________________
केकावलि. उणें किमपि; भाविकां उबगशील तूं देव कां । अनन्यगतिका जनां निरखितांचि सोपद्रवा, तुझेंचि, करुणार्णवा ! मन धरी उमोप द्वैवा. ॥ २० १. त्रासशील, कंटाळशील. 'उबगणे' हा बहुतकरून कंटाळणे-त्रासणे, अशा अर्थी प्राचीन ग्रंथभाषेत अकर्मक धातु आढळतो; उदाहरणे-(१) 'उबगलें सासुऱ्यां आतां मज माहेरासि न्या वो (मुकुंदराज-पद), (२) सुवर्णरत्नांचिया राशी। भव्य दक्षिणा देतां ऋषी। उबगोनि सांगितलें धनासी। नेता घेता असेना ॥ [मुक्तेश्वर-सभापर्व-अ० २ ओं० ६ पृ० ८], (३) परि जीवें उबगणे हे स्थिति । न पाहे माय ॥ [ज्ञानेश्वरी-अ० १८ - ओ० ५८९ पृ० ४८०]. 'उबगणे' यापासूनच 'उबग' असें नाम असून अर्थ कंटाला तिटकारा, असा आहे. 'उबग' न मानून विशेष । पचवूनि घालीं मज आतां ॥' [श्रीधर-शिवलीलामृत-अ० १४ ओंवी १२९] चालू भात कंटाळणे या अर्थी ‘उवणे' असा धातु आहे. २. 'तूं देव भाविकां कां उबगशील?' याचे उत्तर-उबगणार (कंटाळणार) नाहींस, हे होय. आपला दयालु स्वभाव आपल्याला भक्तांची उपेक्षा करू देणार नाही असा अर्थ. ३. अन्+अन्य+गति+का=नाहीं+इतर+आश्रय आधार+प्रत्यय ज्यांना दुसरी गति नाही ते अनन्यगतिक, ज्यांना शरण जावयास इतर स्थान नाहीं ते, अनाश्रित. परमेश्वराशिवाय आपल्या पापांची क्षमा करण्यास ज्यांना दुसरे स्थान नाही अशा सोपद्रवा (पीडित, स+उपद्रवा) जनां (लोकांना) निरखितांचि (पहातांच) [हे] करुणार्णवा! (हे दयासागरा! ईश्वरा!) तुझेंचि मन उमोप (पुष्कळ) द्रवा (ओलाव्यास) धरी (धरिते). आपल्याशिवाय ज्यांचा कोणी त्राता नाही अशा अनाथ गांजलेल्या भक्तांना पाहून परमेश्वराच्या मनाला जर दयेचा पाझर फुटतो तर मग तो परमेश्वर भक्तांना कसा बरे त्रासेल? भक्तांना किंचित् दुःख झाले तरी त्याबद्दल कळवळणारा परमेश्वर त्यांची उपेक्षा कधी तरी करील काय ? --अर्थात् नाही हे उत्तर. जे भक्तजन अनन्यभावाने माझी कांस धरितात आणि मला भजतात त्यांची चिंता मी वाहतो म्हणून गीतेंत परमेश्वराचेंच वचन आहे. केका ११ वरील टीप ३ पहा. ४. 'करुणार्णवा!' हे विशेषण साभिप्राय आहे म्हणून येथे परिकर अलंकार जाणावा. [मागें केका १ टीपा पृ० ३ पहा.] ५. पुष्कळ. 'उमोप' हे येथे 'द्रवा' याचें विशेषण न करतां, "धरी' याचे क्रियाविशेषण करून अन्वय लाविला तरी चालेल. तुझेंचि मन द्वा उमोप (पुष्कळपणी, विपुलपणी) धरी-असा अन्वय. तुला दया फार येते-असा अर्थ. उमोप-उत्-मोप-वर-+-माप मापावर-पुष्कळ, असा अर्थ दिसतो. पंतांनीं 'उमोप' हा शब्द कोठे कोठे योजिला आहे. 'धर्माच्या चित्तवृत्तिप्रति न दखवितां युक्तिने घे निरोपा, तो पाय मापतीचे नमि, विनवि, म्हणे, 'शीघ्र येतों, न कोपा. पाळांचीहि, भीड प्रभु धरि, न कसी बंधुची या उमोपा, ओपा योगाग्निमध्ये तनुहि, परि नका भक्तिवांचूनि सोपा.' ॥ १६ ॥ [कृष्णविजय- उत्तरार्ध-अ० ५८]. 'उमोप' हा जुना मराठी