या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काव्यवृत्त. जसें कालिदासाचे आवडते वृत्त मंदाक्रांता, भवभूतीचे शिखरिणी, भारवीचं वंशस्थ, पुराणकवि व्यास वाल्मीक यांचे अनुष्टुभ, तसें मोरोपंतांचे आवडते वृत्त गीतिछंद होय. यालाच पंत आर्या म्हणत. या वृत्ताच्या स्तुतिपर पंतांनी आपल्या काव्यांतून बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला आहे. (परिशिष्ट 'इ' पहा.) याची योजना पंतांच्या पूर्वी मराठी काव्यांतून फारशी कोणी केली नसून पंतांनीच तिला उदयास आणून पहिला प्रचार पाडला. याविषयीं 'नामसुधाच पकांत पंतांनी आठ नऊ आयर्या रचिल्या कर्षक त्यांतील एक अशी: कटी प्रथम भगीरथ नृप लोकी सुरनदी सती आया । तति । मयूर नाही तरि सर्वांला न दीसती आर्या ।। १११ ॥. पंतांचे बहुतेक ग्रंथ ह्याच वृत्तांत रचिले आहेत. पंतांची लोकबद्ध कविताही बरीच असून ती भिन्न भिन्न वृत्तांत गुंफलेली आहे. केकावली' नांवाची पंतांची दोन काव्ये आहेत. त्यांपैकी एक आर्याबद्ध असून दुसरे प्रस्तुत काव्य होय. हे पृथ्वीछंदांत रचिलेले आहे. काव्यनियमास अनुसरून यांतील अंतिम श्लोक मात्र त्यांनी भिन्न वृत्तांत म्हणजे स्रग्धराछंदांत रचिला आहे. ह्या दोन्ही वृत्तांची लक्षणे केकावलीतील प्रथम व अंतिम श्लोकांत संस्कृत वृत्तग्रंथांतून दिली आहेत. पृथ्वीछंदाचे लक्षण ‘ज सा ज स य ला गज-ग्रह-विराम पृथ्वी गुरु' असें वृत्तमणिमालेत दिले. ज, स, ज, स, य हे गण व पुढे लघु व गुरु अशी दोन अक्षरें, चरणांतील आठव्या व त्याच्या पुढील नवव्या म्हणजे शेवटच्या अक्षरावर यति असतो. (कारण गज-दिग्गज आठ असून ग्रह नऊ आहेत.) जसें: सदाथि तपदा सॅदाशि वमनो विनोदो स्प दो ज स ज स य ल ग स्रग्धराछंदाचे लक्षण 'शैली शैली यतीते म र भ न य य या जाण बा स्रग्धरा ते'. म, र, भ, न व ३ य हे गण व प्रत्येक सातव्या अक्षरावर यति (कारण शैल म्हणजे पर्वत सप्तकुलाचल-हे सात आहेत) असतो. जसें: कारुण्या भोदरी मप्रिय सँखेंगु रुहीजो मयूरा नॅटाचा ___ म र भ न य य य पृथ्वी हे वृत्त कारुण्यजनक व औत्सुक्यदर्शक समजून कवीने अत्यंत समीचीन म्हणून ह्या स्तोत्रकाव्यांत योजिले आहे असे वाटते. ह्याच वृत्तांत पंतांनी एक सबंध रामाय ल आहे. त्याचे नांव पृथ्वीरामायण असे असून काव्यसंग्रहांत तें छापून प्रसिद्ध झाले आहे.