या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. स्वभाव तुमचा असा विदित जाहला याचकां; करूं स्तव जैसा तसा; फळ नव्हे जना याच कां ॥ २८ 'तुम्ही परम चांगले, बहु समर्थ, दाते; असें फार काय सांगावें, जे कोणी तुम्हांला नमस्कार मात्र करतात त्यांस आपले सकल धन देऊन टाकता. तुमची स्तुति करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे जे कोणी तुम्हांला सप्रेमांतःकरणाने नमस्कार मात्र करतात त्यांसही तुम्ही मुक्त करतां-असा येथे 'नमस्कृतिपरां' या पदानें ध्वन्यर्थ सुचविला आहे. नमस्काराची तर गोष्ट राहो, नुसती प्रभूची मनांत आठवण केल्यानेही कार्य होते. पंत ह्मणतात:-'नलगे नमने घ्यावें आठा अंगांत करनि आठ वणः । उद्धरिसी दीनांतें देवा! करितां मनांत आठवण ॥' (विश्वेशस्तुति० ७४). . १. सप्रेमांतःकरणाने नुसता नमस्कार करणाऱ्याला तुम्ही आपले सर्वस्व देतां असा तुमचा स्वभाव. २. माहीत, ठाऊक. ३. तुमच्यापाशी याचना करणाऱ्या आमच्यासारख्या सेवकांस. ४. जसा येईल तसा, वेडावांकडा. ५. न होय होत नाहीं किंवा होणार नाही. ६. कवि आपणाकडे बोट दाखवून ह्मणतात, 'वेडेवांकुडे गाईन । परि मी तुझा म्हणवीन ॥' या तुकोबोक्तीप्रमाणे भगवंताची वेडीवांकुडी स्तुति करणाऱ्याला जर मोक्षप्राप्ति होते, तर मग मलाच कां इष्टार्थप्राप्ति होणार नाही? स्तवाचे फळ इतरांप्रमाणे या मला (मोरोपंताला) का मिळणार नाहीं? अर्थात इतर व्यासशुकादिक याचकांप्रमाणे मलाही फळप्राप्ति अवश्य होईल असे तात्पर्य. येथे प्रथम व द्वितीय चरणांत परिवृत्ति नामक अलंकार झाला आहे. [मागें केका १५, टीप २ पृ० ४६ पहा.] येथे घेण्याच्या वस्तूपेक्षा देण्याची वस्तु अधिक आहे म्हणून हे अधिकपरिवृत्ति नामक अलंकाराचे उदाहरण जाणावें. तसेंचः-(१) 'स्लानी नरतनु घेउनि, दे दिव्याकृति सुरापगा याला' (स्वर्गारोहणपर्व-मोरोपंत). प्रथम चरणांत देवाने घेण्याची वस्तु स्तुति आणि देण्याची वस्तु तृप्तिप्रद वर आहे. तसेंच द्वितीय चरणांत नमस्कार आणि सर्व स्वधन ही गृहणीय आणि देय आहेत. ७. 'तुम्ही परम चांगले, बहु समर्थ, दाते [आहां], मी (कवि-मोरोपंत) सुदीन जन असे, यास्तव तुम्हां आजि शरण आलो.' असे पुन्हाहि [तुम्हांला कथितों, यास्तव हे [माझें भाषण] [हे! देवा!] बरें श्रवण करा, हे] सकललोकराया! आ. पुल्या] समक्ष अपुला स्तव किति? असा अन्वय. मागल्या केकेंत हटल्याप्रमाणे यांत कवि यथाशक्ति भगवंताचा स्तव करितात. ८. अत्यंत चांगले, अखंडितश्रीसद्धर्मडित, सकलगुणालंकृत. ९. सर्वशक्तिमान् (आहां). अंगी नुसते दातृत्व असून उपयोगी नाहीं, देण्याचे सामर्थ्यही पाहिजे. या दृष्टीने 'समर्थ' हे पद अत्यंत समर्पक होय. बरे, दातृत्व आणि सामर्थ्य हे दोन्ही गुण असले म्हणजे कार्य झाले असे होत नाहीं तर ज्याला दान द्यावयाचे आहे त्याच्या अंगी पात्रता असली पाहिजे. तसेच त्याच्या ठिकाणी कृतार्थ होण्याची इच्छाही पण पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचा योग स्तुत प्रसंगी चांगला जुळून आला आहे. या केकेचे प्रथमा हृदयंगम झालेर १०. स्वभक्तमनोरथ परिपूर्ण करणारे, याचकांची इच्छा सफळ करणारे. ११. आहे.