या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेवढी छापण्यासंबंधी मदत मोठ्या आनंदाने दिली व ही आवृत्ति तयार करण्यास मला पुष्कळ विलंब लागला तरी निभावून घेतले याबद्दल त्या दोघांचा मी फार ऋणी आहे. गेल्या वर्षापासून रा. पांगारकर हे मोरोपंतांच्या चरित्राविषयी लोकमान्य 'केसरि' पत्रांतून उपयुक्त माहिती प्रसिद्ध करित असून पंताचें विस्तृत चरित्र लिहिण्याची ते खटपट करित आहेत याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेंच आहे. पहिल्या आवृत्तीप्रमाणेच या आवृत्तींतील मजकुराची सर्व जबाबदारी मजवरच आहे. त्यांतील गुणांचे श्रेय सर्वस्वी माझ्या वडील मंडळीचे व मित्रांचे असून त्यांतील दोषांचा विभागी मात्र मी स्वतः आहे. तेव्हां वाचकांनी यांतील गुणदोषांचे विवेचन निर्भीडपणे करून या ग्रंथाची पूर्णता करावी अशी त्यांस सप्रेम विनंती आहे. कारण महानुभाव श्रीज्ञानेश्वर महाराजांनी झटल्याप्रमाणे 'तुह्मां संतांच्या सभेत उणीव जर जशीच्या तशीच राहील-ती पूर्ण होणार नाही, तर लडिवाळपणाने मी तुहाांवरच रुसेन; कारण 'परिसाने स्पर्श केल्यावरही जर लोखंडांतील हलकेपणा निघून गेला नाही तर तो दोष कोणाचा ?' रसिकवाचकांपुढें कृति ठेवूनही त्यांतील कमीपणा निघून गेला नाही तर एवढेच ह्मणावे लागेल:-'स्पर्शमणि सुवर्ण करी लोहासी, काय करिल ? खापर मी.' (मोरोपंत.) शेवटी, ही दुसरी आवृत्ति काढण्याचे निमित्ताने तरी अनेक संतांचा दृढ परिचय झाला व मातृभाषेची कशी बशी सेवा घडली याबद्दल 'वेदप्रतिपाद्य स्वसंवेद्य आद्य आत्मरूपा'ला नमस्कृतिरूप पुष्पांजळी भक्तिभावाने अर्पण करून पंतांच्या मधुर वाणीनेच पुढील वरप्रदान मागून संतसेवेला लागतों: 'तुमच्या आशीर्वादें जन्मोजन्मी घडो अशी सेवा । हे वाङ्मनःशरीरें करितों विज्ञापना सदा देवा!' ॥ (कृष्णविजय ८३.२११) सर्व भागवतांचा दासानुदास, १ मार्च १९०२१ श्रीधर विष्णु परांजपे. ईशप्रार्थना. स्तन्य स्वस्थ प्रसूचें सकळहि करितांना च 'आ'बाळ लाहे;। वार्ता कोणी न मानी कुशळ सुरभिचा वत्स आबाळला हे; ॥ प्रेमें पाळी, कधीही निजगुण न ह्मणे माय गा बाळकाला;। व्हावाचि श्रीधरास प्रिय बहु जरि हा ग्रंथ गाबाळ काला. ॥ (रम्यरामायण-उपसंहार ४)