________________
मोरोपतकृत सुदीन जन मी, तुम्हा शरण आजि आलो.' असें । पुन्हाहि कॅथितों, बरें श्रवण हे करा यास्तव; समक्ष किति आपुला सकललोकराया ! स्तव ? ॥ २९ 30 किती श्रवण झांकिती प्रभुहि; काय ते पोळती? . ११. अत्यंतदीन, अति रंक-दयापात्र. २. आज. मी तुम्हांला शरण आलो आहे. देवा! तुम्ही अत्यंत समर्थ आणि वदान्यवर्य आहां व मी अत्यंत दीन असून आपणास शरण आलो आहे. तेव्हां मज शरणागत दीनाची उपेक्षा न करतां मजवर कृपा करा. आपल्यासारख्या दात्याची आणि मजसारख्या दीन रंकाची फारा दिवसांनी गांठ पडली आहे. तेव्हां ही उत्तम संधि वायां न दवडितां माझें दैन्य नाहीसे केल्याचे श्रेय जोडा, माझें पापरूप दैन्य आपण नाहींसें न केल्यास आपल्या वदान्यतेला कमीपणा येईलअसा अभिप्रेतार्थ. ३. अशा रीतीनें. ४. पुन्हा एकवार. याच्या पूर्वीच कवीने मी आपणास शरण आलों आहे, माझा तुम्ही उद्धार केला पाहिजे अशी विनंति केली होती, म्हणून येथे 'पुन्हाहि कथितों' असे म्हटले आहे. येथे 'पुन्हाहि' या शब्दानें कवीने स्वोद्धाराविषयींची आतुरता प्रकट केली आहे. ५. 'म्हणतों' असाही पाठभेद आहे. सांगतों, निवेदन करितों. फिरून एकवार आपली प्रार्थना करितों. ६. म्हणून, याकरितां. मी आपली स्थिति एकवार आधीच कळविली, मी दीन आपणास शरण आलो आहे हे जर आपण ऐकिलें नसेल तर तेच पुनः सांगतों, यास्तव आतां तरी हे भाषण चांगले लक्ष्य लावून ऐका. ७. समोर. 'सकललोकराया! ब्रह्मांडनायका! त्रैलोक्याधीशा! समक्ष (आपल्या समोर, आपल्या तोंडावर, आपुला (आपला) स्तव (स्तुति, प्रार्थना) किति (किती करावा? झाला तेवढा पुरे).' ८. सकल (समग्र) लोकांच्या (भुवनांच्या) राया! राजा! (स्वामी); त्रयोदश भुवनांच्या स्वामी! ब्रह्मांडनायकाची मी स्तुति केली, यापुढे जास्त स्तुति करण्यास केवळ असमर्थ आहे म्हणून मी केलेल्या स्तुतीनेच आपण संतुष्ट व्हा. 'सकललोकराया!' हे पद फार खुबीने योजिलें आहे. ह्मणून येथे परिकरांकुर अलंकार झाला. पृष्ठ ११, टीप ४ पहा. मजसारख्या हीनदीनाने सकलैश्वर्यसंपन्न ब्रह्मांडनायक अशा आपणापुढे आपला स्तव किता करावा वर? केला इतका पुरे झाला असे मला वाटते. 'सकललोकराया !' या सामासिक पदासारखीं 'वीरराय' 'साधुराय' 'कविराय' अशी पदें पंतांच्या काव्यांत आढळतात. यांत 'राज' याचें 'राय' असें रूपांतर झाले आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. ९. किती प्रभुहि श्रवण झांकिती! ते पोळती काय? [ज्यांस स्तुति आवडत नाहीं] ते कोण [असें] जरि पुसाल [तर सांगतों, ऐका]. ते तुझ्या पदरजी लोळती. तुजचि पर सोसवे! [हे] हितकरा! दयासागरा! कृत्तिवासा गरा न पी, तरि कसें ॥ अन्वय. कित्येक "सामान्य ज्ञानी, माझें महत्व यत्किंचित् जाणणारे जे स्वासही प्रशंसा आवडत नाही, मग मी एवढा ब्रह्मांडनायक स्वस्तु स्तवन