या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारोपतकृत तुम्हींच मर्ग आतरास्तव मला सुदीना विका.। आहे तरी तुम्ही कृपा केल्यास मी परतीरास पोंचेन अशा अभिप्रायाने स्वतरणोपाय सुचवीत कवि भगवंतास प्रार्थितात. [हे] नाविका! तुमच्या बळें भवमहानदी तरेन; मग आतरास्तव तुम्हीच सुदीना मला विका. मज सदाश्रमींचा वासही विदित असे, दया करा, गुण पहा, मज चाकराश्रमी सदा सवे [आहे]-असा अन्वय. २. संसाररूप मोठी नदी. संसाराला नदीची, विशेषतः सागराची उपमा देण्याची सर्व देशांच्या कावतेंतून चाल आहे. 'भवनदी,' 'संसारसागर' इत्यादि शब्द संस्कृतप्राकृतकवितावाचकांच्या अत्यंत परिचयाचे आहेत. पोप कवीची पुढील पद्यपंक्ति पहाः On life's vast ocean diversely we sail, Reason the card, but passion is the gale. Essay on Man, Second Epistle-Lls. 107-109. लांग्फेलोच्या जीवितस्तोत्रांत (Psalm of life) life's solemn main (संसाररूप दुस्तर सा गर) असे शब्द आढळतात; येथें रूपक अलंकार झाला आहे. (१) देवातें, वेणूतें विरही व णूनि गोपिका निवती; । त्यांहीं केली प्रभुची कीर्ति स्वप्रेमशिशुगळां जिवती (मंत्रभागवत), (२) त्या सुगुणसागराचा पावेल न अंत सुकविधीटिटवी (द्रोणपर्व), (३) भूप म्हणे विख्यात स्वायुध दहनांत अहित होमुनि हो (द्रोण.) ३. नावाड्या! हे नाविका ! (नौकेतून परतीरास नेणा-या मनुष्याला 'नाविक' ह्मणतात) तुमच्या बळे (तुमच्या कृपासामर्थ्याने) भवमहानदी (ससाररूप दुस्तर नदी) तरेन (तरण्यास कठीण तरी तुमच्या आश्रयाने तरून जाईन)परमेश्वरावर भाव ठेवून त्याची कृपा संपादन केली ह्मणजे प्रपंचांत राहून देखील परमार्थसाधन घडते. मात्र 'देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥' असा निःसीम भाव असला पाहिजे. १. तुम्हीच विका-तुम्ही आपल्या हाताने विका, या तुमच्या माझ्या व्यवहारांत दुसऱ्या कोणाला न घालतां तुम्ही स्वतः मला विकून टाका. २. भवमहानदीच्या पार उतरून नेल्यावर. सुखरूपपणे संसारमहानदीच्या पैलतीरावर गेल्यानतर. ३. उतार, नावेत बसवून परतीरास नेण्याबद्दल नावाड्यास में द्रव्य द्यावे लागते ते, नोर. 'आतरस्तरपण्यां स्यात् द्रोणी काष्ठांबुवाहिनी' इत्यमरः. संसारनदीतून परमाथपरतीरावर नेण्याबद्दल जो मी तुम्हांला उतार दिला पाहिजे तो तुम्ही मला गरीबाला विकून उगवून घ्या. ४. अत्यंत दीनाला. येथे 'सु'चा अर्थ 'अत्यंत' एवढाच समजावा. 'सु'चा अर्थ चांगला असा जरी आहे तरी त्याचा उपयोग बऱ्यावाईट गोष्टींचा अतिरेक दाखविण्याकरितां करितात. ['बलवत्सुष्ठु किमुत स्वस्त्यतीव च निर्भरे' इ. त्यमरः.] 'सुकृपण' याचा तरी अर्थ 'चांगला कृपण' असा नसून 'अत्यंत कृपण' असा समजावा. मार' ह्याचा अर्थ 'अतिशय मार' असाच होतो. इंग्रजी भाषेत देखील dearest Shak.) चा अर्थ आवडता शत्रु' असा नसून 'मोठा दृढ शत्रु' असा होतो.