या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत शिरीं पद, मिळो सखा सम सुशील गंगाधरा. ॥ २४ कमयी जसि तनु साध्वी व्हाया प्रिया सुख निवेदी (द्रोण ५-९३), (१४) वांछित, घालुनि गांठी छौं त्या रम्यमूर्तिसह, साधी । तव मातेची शंके सुरतगुरुत्वे करूनि सहसा धी (हरि १६-९४), (१५) वरपुरुषसंग बाई! ब्रह्मानंद स्त्रियांसि जाणावा (हरि ३६-९७), (१६) पुरुषवर प्राप्त तिला झाला हे इंगितें तया कळलें । यश जेंवि मृगमदाचे सुरतसुखाचे कधी नसे मळलें (हरि ३६.९४), (१७) तत्पक्षपवनवेगें उडति खग नभीं त्यजूनि जगतीतें; । स्त्रीतें मत्तविट तसे कांपविती वर पडोनि मग तीतें (हरिश्चंद्र ५-१०), (१८) पदरें पुसोनि चुंबिति पतिमुख, सुरतांत जे जसें चुंबी (स्त्री० ४-१२), (१९) आयांतें वायांतें म्हणते मज लाविली बळेच सवें । कां मोडितां तुम्हीच क्षण आतां स्वपतिवेगळे नसवे ॥ पति जवळुनि का नेता, नेउनि हितबोध करुनि खोलीत । तुमच्याहि असें अंतर पडलें कांगे! क्रियेंत बोलींत (स्त्रीपर्व अ० ४ गी० ५८-५९), (२०) त्वां लीलेनेंचि दृढहि मन्नीवीग्रंथि नित्य उकलावा । क्षत नखरेंचि करुनि हा कठिनस्तनभार फार बुकलावा ।। (स्त्री० अ० ५ गी० ५२) (२१) लागे अंती हगवण, मग वणवासा ज्वर प्रवळ पेटे (शल्य० १-५४) ४ १. मित्र. 'एकक्रियं भवेन्मित्रं समप्राणः सखा मतः.' जे दोघेजण एके ठिकाणी राहून एकच गोष्ट जोडीने करतात त्यांना मित्र म्हणावें व जेथे एकाला सुखदुःख झाले की लागलाच त्याचा प्रत्यय दुसऱ्याच्या ठिकाणीही येतो व जे एकमेकांवर प्राणांपलीकडे प्रेम ठेवतात त्यांना सखा हें नांव योग्य. माझ्या मस्तकी पाय ठेविल्याने गंगाधराला (गंगा धारण करणाऱ्या महादेवाला) सम (स्वतःसारखा, स्वसमान, आपल्यासारखा) [आणि] सुशील (सुस्वभावाचा असा, चांगले आहे शील-स्वभाव-ज्याचे असा) सखा (मित्र, सोबती) मिळो (मिळू द्या)-असा अन्वयार्थ करावा. माझ्या मस्तकावर तुम्ही पाय ठेवला की महादेवाची व माझी मैत्री जमली. कारण उघडच आहे. भगवंताच्या पदधारणाने विष्णुपदी गंगेची मस्तकावर स्थापना होऊन कवीचे शील महादेवाप्रमाणेच झाले व दाघही परस्पर तुल्य झाले. येथे कवीने आपणास भगवंताच्या अनुग्रहानें गंगाधरत्व आले अस म्हणण्यांत मोठी मार्मिकता प्रकट केली आहे. महादेवाचे रूप पाहिलें म्हणजे अठरा विस्वे दारिद्य घरीं भरले आहे असे वाटावयाचे. शरीराला सर्पाचे वेढे दिले आहेत, गळ्यांत नररुंडलावत असून अंगाला विभूति चर्चिली आहे व हातांत भिक्षेकरितां नरकपाळ घेतले आहे, या महादेवाचा प्रपंच पाहिला म्हणजे त्याच्या दारिद्याची चांगली कल्पना होते. असे जरी आहे तरी महादेव जन्मदरिद्री नसून त्याचे ऐश्वर्य फार मोठे आहे. वाटेल तेव्हां सर्व विश्वाची संपत्ति पायापाशी आणण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. तद्वत् जरी महादेवाप्रमाणे वरून वरून मी जन्मदरिद्री दिसतों तरी आंतून तसा नाहीं, तुमची कृपा मात्र मजवर झाली पाहिजे-असा कवीचा अभिप्रेतार्थ. या केकेच्या तृतीय चरणांत 'इंदिराबृहदुरोजसंगा' हे बरेच मोठे समासघटित पद आले आहे. पंतांच्या कवितेत अशी संस्कृत शब्दांन ना भरलेली लांब लांब सामासिक पदें वारंवार आढळतात. मोरोपंताच्या प्राकृत । मत्ररामायणांत सुंदरकांडांत रावणाने मारुतीला तूं कोण, कोणाकडून व कशासाठी येथे ता प्रश्न विचारला तेव्हां मारुतीने जे उत्तर दिले आहे त्यांतील पुष्कळ आर्याधै सबंध