या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४२ ) उत्कर्ष झालेला आहे, ५३-५८ ह्या सहा केकांत भगवत्कथा व विषयवासना यांचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्यांतील रसपरिपाक पहिल्या प्रतीचा उतरला आहे. ५९, ६० यांत कवीने काव्यचमत्कृति करून आपल्या काव्यनिंदकांस जो टोमणा मारिला आहे, त्यांतील व्याजोक्ति फार खोचदार आहे. यापुढील पांच के कांत ध्रुवाप्रमाणे मला कृतार्थ करा अशी प्रार्थना करितांना कवीने जे विचार प्रदर्शित केले आहेत ते बहुमोल आहेत. ६५ व्या केकेंत ध्रुवाची योग्यता व स्वतःचा कमीपणा यांचे चटकदार वर्णन आहे. पुढील पद्यांतील प्रभुत्व व प्रसाद यांच्या व्याख्या फार चित्ताकर्षक असून त्याच्याच पुढल्या ह्मणजे ६७ व्या केकेंत दात्याने दान देतांना कोणकोणत्या गोष्टींचा विचार अवश्य केला पाहिजे, याविषयीचे उद्गार अत्यंत मार्मिक आहेत. ६८,६९ केकांत सत्पात्री व असत्तात्री केलेल्या वरदानाची उदाहरणे वरील विचारांच्या समर्थनार्थ योजिलेली आहेत. पुढील दोन केकांत शिवविष्णूचा अभेद सुंदर रीतीनें वर्णिला आहे. ७३ व्या केकेंत व्यासाची योग्यता वर्णन, ७४, ७५ यांत कवीनें भगवन्नाममाहात्म्याचे सुरस वर्णन केले आहे. ७६,७७ त वामनावतारांतील कथाभाग आणिला असून त्याच्या पुढील दोन पद्यांत बळीप्रमाणे माझी परीक्षा करूं नका, असे सांगतांना कर्ममार्गापेक्षां भक्तिमार्गाचे प्राधान्य सुचविले आहे. ८०-८४ ह्यांत रामजन्मापासून सीताहरणापर्यंतचा बहुतेक कथाभाग मोठ्या खुबीदार शब्दांनी कवीने गोविला आहे. यांतील बहुतेक पदें अर्थपूर्ण आहेत. ही पद्ये 'केकावली'च्या सूचकपणाची चांगली उदाहरणे आहेत. ८५ व्या केकेंत 'न में प्रिय, सदोष तें प्रिय सदोषही चांगले' हा व्यवहारांतला अनुभव सांगून त्यांत व पुढल्या २ केकांत कृष्णावतारांतील कथांनी त्याचे कवीने समर्थन केले आहे. ८८-९८ ह्या अकरा केकांत कवीने भगवंताचें अनुपम सदयत्व अत्युत्कृष्ट रीतीनें वर्णिले आहे. भगवंताच्या ह्या दयागुणाचे वर्णन पंतांना अतिशय उत्तम साधलें आहे. ईश्वर दुष्टांचा संहार त्यांच्या कल्याणास्तवच करितो, हे ८९-९२ ह्या चार केकांत वर्णिलेलें आध्यात्मिक तत्व धर्मविचाराच्या अगदी शेवटच्या पायरीस पोंचलेल्या लोकांस संमत असून ते त्याची गणना पहिल्या प्रतीच्या धर्मतत्वांत करितात. ९३-९४ ह्या केकांत भगवंताचे सदय पितृत्व वणितांना पित्याला कोणता पुत्र आवडतो त्याचे सुरेख वर्णन आहे. पुढील केकेंतील मातृमहिमा तर सर्व वाचकांस मोहून टाकील, इतका तो सुंदर वठला आहे. ईश्वराची दया मातेच्या दयेपेक्षाही जास्त आहे, ईश्वराची कृपा हाच आमची खरी माता, आमच्या आया ह्या त्या कृपाजननीने ठेवलेल्या दाया - उदात्त विचार ९६.९७ ह्या केकांत आमच्या ह्या कवीच्या प्र र आहेत. ९९ व्या केकेंत भगवंताच्या कृतज्ञतेचे सुरेख वर्णन