________________
७० मोरोपंतकृत मूळचे शब्द फारच थोडे असून, संस्कृतच अतिशय भरलेले आहेत. मुसलमानी अमलांत पारशी, आरवी ह्या भाषांची अतिप्रवृत्ति झाल्यामुळे त्या भाषांतील शब्दही सरासरी संस्कृताइतकेच मराठीत मिश्रित झालेले आढळतात; तरी सत्कवींच्या काव्यांत यावनी शब्द कमी योजिलेले असतात. अशा रीतीने संस्कृत शब्द हे प्राकृत भाषेची प्रकृतिच बनले आहेत. प्राकृत शब्द मूळचे थोडे असल्यामुळे कारणपरत्वे प्राकृत भाषेस, स्वजननीपासून मदत घ्यावी लागतेच. तशी मदत घेणे गैरवाजवी नसून मदत घेतल्याशिवाय निर्वाहही नाही. तेव्हां संस्कृताचे मिश्रण अवश्य असून दोषरूप नाही हे सिद्ध आहे. कोणी म्हणेल की, भाषा प्राकृत म्हणून लिहावयाची आणि प्राकृत भाषा जाणणाऱ्यांस अगम्य अशी ती संस्कृत करावयाची हा प्रतिज्ञाविरोध नाही काय? दुसरें, दुधांत पाणी मिसळून दुग्धांशग्रहणास समर्थ अशा हंसाला मात्र स्वादग्रहणसुगमता ठेवणे आणि इतरांशी वंचना करणे ही धूर्तता कोठची ? अथवा रेशमी वस्त्रास मध्ये मध्ये पश्मिन्याचे तुकडे जोडून विचित्र बनविल्याने काही विशेष शोभा येते काय ? शालजोडी, रेशमी वस्त्र अथवा कापसाचे वस्त्र यापेक्षां निरनिराळ्या जातींच्या वस्त्रांचे निरनिराळे तुकडे जोडून केलेली गोदडी अधिक चांगली दिसते काय? याविषयी मोरोपंताच्या कवितेचा वारीक विचार केला म्हणजे वरील आक्षेपाचे सहज निवारण होते. केवळ दुग्धतुल्य गीर्वाण भाषा आणि पाण्यासा.. रखी प्राकृत भाषा ह्यांच्या मिश्रणानें, दुधाची गोडी व पुष्टि आणि पाण्याची पचनक्षमता ह्या निरनिराळ्या गुणांचा अर्थात् लोप होऊन, रसायनसंयोगाने त्यांत कांही अपूर्व निराळेच गुण उत्पन्न झाले. आपली संस्कृत जननी दूध देतां देतां जरठ स्थितीला येऊन पोहोचली. तिचे दूध अधिक दाट झाले असून त्यास पारठेपणा आल्यामुळे घृतांशही त्यांत अधिक झाला. संस्कृत जननीची संतति तिच्यासारखीच बुद्धिवलाने, भव्य व दृढतम होती यामुळे तिचे दूध त्या संततीस पचत होते. प्राकृत भाषेची संतति तिच्या दुधाप्रमाणे अल्पवळ, व अल्पकाय असून दिवसानुदिवस ती अशक्त होत चालली आहे. तिला आपल्या मातुश्री नीरतुल्य दुग्ध प्राशन करून पचविण्याचीच योग्यता, तेव्हां तिला संस्कृत जननीचें गुरु दुग्ध बिलकुल पचणार नाही. बरें पचणार नाही म्हणून मुळीच देऊ नये म्हटले तर अशक्त होत चाललेली प्रजा नेहमी क्षीण होत जाऊन शेवटीं गाढतम अंधकारांत पडून राहील. यास्तव मोठ्या डाक्तराप्रमाणे विचार करून पंताने ही युक्ति काढिली की, संस्कृत गुरु दुग्ध आणि प्राकृत पाणी ह्यांचे मिश्रण करून ते प्रजेस देण्याची तजवीज करावी. म्हणजे त्याचे सेवन करून कालांतराने संस्कृत जननीच्या प्रजेशी टक्कर मारण्याजोगी प्राकृत प्रजाही तयार होईल. या न्यायाने पाहिले तर संस्कृतप्राकृताचे मिश्रण सांप्रत कालास उपयोगी आहे. प्राकृत भाषेत मूळचे शब्द फार थोडे आहेत. त्यांत संस्कृत शब्दांचे मिश्रण न करितां मूळच्याच शब्दांवर काम चालवावे असा हट्ट केला, आणि संस्कृतांतील शब्द प्राकृतांत घेतलेच नाहीत तर, अपूर्ण भाषेमुळे प्रौढ ग्रंथांचा या भाषेत संग्रह होणार नाही. अर्थात या भाषेतील लोकांस प्रादेशमात्र जागेत बसवून ठेविल्यासारखें फल होईल. तेव्हां मोरोपंतानें ग्रंथांत संस्कृताचे अतिशय मिश्रण केले हा प्राकृत लोकांवर मोठाच उपकार केला असें इज. इतर प्राकृत कवींच्या काव्यांतही संस्कृताचे मिश्रण आहे परंतु ते स्वाभाविक री • मोरोपंतासारखे हेतुपुरःसर केलेले ते नाही. कोणत्याही गोष्टीची सुधारणा हे तीने झाले आहे. मोरो,