या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'प्रभुस्तुति न ठाउकी, परि तिच्या महाकामुका २८ मला कृपण मारितो बहु सकाम हाका मुका'.। । तुपुरःसर केल्याने चांगली होते व कर्त्ताही तद्यशास पात्र होतो. हे मनांत आणून, प्राकृतांत संस्कृताचे मिश्रण करून भाषेस प्रौढी, विस्तीर्णता व गांभीर्य आणिल्याबद्दल महाराष्ट्र जनांनी मोरोपंताचेच आभार मानिले पाहिजेत." [हंसकृत मोरोपंतावरील निबंध-पृ० ८५-८६.] हा हंसांच्या निबंधांतील उतारा बराच लांब झाला आहे, परंतु मूळ पुस्तक बरेंच दुर्मिळ असल्यामुळे वाचकांच्या सोईसाठी दिला आहे. मूळ निबंध ज्यांना मिळेल त्यांनी त्याचे अवश्य वाचन व मनन करावें. १. [या मोरोपंताला] प्रभुस्तुति ठाउकी न; परि (परंतु) तिच्या महाकामुका मला (देवाला) [हा कृपण, मुका [आणि] बहु सकाम [होत्साता] हाका मारितो असें [तुम्ही मनिं म्हणा. लेंकरा [चांगलं भाषण प्रथम (प्रथमतःच) नीट कसें ये? [म्हणून स्वयें सुपथिं लावियेलें, [आणि हळूहळू पटु करा-असा अर्थान्वय करावा. मागल्या २३ व्या केकेंत मला साधूकडे न विकतां आपल्या घरीच चाकरीस ठेवा असें कवीने म्हटले. त्यावर मी तुमच्या घरची कामें करीन, पण तुमची स्तुति मला करता येणार नाही, अशी पड घेऊन, ती कशी करावी हे तुम्ही मला शिकवा, अशा अभिप्रायाने कवि भगवंताची प्रार्थना करितात. प्रभुस्तुति-स्वामीची प्रशंसा. देवा! मी तुमच्याजवळ चाकर म्हणून राहू इच्छितों पण माझे स्वामी जे आपण त्या आपली स्तुति कशी करावी ते मला मुळीच ठाऊक नाहीं. २. स्तुतीची मोठी इच्छा करणाऱ्या देवाला. येथे 'तिच्या महाकामुका!' हे भगवंताचे संबोधन मानिले तरी चालेल. स्तुतिमहाकामुकत्व हा धर्म येथे भगवंतावर कवि स्थापित आहेत. ज्याला स्तुतीची फारच इच्छा आहे अशा स्तुतिप्रिय देवा!-असा अर्थ जाणावा. ३. देवाला. ४. गरीब, स्तुति करण्यास असमर्थ. ५. फार इच्छा आहे असा, फार मागणारा असा. ६. किंकाळ्या फोडतो. मराठी भाषणसंप्रदायाची तन्हाः-'हाका मारणे', 'वरचेवर झेलणे ,' 'उभाउभी भेटणे,' 'पाण्यांत डिखळ विरणें,' 'कडकडून पोटभर भेटणे,' 'मुळमुळ रडणें,' 'जन्मतांच नख लावणे,' 'गाल फुगविणे' इत्यादि थेट मराठी भाषणप्रकार पंताच्या काव्यांत रगड आढळतात. देशादेशावरील चमत्कारिक शब्द, मणी, शुद्ध, सरळ मराठी भाषणसंप्रदायाचे मासले यांना पंताच्या कवितेत मुबलक जागा मिळाल्यामुळे ती फार मनोहर व अभियुक्त झाली आहे. भाषाशास्त्रज्ञांनी व शुद्ध, सरळ प्रौढ, ऐटदार, आवेशयत व हृदयंगम अशी भाषा शिकावयास इच्छिणाऱ्या जिज्ञासूंनी मोरोपंतांच्या काव्याचा मार्मिकपणे अभ्यास करावा. याविषयी सविस्तरविवेचन प्रस्तावनेत पाहावें. 'आपल्या प्रभूची स्तुति कशी करावी हे ठाऊक नसतां मी जो भगवान् स्तुतिप्रिय त्या मला हा कृपण-ह्मणजे स्तुति करण्यास शक्तिहीन, त्यांत आणखी मुका-शब्दाचा नीट वर्णोचारही ज्याच्याने स्पष्ट करिता येत नाही, असा असून सकाम-म्हणजे ती माझी स्तुति करण्याची मोठी हौस मनात धरून, उगीच हाका मारितो-म्हणजे मुका असल्याने उगीच किंकाळ्या पोरी (य० पां०-पृ० १२०) अथवा सकाम म्हणजे सहेतुक स्तुति करतो, याच्या मार