या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत म्हणा मनिं असे, कसें प्रथम नीट ये लेंकरी ? __ हळूहळू पैटु स्वयें सुपथिं लावियेलें करा. ॥ प्काम भक्ति नाही असा हा हाका मारितो. ह्या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंत भाषण कवीने घातले आहे. १. म्हणाल. असे तुम्ही आपल्या मनांत म्हणाल काय? अशी शंका तुमच्या हृदयांत उद्भवेल काय? २. अशी शंका न घ्यावी पण जर घेतलीच तर त्याचे समाधान पुढीलप्रमाणे कवि करतात. लेंकरा प्रथम नीट कसे ये? मला लहान मुलाला शिकवल्यासवरल्याशिवाय पहिल्यानेच कोणतेही काम नीट (विशेषतः चांगले भाषण) कसे बरे करता येईल? अर्थात येणार नाहीं-असे उत्तर. येथे प्रश्नालंकार झाला. ३. चतुर, शहाणे, हुशार. ४. चांगल्या मार्गात, 'स्वयें (स्वतः) सुपथिं (चांगल्या मार्गाला) लावियेलें (लावलेले) [लेकरूं] हळूहळु (हलके हलके) पटु (चतुर, शहाणे) करा-असा अन्वय. बाप आपल्या मुलाला ज्याप्रमाणे स्वतः सन्मार्गास लावून शहाणे करितो त्याप्रमाणे तुमची स्तुति करण्यास तुम्हीच मला शिकवा असा कविहृद्गतार्थ जाणावा. या श्लोकाबरोबर आमच्या संस्कृत वाचकांनी पंतांच्या 'पांडुरंगस्तोत्रां'तील श्लोक वाचून पहावा:-शंके रके मयि त्वं प्रभुवर! कुरुष कंचनामुं विनोदं किं वक्तायं कविर्मामिति कुतुकितया श्रोतुकामो वचो मे, । नो चेदुच्चैः कृपालुः कथमियदणुतोऽप्यूनमद्यापि कार्य कर्तु कर्ता विलंब न हि गिरिधर ! ते स्यादृणस्यातिभारः ॥ १४ ॥ [पांडुरंगस्तोत्र-चतुर्थ-पृ० १५३.] ५. तुकोबानेही 'हे देवा ! तुमची स्तुति कशी करावी हे तुम्हीच मला शिकवा' अशी भगवंताची प्रार्थना केली आहे: कैसे करूं ध्यान कैसा पाहूं तुज । वर्म दावी मज याचकासी ॥ १ ॥ कैसी भक्ती करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावे देवा आतुडसी ॥ २ ॥ कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणु कैसा तुज ॥ ३ ॥ कैसा गाऊं गीती कैसा ध्याऊं चित्तीं । कैशी स्थिति मती दावीं मज ॥ ४ ॥ तुका म्हणे जैसें दास केलें देवा । तैसें हें अनुभवा आणी मज ॥ ५ ॥ [तुकाराम-अभंग ३३०.] या केकेंत पित्याने मुलाला नीट येईल असे शिकविणे इत्यादि वाक्यार्थ अप्रस्तुत आहे. देवाने पंतांस शिकविणे हा अर्थ प्रस्तुत आहे. पिता हे उपमान आणि देव हे उपमेय, असे असतां अप्रस्तुत वाक्यार्थाचे वर्णन प्रस्तुतांत केले आहे म्हणून ललित नामक अलंकार होय. खरोखर जो वृत्तांत सांगावयाचा तो न सांगतां दुसरा एखादा त्याजसारखा अप्रस्तुत वृत्तांत सांगणे, याला 'ललित' असें ह्मणतात. 'वर्णनीय जो प्रकृत अर्थे त्याचे वर्णन न करितां त्याचा प्रतिबिंबरूप जो अप्रकृत अर्थ त्याचे वर्णन करणे, ह्यास 'ललितालंकार' म्हणतात. 'जसे पाणी निघून गेल्यावर हा पूल बांधण्यास इच्छितो.' ह्या उदाहरणांत योग्य समयीं उद्योग न करितां तो मग करणे ह्या प्रकृत वर्णनीय अर्थाचे वर्णन न करता त्याचा प्रतिबिबभूत जो 'पाणी निघून गेल्यावर पूल बांधणे' हा अर्थ ह्याचेच वर्णन केले, म्हणून हा 'ललि काः' (लेलेकृत साहित्यशास्त्र-पृ० ७४.) याचे संस्कृत लक्षण:-प्रस्तुते वर्ण्यमानार्थप्रतिबिंबस्य चेद्यदि । वृत्तांतस्याप्रस्तुतस्य वर्णनं ललितं मतम् ॥ का तादृशी कुलवधूः क चायं तालंकार झाला.