या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. अल्प सेवन दुःसह, मग या रसाचे द्रोण भरभरून पिणे हे साहसकर्म भरतखंडनिवासी भक्तजनांनीच करावें; इतरांच्यांनी होणार नाही.” येथे गीतगोविंदांतले तीन ओंगळ अर्थांनी भरलेले उतारे देऊन पुढे दादोबा लिहितात. “यांत पहा हे या श्रृंगाररसाने कसे द्रोण भरले आहेत. यापेक्षाही प्रौढरीतीने शृंगाररसान्वित भक्तिप्रेम पाहणे असल्यास श्रीमद्भागवताचा मोठा ग्रंथ आहेच. आणखी याशिवाय पाहाण्याची इच्छा असल्यास ब्रह्मवैवर्तक पुराणांतील कृष्णजन्मखंड पहावें. परंतु वेणीसंहार नाटककाराने तर वैष्णवांसहि मळमळी सुटे असा रस आपल्या नांदीच्या एका श्लोकांत ओतला आहे, त्या श्लोकाचा येथे उपन्यास करण्यासही मला लज्जेनें संकोच वाटतो. मग असा शृंगाररसान्वित भक्तिप्रेम प्रकट करण्याचा जेथें शिष्टसंप्रदाय प्राचीनकाळापासून चालत आला आहे, तेथे आपल्या प्राकृत कवीने ह्या स्तोत्रांत कोठे सात आठ श्लोकांत या रसाचे एक दोन थेंब ओतले असल्यास (केका ७,१३,२४,३५,३६,३७,८३,१०२) हा त्याजकडेस मोठा दोष न येतां उलटे मला वाटते की हे त्या रसाचे अत्यल्पत्व त्याच्या सदभिरुचीचे मोठे ज्ञापक होते. इतकें वादळ चालत असतां त्यांत पंतांनी आपल्या होडीस तो वारा फारसा लागू न देतां संभाळले, हे त्यांचे कृत्य मोठे स्तुत्य होय असे विचारी पुरुषांच्या ध्यानास येईल.” [य. पां०-पृ० ४१-४३]. दादोबांच्या वरील म्हणण्याच्या सत्यतेविषयी ज्यांना संशय येईल त्यांनी प्राचीन अर्वाचीन कवींनी मोठ्या आवडीनें वर्णिलेल्या कृष्णाच्या बाळक्रीडा (?) वाचाव्या, म्हणजे अत्यंत सोज्वल पुण्यश्लोकाच्या चरित्राला आमचे वीभत्स रसांत गटांगळ्या खाणारे रसिक (?) कवि कसे ओंगळ व मनास वीट आणणारे रूप देतात ते पाहून - अत्यंत खेद होईल. 'नागेश' कविकृत 'चंद्रावळी आख्यान' हे ह्याच मासल्याचे होय. विविधज्ञानविस्तारांत आलेले 'श्रीकृष्णलीलामृत' यासंबंधी वाचनीय आहे. वीभत्स रसाचा आणखी मासला 'विठ्ठला'च्या 'बिल्हण चरित्रांत सांपडेल. पंतांच्या काव्यांत कचित् ठिकाणी अश्लील शब्दयोजना, फाजील शृंगारिक उपमा व वर्णनही आढळते. त्याची उदाहरणे:-(१) सुरतरसांत बुडाला जाणों स्त्रीरत्न शीतनवसर, तो । तप्त मतंगज, रतला; शक्र म्हणे बहु करोनि नवस रतो. (आदि० अ० १२-३१), (२) भीरु ! भय त्यजुनि, मिठी घालीं माझ्या गळ्यांत बाहूंनीं । दर्शन अमोघ माझें तुज उचित न हा नकार वाहूनी ॥ (आदि १६-१२), (३) सत्य, प्रिय, हित बोलुनि योजुनि अंकी निवास रमणीतें, । घेउनि देउनि अधरामृत, भोगी रन वासरमणी तें ॥ (आदि १६. १४), (४) राधाप्राप्त्यर्थ जसा तो स्वकरगता मला यशा शिनळ (वन० ४,२५), (५) ठावें असोनि सर्वहि पतिच्या खोलीत कोंडवा सून । ऐसें स्वसख्यापाशी कांगे वदलीस तोंड वासून ॥ (उद्योग १३,२०५), (६) पडल्या एके शिंग्यावरि बहु शिंग्या करूनि हातेणें । जो मंदुरेत होतो गोंधळ, केला प्रकार हा तेणें (उद्यो० १३-२१७), (७) सुखवि कविसमेसि, जसा जिंकुनि दयितेसि दक्ष काम-रणी (स्वर्गा २-२७), (८) धर्मार्थ जाय सोडुनि सहसा होतांचि वरि पहाट पती। तत्संगा जसि दयिता, त्वत्संगा सिद्धिं तसि पहा टपती (स्वर्गा २-१८), (९) जो घोळशी तुज, जसा सुरती अतिकामरस कलत्रास (द्रोण २२-६१), (१०) उत्साहशक्ति योधा श्रम, भा जेवि न कळवीर. मणी (द्रोण १४-७९), (११) स्त्रीकुचलीन तरुणसे क्षत्रिय गजकुंभलीन ते गमले (द्रोण २०-७७१. (१२) तींत प्रजा जसी तो मखरांत प्रियवधू तसी बसवी (हरिवंश १९-८३), (१३) मणिक