या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंतकृत करी मलिन संद्यशोमुख; हलाहला लाजवी; । असतां मनुष्याला उन्मत्त करतें. ५. विषपक्षी-भक्षण केले असतां, स्तवनपक्षींस्वीकारले असतां. ६. उन्मत्त करितें, माजवितें. स्तुति ऐकून लोक अहंकाराच्या स्वाधीन होतात-मदोन्मत्त होतात. कांहीं विर्षे भक्षण केली असतां रसनेला मधुर लागतात व त्यापासून उन्माद येतो हे सुप्रसिद्ध आहे. १. मळकट. २. सत् (चांगले)+यशस् (कीर्ति) हेच कोणी मुख (तोंड) उत्तमकीर्तिरूप मुखाला, कीर्तिवान् पुरुषाच्या तोंडाला स्तवनाने काळोखी येते-कमीपणा येतो. एखादा थोर पुरुष स्वकीर्तिश्रवणाने उन्मत्त झाला ह्मणजे त्याची चहूकडे अपकीर्ति होते. ३. समद्गमंथनप्रसंगी निघालेल्या हालाहल नामक भयंकर विषाला. 'हालाहलनामक विपरस लयदहनोग्र जन्मला पहिला' ॥ ५२ ॥ [मोरोपंत-मंत्रभागवत-नवमस्कंध-गीति ५२-५९ पहा.] 'पुंसि क्लीवे च काकोलकालकूटहलाहलाः' इत्यमरः । 'हालाहलं हालहलं वदंत्यपि हलाहलम्' इति द्विरूपकोषः । 'हालाहल' या शब्दाची अशी तीन रूपे आहेत. 'हळहळ' असें एक आणखी 'हलाहल' शब्दाचे रूप पंतांच्या 'रामरीति' काव्यांत सांपडतें:-'रस न समजती म्हणविति रसिक म्हणुनि चित्त बहुत हळहळतें । जें तन्निंदक भाषण होतें कर्णांत तप्त हळहळ तें ॥ ६० ॥ [रामरीति-पृ० २३१] 'हलहल' हा शब्द 'हलाहल' या अर्थी एच्. एच्. विल्सन् यांनीही आपल्या संस्कृत-इंग्रजी कोशांत दिला आहे. 'विषाचे नऊ प्रकार आहेत:-१ काकोल, २ कालकूट, ३ हालाहल, ४ सौराष्ट्रिक, ५ शौक्तिकेय, ६ ब्रह्मपुत्र, ७ प्रदीपन, ८ दारद, ९ वत्सनाभ.' (शब्दरत्नार्णव-बाबापदमनजीकृत.) कथासंदर्भः-पूर्वी अमृताच्या प्राप्तीकरितां देवदैत्यांनी मंदरगिरीचा मंथनदंड व वासुकीनागाची रज्जु करून क्षीरसागराचें मंथन केले. प्रथम हालाहल विष निघालें तें लोककल्याणार्थ शंकरांनी प्राशन केले. पुढे दुसरी त्रयोदश रत्ने निघाली त्यांतच अमृत निघाले. वासुकिला नेत्र करुनि, मंदरगिरिला करूनियां मंथा । आदरिला क्षीरधिच्या मथनाचा दैत्यसुरवळे पंथा' ।। (अमृतमथन १.३७). पुढील श्रीधर कवीच्या 'पांडवप्रतापां'तील ओव्यांवरून चतुदशरलें कोणती व ती कोणकोणाला मिळाली हे समजून येईल; 'कमला, कौस्तुभ, शाङ्गे, शंख । देउनि पूजिला वैकुंठनायक । वशिष्ठासि कामधेनू देख । उच्चैःश्रवा भास्करातें ॥ १ ॥ चंद्र स्वेच्छे विचरे गगनीं । सुरा देती दैत्यांलागुनी। ऐरावत, पारिजातक, रंभा रमणी । सहस्राक्ष आवरी ॥ २ ॥ विष पूर्वीच निघालें । तेंहि चतुर्दशांत गणिलें । अमृत कुंभ घेउनि ते वेळे,। धन्वंतरी निघाला. ॥३॥ ४. लाजविते. स्तुतीच्या योगाने हालाहल विषापेक्षाही जास्त भयंकर परिणाम होत असल्यामुळे ती आपल्या प्रखरतेने हालाहल विषासही खाली पहायास लाविते. हालाहल विष भयंकर; त्याच्या नुसत्या वासाने मनुष्य ताबडतोब मरतो, अशा विषालाही स्तवनविष आपल्या मारक आणि मादक गुणाने लाजवि विते. स्तुतीचा नाद एकदां मनुष्याला लागला म्हणजे त्याची अपकीर्ति होऊन सर्वस्वी हानि होते.