या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ मोरोपंतकृत मना जरि नये, गुरूक्तहि म्हणे कटु प्रायशा; दयानिधि ! तुम्हांपुढे जनकथा अशा कायशा ? ॥ २६ । प्रस्तुतावर केला आहे, म्हणून हा धर्मरूपक किंवा ललित अलंकार समजावा. अप्रस्तुत जें अमृत त्याचे वर्णन प्रस्तुत जे वर्ण त्यांशी येथे केले आहे. ७. भुलतो, मोहित होतो, कौतुक मानितो. ८. वर्णवितो. लोकांत अशी रीत आहे की लहान मुलाने कसलेही वेडेवांकडे शब्द तोंडांतून काढले, तरी त्या मुलाच्या बापाला ते ऐकून फार आनंद होतो आणि तो त्याचे मोठे कौतुक मानतो. मुलाच्या बोबड्या शब्दांचे बाप तर स्वतः कोतुक करितोच पण लोकांकडूनही करवितो. स्वापत्याच्या बोबड्या शब्दांनी पित्याला जें सुख होते त्या सुखाच्या योगाने त्या शब्दांची मधुरता तो स्वतः स्तवितो आणि लोकांकडूनही स्तववितो. हा मुलगा मोठा शहाणा, भाग्यशाली निपजेल अशी स्तुति शेजाऱ्यापाजाऱ्यांकरवी करवितो. 'वर्णवी' हे प्रयोजक क्रियापद जाणावें. कवीचा अभिप्राय असा की मी आपली जी वेडीवाकडी स्तुति करीन ती आपण गोड मानून घ्या. भगवंताला आईबापांचे ठिकाणीं मानून त्याने आपली वेडीवाकडी स्तुति मान्य करून घ्यावी म्हणून अनेक कवींनी आणि पंतांनीही आपल्या काव्यांत अनेक ठिकाणी प्रार्थना केली आहे:=(१) जैसा स्वभाव मायबापांचा। अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिक तयांचा । संतोष आथी. ॥ [ज्ञानेश्वरी-अ० १ ओ० ६४], (२) मज हांसतिल लोक । परि मी गाईन निःशंक ॥ माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें गा! विठ्ठला! ॥ [तुकाराम-अभंग १०५०], (३) वेडेवांकडे गाईन । परि मी तुझा म्हणवीन. ॥ [तुकाराम-अभंग २०१५], (४) जरि बोबडे, पित्याचे मोहावें मन तथापि तोकानें, । प्रभु साळ्याभोळ्यांची बहु वात्सल्य कथा पितो कानें. ॥ [पांडुरंगदंडक ८, पृ० १३२], (५) जरि अप्रगल्भ केवळ, सादर असतो तथापि कवि तोकी, [पांडुरंगदंडक ६, पृ० १३२], (६) निजवाळवचन म्हणती पितृकर्ण न जेवि नायकायाचे [गजाननस्तव ४, पृ० १७२]. १ मुलाच्या बोलण्याला बाप इतका भुलतो, पण बापाचे बोलणे त्याला कोठे आवडते? 'गुरूक्तहि (बापाचे हितकारकही बोलणे) जरि मुलाच्या मना (मनाला) नये (येत नाहीं) [तरि] [तें] प्रायशा (बहुधा) कटु (कडू) म्हणे (म्हणतो).' बापाचे बोलणे जरि मुलाला कडू वाटले आणि त्याच्या मनास आले नाही, तरी मुलाचे बोलणे बापाला सदोदित गोडच वाटते. 'बापाचे सांगणे, शिकविणे मुलाच्या मनास येत नाही, ते कडूसे वाटते, तरी मुलाचे शब्द ऐकून पिता भुलतो आणि मधुरता वर्णवितो.' [मराठी ज्ञानप्रसारक-वर्ष, सन १८६५, १६ अं० १० पृ० ३१४.] २. हे दयासागरा! अपरंपार दया ज्याच्या पोटांत भरली आहे अशा भगवंता! ३. कवि भगवंताला म्हणतात:-हे करुणानिधे देवा! जी गोष्ट मी दृष्टांताने सांगितली तशा लोकांच्या गोष्टी तुमच्या पुढे सांगण्यांत काय अर्थ आहे ? ४. किती सां- । चा, कशाला सांगाव्या, तुम्हांला त्या माहीत आहेतच, म्हणून त्या सांगण्याचें । नाही असा अर्थ. 'कायशा' ह्या शब्दाचे यमक जुळावे म्हणून 'प्रायशः' या च 'प्रायशा' असें रूप कवीनें अपभ्रंश करून योजिले आहे. संस्कृत शब्दाचे 'प्रायशा' असें रूप कवीने अपना