या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९) सर्वसाक्षित्व हे गुण उत्कृष्ट रीतीने यांत वर्णिलेले आहेत. या सर्वांत विशेष गोष्ट ही की, देवाची कृपा सुष्टांप्रमाणे दुष्टांवरही असते. त्यांच्या दुष्टपणाबद्दल त्यांना शासन करून पुनरपि तो त्यांना सद्गतीच देतो, दुर्गति देत नाही' हे अतिशय उदात्त तत्व पंतांनी ह्या काव्यांत केका ८९-९२ त उत्तम रीतीने प्रतिपादिले आहे. आमच्या ह्या कवीच्या काव्यांत भक्तिरसाचा पूर प्रसंगविशेषीं इतका उद्दाम झालेला आहे की सागवतकार व अर्वाचीन संतमंडळी यांच्या भक्तिनदाप्रमाणे तो मध्ये मध्ये योग्यमर्यादेचे अतिक्रमण करून बराच पुढे गेलेला आढळतो. भक्त व देव यांचा संबंध अतिशय निकट आहे असें अद्वैतमतान्वयें वर्णन करितांना जागोजागी ईश्वराशी अति प्रसंग केलेला व त्याजवर कोटी लढविलेली आढळते. या देवभक्तांमधील अतिशय सलगीमुळे काही थोड्या स्थळी फाजील शृंगाररसाचा थोडासा शिडकारा उडलेला आहे त्याबद्दल केकावलि पृ० ५७ मध्ये विचार केला आहे. एका ठिकाणी (के० ३९) भक्तीचे वर्णन करितांना काहींना अतिरिक्त वर्णन झाल्याचा भास होईल, त्या व इतर गोष्टीसंबंधाने येथे वेगळे न लिहितां आझी २४ व्या केकेवरील टिपेवरच हवाला देतो. वरील दोष वजा करून पाहिले असतां ह्या काव्यांत ईश्वराचे स्वरूप फार यथार्थपणाने दाखविलेले आढळेल. देवाच्या पतितपावनतेसंबंधी पंतांचा अभिप्राय फार सुसंस्कृत असून ह्यांत त्यांनी आपलें भक्तिसर्वस्व प्रकट केले आहे. तसें करितांना काही जागी परमेश्वराला आपले आयुष्य देणे वगैरे हास्यास्पद विचार आढळतात. त्यांचा तार्किकदृष्टया विचार न करितां काव्यदृष्टया विचार करावा ह्मणजे वाचकांना ते फारच गोड लागतील. याविषयी मेकॉलेने आपल्या एका निबंधांत पुढील उद्गार काढिला आहे; "Perhaps no person can be a poet, or can even enjoy poetry, without certain unsoundness of mind, if anything which gives so much pleasure ought to be called unsoundness. Truth, indeed, is essential to poetry, but it is the truth of madness. The reasonings are just; but the premises are false. After the first suppositions have been made, everything ought to be consistent but these first suppositions require a degree of credulity which almost amounts to a partial and temporary derangement of the intellect.” . सारांश मनाचे रंजन करणे हा एक कवितेचा मुख्य हेतु आहे. तो साधण्यास कवीला जशा काही कल्पना योजाव्या लागतात, तशा प्रकारचा काही भ्रम वाचणाऱ्याच्याही मनावर काही वेळ असावा लागतो. ह्मणून काव्याचा उपभोग घेण्यास ह्मणजे त्याच्या , योगाने चित्तास रंजविण्यास मनुष्याने आपले कांही ज्ञान काही वेळ विसरले पाहिजे (पृ० १३४-१३५. टीप ४. 'काव्यांतील भ्रामक कल्पना व काव्यानंद' हा विषय पहावा.)