११४ त नारदानें योगयागादि मार्गापेक्षां भक्तिमार्ग श्रेयस्कर असे म्हटले आहे ; व केका ५८ व १०० त भगवत्कथेचे महात्म्य वर्णिले आहे. या दोन गोष्टींवरून वरील म्हणण्यासच बळकटी येते. भक्तिरसाचा स्वाद ह्या काव्यात फार चांगला अनुभवास येतो. तो इतका की भक्तिरसाचा मकरंद जसा या काव्यांतून थबथबत असून रसिकमिलिंदाची वाटच पहात आहे. ईश्वराची पतितपावनता, अत्यंत सदयता, भक्तजनांवरील त्याचे उत्कट प्रेम, क्षमाशीलता व