या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत कळी करि सुनिर्मळी परम उग्र दावा नळीं; शब्द दिसतो. कुळवाड्यांत 'मोप' या शब्दाचा या अर्थी उपयोग करितात, तो याचाच अपभ्रंश दिसतो. कवितेत 'असूप' या शब्दाचा यापेक्षा जास्ती प्रचार आहे. ६. ओलाव्याला. प्रभूच्या दयेचा ओलावा तुकारामाने सप्रेम वर्णिला आहे. 'माझी विठ्ठल माउली। प्रेमपान्हा पान्हायेली ॥ १ ॥ कुर्वाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरि जवळूनी ॥ २ ॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठुर कोवळी ॥ ३ ॥ तुका म्हणे घांस । मुखीं वाली ब्रह्मरस ॥ ४ ॥ [तुकारामाची गाथा-अभंग ६५८]. १. ह्या केकेंत आपण कशाने पीडित आहों, आपणाला कोणत्या शत्रूचा उपद्व आहे-हें कवि विशद करून दाखवितात. कळी सुनिर्मळी नळी परम उग्र दावा करि, तयांत मी अविशुद्ध, जैवि दावानळी शलभ [तेंवि आहे]. वनीं पशुच्या शिरावरि व्रणार्थ काकसे स्मरादि रिपु मन्मनी उभे [आहेत. भेका अहि काळ कसे न?-असा अन्वय. 'कळी' म्हणजे कलियुगांत लोकांस पापप्रवृत्त करणारी तयुगसंबंधी देवता. 'कलियुगाचे मुळे । झालें धर्माचे वाटोळें ॥' हा नामदेवाचा अभंग सुप्रसिद्धच आहे. 'कलियुगामाजी थोर झाले बंड । नष्ट लोक लंड झाले फार ॥१॥ न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ २ ॥ सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा। ऐसिया पामरा तारी कोण ॥ ३ ॥ विश्वास तयांचा वैसेना कोठेही। स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥ ४ ॥ तुका म्हणे केलें कैसें नारायणे । जाणावें हे कोणे तयाविण ॥ ५ ॥' [तुकारामाची गाथा-अभंग ३२९६]. अशासारखी तुकोबाची वचनें आहेत. कलियुगांत अत्यंत अधआचरण होईल अशा प्रकारचे उद्गार सर्व ग्रंथांतून आढळतात. मंत्रभागवतांतर्गत द्वादश स्कंधांतील पुढील गीति पहा:-'वर्तेल अधर्म जगीं; सत्य, शुचित्व, क्षमा, दया, आयु,। स्मृति, वळ, नुरेल; तूळचि धर्म कुकळिकाळ तो महा वायु ॥ २७ ॥ तेव्हां महत्वकारण वित्तचि, बळ तेंचि धर्मनयहेतु । दांपत्यकारण रुचिच होइल, मोडेल सर्वही सेतु ॥ २८ ॥ वाडवपण ते सूत्रचि, पंडितपण फार बोलणे मात्र । साधुत्वहेतु दंभचि, अधनत्व नयी पराभवा पात्र ॥ २९ ॥ वार्ता धर्मनयांची न रुचेलचि, होतिल प्रजा दुष्टा । रुष्टा, लुब्धा, क्षुद्रा, ज्यांची न असेल मति कधी तुष्टा' ॥ ३० ॥ 'अध्यात्मरामायणांतही अशा अर्थाची वचनें आहेत. के. १ टीप २ पहा.] परंतु नळराजा हा तर कलियुग लागण्याच्या पुष्कळ पूर्वी होऊन गेला होता. मग त्यावर कलियुगाचा प्रभाव कसा झाला ? बरें पूर्वी चारही युगांतील देवतांचा व्यापार चालत असे असें मानले तर कलियुगाच्या नांवानेच कां एवढे खडे फोडावे? पण भविष्यत्काळाला नांवे ठेवण्याची लोकांची चालच आहे. कृत, त्रेत, द्वापार व कलि या चार युगांवर अधिकार गाजविणारे देव दमयंतीच्या स्वयंवरास गेले होते. कथासंदर्भः-दमयंतीने इंद्रादि देवांस टाकून नळाला वरिलें हे २६ पाहून या चौघांत कलीला फार राग आला व त्याने त्याबद्दल नळाचा सूड घेण्याचा निश्चय करून महानि, स्त्रीपुत्रविरह, परसेवा इत्यादि संकटांत नळाला पाडले, अशी भारतांत कथा वनपर्व-अध्याय ४]. २. अत्यंत शुद्ध जो नळराजा त्याचे ठिकाणी. नळराजाची सिद्ध असून पुण्यश्लोकनृपमालिकेत त्याला लोक मेरुस्थानी समजतात. 'पुण्यश्लोको पुढे र