या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कवितेचा थोडक्यांत रसास्वाद घेऊ इच्छिणाऱ्या इतर वाचकांस हे काव्य होईल तितकें सुलभ करण्याचा यत्न केला असून त्याचे लक्ष्यपूर्वक परिशीलन करणाऱ्या वाचकांस ह्या काव्यकुसुमांतील थोडा तरी मकरंद मिळावा अशी योजना केली आहे. हे काम मजसारख्या अल्पमतीकडे न देतां एखाद्या विद्वान् गृहस्थाकडे सोपविलें असतें तर ह्यापेक्षां पुष्कळपटीने ते चांगले झाले असते यांत तिळमात्र शंका नाही. पण कै. वामनरावजी ओकांप्रमाणे महाराष्ट्रकाव्यग्रंथांचा जीर्णोद्धार करणारी, त्यांतील अनर्थ्य रत्नांस शाणोल्लेखन करून त्यांच्या प्रभेनें रत्नपरीक्षकांस व इतर प्रेक्षकांस आकर्षण करणारी व स्वभाषेच्या उन्नत्यर्थ कायावाचामनेंकरून झटणारी अशी मंडळी फार थोडी आहे. महाराष्ट्रातील बहुतेक विद्वान् मंडळी देशी भाषेविषयी अगदी उदासीन अशी आहे. तेव्हां ह्या काव्यावर टीपा देण्यास, तसेच त्यांस कविचरित्र, केकावलीची प्ररतावना इ० जोडण्यास माझ्यासारख्या अनधिकाऱ्यासच पुढे येणे भाग पडले. मी लिहिलेली संपूर्ण टीका कै. वामनरावजींसारख्या विद्वानाच्या डोळ्यांखालून-गेली ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. ही आवृत्ति स्वतंत्र पुस्तकरूपाने काढण्याचे दुसरे कारण असे की, सध्या मुंबईविश्वविद्यालयांतून मराठी, गुजराथी इत्यादि देशीभाषांचा प्रवेश व्हावा ह्मणून विद्वद्रत्न नामदार न्यायमूर्ति रावबहादुर माधवराव गोविंद रानडे हे अश्रांत परिश्रम करीत आहेत. अशा वेळी आमच्या महाराष्ट्र कवींची योग्यता लोकांपुढे आणून आमच्या पदवीधर विद्वानांचे महाराष्ट्र कवितासंग्रहाचे संबंधी अनुकूल मत तयार करणे फार अगत्याचे आहे. ह्या कामास आपणही आपल्याकडून होईल तितकें साह्य करावे या हेतूने महाराष्ट्रकविवर्याच्या अत्युत्तम काव्याची विस्तृत टिपांसहित ही आवृत्ति काढली आहे. ह्या पुस्तकावरून पंतांचे हे काव्य समजून घेणाऱ्या वाचकांस महाराष्ट्रकाव्यांची गोडी लागून आमची मातृभाषा विश्वविद्यालया-- तील अत्युच्च परीक्षेच्या अभ्यासक्रमांत शिरण्याच्या योग्यतेची आहे असें कालांतराने का होईना पण वाटल्यास माझ्या श्रमांचे चांगले साफल्य झाले असें मी समजेन. __ ह्या ग्रंथांत माझ्या अल्पज्ञतेमुळे दोषस्थळे पुष्कळच राहिली असतील, ती सर्व रसिक व मार्मिक अशा वाचकांनी दाखवावी ह्मणजे पुढच्या आवृत्तीत ती काढून टाकण्यात येतील. तेव्हां वाचकांस विनंति एवढीच आहे की, 'पुरुषाचा धर्म भ्रम म्हणोनि कांहीं पडेल येथ उणें । पूर्ण करावें शोधुनि भगवत्प्रीत्यर्थ सजनें निपुणे ॥' (भगवद्गीतेवरील पंतांच्या आर्या). ह्या पुस्तकासंबंधी बरा वाईट जसा ज्याचा अभिप्राय पडेल तसा त्याने सौम्यपणे किंवा कडकपणाने निःशंक द्यावा. अनुकूल, प्रतिकूल, कडक, सा, अशा सर्व प्रकारच्या अभिप्रायांचा सादर स्वीकार करण्यांत येऊन त्याप्रमाणे पुढे वर्तन करण्यात येईल. टीकाकारांच्या कडक व स्पष्ट अशा टीकेपासून ग्रंथकारांस