या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४० ) (७) सुभाषिते व श्रेष्ठ नीतितत्वांचा संग्रह. पंतांच्या काव्यांतून अर्थातरन्यास अलंकार किंवा सुभाषितें ही पुष्कळ ठिकाणी योजिलेली आढळतात. (परिशिष्ट-ख पहा). पंतांचे काव्य गटले ह्मणजे ह्या अनर्त्य सुभाषितरत्नांनी गुंफिलेली रत्नमालाच होय. ती कंठांत धारण करणा-या वाचकांस दुर्बुद्धिपिशाचिकेची बाधा कदापि होणे नाही. 'केकावली'त ही सुभाषितं सुंदर विचाररूपानेही दृष्टीस पडतात. अर्थातरन्यासाची कांही उदाहरणे:- (१) उरे तृण न भेटतां विंगळा (के० २), (२) अलंकृतिमती सती मनि झुरे न जो संगती (के०१३), (३) न लाभ मणिहेमभूपतिस जोडिल्या आयतें, परि प्रभुहि संग्रहीं सकळ वस्तुला ठेविती, गुणा न झणतां उणा अधिक आदरें सेविती (के० २३), (४) ह्मणोनि ह्मणती भले न रिण जन्मदेचें फिटे (के. ९५), (५) कवी भिऊनि ह्मणतील कां जशि सुधा तशी काकवी (के० १०९), (६) चामरे नृपांसि उचितें वृथा मिरविली जरी पामरे (के० ७८), (७) अमृत नेदिजे घातुकें (९०), (८) अपथ्यरुचि रुग्ण तो कटुक ओख दें कोण पी ? (८९), (९) सकोप दिसती गुरु क्षणभरीच, जें तापलें, जल ज्वलनसंगमें त्यजि न शैत्य तें आपले (८८), (१०) सुधा त्यजुनि कामुक प्रकट अंगनाशा पिती (के० ८३), (१०) कापिती भटासि ! भट संगरी परि न कातरा दापिती (के० ७९). इतर कवींच्या काव्यांत फारसा न आढळणारा असा हा सुभाषितसंग्रहाचा विशेष पंतांच्या काव्यांत सार्वत्रिक आढळतो. एका प्रख्यात टीकाकाराने रोमन कविवर्य होरेस याच्या कवितेविषयी जे मटले आहे तें पंतांच्या कवितेला चांगले लागू पडतें. तो टीकाकार हाणतो"We may justly say of Horace, that, of all poets, he has extracted the most from philosophy, and amassed in his odes maxims of morality and philosophical truths than any Roman poet whatever. I must transcribe the greater part of Horace, were I to collect all the momentous principles of morality diffused through his works, in which his chief intention is to improve reason, and purify the heart from any vicious passion, to give us useful rules for our behaviour, not only under adversity, but likewise in prosperous circumstances, which are more dangerous to virtue than afHictions, and to establish a perfect tranquility in our minds by rescuing us from the tyranny of ambition and of fear." पंतांच्या कवितेत उत्तम नातितत्वे, सुंदर तात्विक विचार, सरस नैतिक दृष्टांत, व अंतःकरण प्रसन्न करणारे